अलविदा


मंडळी, निरोप घ्यायची वेळ आली. ह्या ब्लॉगवरची माझी ही शेवटची पोस्ट.

२००९ वर्ष माझ्यासाठी खुपच छान गेले. मार्चच्या शेवटाला मी हा ब्लॉग सुरु केला आणि ह्या ९ महिन्यात ब्लॉगच्या वाचकांची संख्या ९१ हजाराच्या वर गेली. मी ह्याची अपेक्षाही केली नव्हती. वाचकांकडुन भरभरुन प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळाले ज्यामुळे मला दर वेळेला नविन नविन लिहायची प्रेरणा मिळत गेली. ‘स्टार माझा’ ने भरवलेल्या मराठी ब्लॉग च्या स्पर्धेतही पहिल्या तिन मध्ये स्थान मिळालं ही सुध्दा एक सुखावणारी गोष्ट होती.

ह्या ब्लॉगच्या अनुषंगाने अनेक लोकांच्या ओळखी झाल्या त्यातले काही चक्क मेसेंजरमध्ये आणि ऑर्कुट मध्ये ठाण मांडुन बसले ज्यांच्याशी आयुष्यभर संपर्क राहीलचं. पण असेही अनेक जणं भेटले आणि मनामध्ये स्थान करुन गेले.

पण आता वेळ आली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आगामी २०१० मध्ये अनेक नविन जबाबदाऱ्या येऊ घातल्या आहेत आणि ज्या सांभाळता सांभाळता ब्लॉग लिहावयाला तितकासा वेळ देऊ शकेन असं वाटतं नाही. दिवसांगणिक नविन पोस्टमध्ये पडणारी गॅप वाढतच चालली होती. उगाचच काहीतरी रटाळ खरडुन तुम्हा सर्वांच्या मनामध्ये मिळवलेले स्थान मला गमवायचे नाही. यशाच्या, प्रेमाच्या ह्या शिखरावर असतानाच निरोप घेतलेला कधीही चांगलचं नाही का?

अर्थात नविन लिखाण काही नसलं तरी अधुन मधुन मराठीब्लॉग्स.कॉम वर उड्या मारुन तुमचे लेखन वाचण्याची संधी मात्र मी नक्कीच साधणार यात शंका नाही.

माझा व्यक्तीगत ब्लॉग मात्र मी अपडेट करीत रहाणारच आहे. मला नाही वाटत कुणाला त्यामध्ये उत्सुकता असेल याची, तरीही कधी वाटलचं तर त्याचा पत्ता आहे -
http://aniketsdiaries.vox.com/

Gtalk – aniket.com@gmail.com
Twitter – http://twitter.com/manatale
Orkut – http://www.orkut.co.in/Main#Profile.aspx?uid=9215324300026099621

चला तर मग मंडळी, ह्या भुणभुणणाऱ्या भुंग्याचा हा शेवटचा रामराम स्विकारा आणि द्या आज्ञा मला निघण्याची.

तुमचे प्रेम, आशिर्वाद सदैव पाठीशी राहतील याची मी खात्री बाळगतो.

तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा

About these ads

82 thoughts on “अलविदा

 1. अनिकेत,
  नववर्षाच्या शुभेच्छा…! मात्र राम राम घ्यायची आणि द्यायची वेळ नक्कीच नाही.. मला/ आम्हांला पुर्ण खात्री आहे की तु पुन्हा लिहिशील… भलेही थोडा वेळ लागेल, हरकत नाही.. आम्ही वाट पाहू..!

  बाकी तुझ्या नविन प्लान्स/ जबाबदार्‍यांसाठी अनेक शुभेच्छा!

  Reply
  • धन्यवाद मित्रा. वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल, मदतीबद्दल, प्रतिसादांबद्दल.

   मला ही आशा आहे की मी मला नविन व्यापातुन वेळ मिळेल आणी पुन्हा एकदा हा भुंगा भुणभुणायला लागेल.

   Reply
 2. कभी अलविदा ना कहेना … Keep on writing, atleast sometimes in between … All the best for your future activities.
  Wish you a very happy new year….

  Reply
  • रहे ना रहे हम, महेका करेंगे बनके कली, बनके सबा, बागे-वफाओंमे

   तुला सुध्दा शुभेच्छा, आय.एम./ट्विटर वर भेटत राहुच

   Reply
 3. अनिकेत.

  “अलविदा” मागची तुमची भुमिका समजली आणि पटली. ” भुंगा” कधी एकाच फुलावर बसु शकत नाही हे ठाउक असले तरी मनाला एक हुरहुर लागली. एक वाचक या नात्याने मी जे miss करणार आहे ते शब्दात सांगता येणे शक्य नाही.

  ब्लॉग रोज अपडेट करता नाही आला तरी अधुनमधुन लिहत जा. आम्ही तुमच्या पोस्ट्सच्या frequency वर नव्हे तर तुमच्या लिखाणावर प्रेम करतो. तुमच्यात लिखाणाची passion आहे ती passion कुठेही कमी होउ देउ नका. ब्लॉग नाहीतर आणखी कुठे तरी लिहत रहा.

  मराठी भाषेवर नितांत प्रेम करणार्‍या एका वाचकाची मराठी भाषेवर तितकच प्रेम करणार्‍या एका लेखकाला ही नम्र विनंती.

  Reply
  • धन्यवाद सलिल, नक्की लक्षात ठेवीन आणि आपल्या नेटभेट साठी का होईना एखादे चांगले आर्टीकल देण्याचा नक्की प्रयत्न राहील

   Reply
 4. अरे अस कस बंद करताय ? आमच्या सारख्या सामान्य वाचकांचा काही विचार बिचार आहे कि नाही ?

  अस नाही चालणार वेळ मिळेल तसे लिहा परंतु बंद नका करू
  बाकी तुझ्या नविन प्लान्स/ जबाबदार्‍यांसाठी अनेक शुभेच्छा!:)

  Reply
  • आहे रे विक्रम, खुप विचार केला. It is not a one night decision, खुप दिवस विचार करत होतो आणि म्हणुनच हा निर्णय घेतला.

   पण परत एकदा निश्चीत विचार करीन, नशीबात असेल तर हा भुंगा पुन्हा एकदा भुणभुणायला लागेल

   Reply
 5. कम ऑन अनिकेत. थोडा वेळ काढून काही ना काही लिहित जा. आत्ताच महेंद्रजींनी ब्लॉगवर न लिहिण्याची कारणं सांगितली. तू नवीन कारण शोधू नकोस. काहीही लिही पण लिही. तुझ्या नवीन जबाबदा-यांसाठी शुभेच्छा पण लिहायला विसरू नकोस.

  Reply
  • धन्यवाद कांचन, नाही नविन कारणं खरचं नाही शोधत आहे. खरं तर सर्वात जास्त दुःख मलाच आहे की पुन्हा आपली भेट होणार नाही. ह्या ब्लॉगने खुपच सवय लावली होती मला.

   असो, अधुन मधुन का होईना काहीतरी पणं चांगलच लिहीण्याचा नक्की प्रयत्न राहील

   Reply
 6. अनिकेत, तुझ्या ब्लॉगवर मी कधी प्रतिसाद दिले नसले तरी हा ब्लॉग नेहमीच वाचत आलोय. तु अधुनमधून, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहित रहावंस असं मनापासून वाटतंय. तुझा ब्लॉग नक्कीच मिस होईल.

  तुझ्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा!

  -अनामिक

  Reply
  • स्वागत अमोल, तु ब्लॉगवर प्रथमच कमेंट देत आहेस, पण त्याच बरोबर हेही दुःख आहे की पुढची कमेंट टाकायला इतक्यात वेळ येईल असे वाटत नाही.

   लिहीत रहाण्याचा नक्कीच प्रयत्न करीन

   Reply
 7. अरे असे कसे चालेल लिखण बंद करुन. तुम्ही खुप छान लिहीता.
  जसा वेळ मिळेल तसं लिहा पण लिहा.
  आणि “मेहंदीच्या पानावर” अजुन पुर्ण नाहि झाली.

  Reply
 8. अरे वा.. हे पोस्ट तर मी लिहिणार होतो, १७ जानेवारीला , माझ्या ब्लॉग च्या वाढदिवसाला..!!! पण माझ्या आधी तुम्ही नंबर लावला..

  नविन जबाबदाऱ्या… बरोबर आहे :) वेळेचं नियोजन कठीण होईल.. असो..

  चला. काही हरकत नाही, पण दुसरा ब्लॉग आहे नां.. तिथे भेटूच.. :)

  Reply
  • “नविन जबाबदाऱ्या… बरोबर आहे”

   तुम्ही पण ना… :-)

   Reply
 9. :-( तुम्हा सर्वांच्या कमेंट्स बघुन खरं तर खुप आनंद झाला, पण तितकेच वाईट वाटले. हेच ते प्रेम, मैत्री, प्रोत्साहन ज्याला मी मुकणार.

  तरीपण ठिक आहे, तुमच्या आग्रहाचा मान ठेवुन महिन्यातुन एखादी पोस्ट टाकायचा नक्की प्रयत्न करीन (वचन देत नाही पण प्रयत्न नक्की करीन), आणि जे लिहीन ते चांगलेच लिहीन.

  खरंच तुम्ही आणि तुमच्या प्रतिक्रिया नसत्या तर माझ्या ह्या ब्लॉगला काहीच अर्थ नव्हता, नसेल..

  Reply
 10. Hi Aniket , Thank you very much for your delightful and thought provoking articles (a difficult feat to combine these two elements)
  Happy new year to you and hope to see you again on the net
  Regards
  JKBhagwat

  Reply
 11. Aniket,
  Asa nirop gheu nakos, mitra! Jamel tevha jamel tase lihit raha please! ashi niravaniravichi bhasha nako karu re..
  je watel manala te lihi, aamhi jarur wachu…tuzya likhanat passion aahe..tee kami hou deu nako..
  naveen varshachya hardik shubhechchha!
  – Ajit

  Reply
  • नाही कमी होऊ देणार पॅशन, नक्की अधुन मधुन लिहीण्याचा “प्रयत्न” करीन

   नविन वर्षाच्या तुलाही शुभेच्छा, ऑर्कुट्वर भेटत राहुच की

   Reply
 12. मित्रा आम्ही समजु शकतो तुझी जबाबदारी. काहीतरी खरडण्यापेक्षा न काही लिहिलेलंच चांगलं. मी सुद्धा हे काटेकोरपणे पाळणार आहे. बाय द वे, तुझ्या इथुन पुढच्या सर्व गोष्टींसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!

  वुई विल मिस यू अ लॉट.

  -अजय

  Reply
  • भावना समजावुन घेतल्याबद्दल धन्यवाद अजय. आय विल अलसो मिस यु ऑल

   Reply
 13. अनिकेत, शेवटी भुंगाच तू एका फ़ुलावर फ़ार काळ नाही बसणारेस पण भुणभुण थांबवणार?? तुझं दुसरं एक फ़ुल ब्लॉगस्पॉटवरही आहे ना?? जर कधी फ़ार वाटलं तर तिथे तरी लिही….

  तुझं हलकंफ़ुलकं, कधी सिरियस पण सच्चं वाचायची सवय लावलीस आणि असं सोडून जातोयस याचं वाईट तर वाटतंय…तुझ्या लिखाणाची वाट पाहेन…

  Reply
  • अपर्णा, धन्यवाद, सगळ्यासाठीच. ऑर्कुटवर भेटुच :-)

   Reply
 14. kharach asa lihayacha banda karu nakos. aapalya busy schedule madhun tu virangulya sathi lihit ja. nusata kam kam karun dokyacha par vatola houn jata roj.
  ani tyat maza, tuza blog vachayala milanyacha swartha pan ahech… :)

  Aso pan majecha bhag sodata…. mahinyatun ekhadi tari post kashihi asali tari swataha sathi lihit ja….

  Reply
  • नक्की मित्रा, लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन

   Reply
  • गीता, नववर्षाच्या तुलासुध्दा हार्दीक शुभेच्छा

   Reply
 15. itak sopp nasat re je mhantoyas te…kam bim jababdarya etc. is okay. pan man manpassun awadatya goshtikade dhaw ghetach raahat. tujhahi gheil. thambwu mhanta thambanaar nahi. mala khatri aahe!
  shubheccha.

  Reply
  • खरं आहे सोनल, इतकं सोप्प नाहीये ते, इतक्या महीन्यांची सवय! मी खुप विचार केला ह्यावर आणि शेवटी असं ठरवुन टाकलं बघ.

   पण इतक्या साऱ्या प्रतिक्रिया बघुन मन हेलावुन गेले. तुम्हा सर्वांना खुssssप मिस्स करीन.

   स्टे-इन टच ऑन जी.टॉक

   Reply
 16. arreee…tu veda aahes ka? kahitarich kay bolatos? Sagala manya…pan lihayacha thambauu nakos re….he baray…adhi chatak lavaychi ni mag khurak nahi puravayacha…
  Savay zaliye tuzya blog chi..
  ani..mehendicya panavar…tyacha kai?

  Reply
  • माफ कर मंजु, घ्यावा लागला हा निर्णय. वाईटातुन काही तरी चांगलं घडतं म्हणतात.. अश्शीच आशा करुयात.

   Reply
 17. areeee blog band kay kartos mala mahit aahe tula tujhya busy shedule madhun vel milat naahi pun tarihi thodasa vel kadhun mahinytun ekhada blog tari post karat ja. aani mehindichya panavar chya katheche kay? te kadhi purna karnar? anyways navin varshachya hardik shubhechya|| me tujhya post vaat pahatey byeeeeeeeee.

  Reply
  • hodasa vel kadhun mahinytun ekhada blog tari post karat ja

   नक्की प्रयत्न करेन गिता!

   Reply
 18. hi aniket,

  This is not fair..I know it’s difficult to manage every thing but you should keep writing !
  You won’t believe that,when i came to know about your blog,i had read complete blog
  start to end in single sitting and now u take such decision..
  Aany way All the very best for your future plans…
  will pray for you to fulfill your dream…(settle in town and to start library)
  Happy New Year…

  Reply
  • धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत राहुल. खुप आनंद झाला वाचुन की तुला माझा ब्लॉग आवडला. आणि तुझ्या शुभेच्छाबद्दल पण धन्यवाद.

   तुलाही नविन वर्ष सुखाचे जाओ.

   Reply
 19. he kaay … mendeechyaa paanaavar dav ajoon tasech aahe na!

  naveen varsh, navyaa jabaabdaryaa – ekadam maany. pan aadhun madhoon tari lihit raha ithe.

  Reply
 20. Kaay rao? Ase kaay karata? Kasala solid dhakka dilat tumhi mala! Busy to sabhi hote hain ji! Pan likhan chalu theva. Hawe tar hard copy mala dya, typingchi jababdari majhi! Chalel? Pan nirop ghewu naka.

  Reply
  • सो स्वीट ऑफ यु माधुरी :-(. नाही तो प्रश्न नाहीये. बरं जाऊ देत, प्रयत्न करतो नक्की जमेल तेंव्हा पोस्ट करण्याचा

   Reply
  • ऐकतो मालक.. सगळं नाही जमणार, पण अधुन मधुन प्रयत्न करीन

   Reply
 21. एक नवीन ट्रॅजिडी …!
  कहाणी मे नया ट्विस्ट !

  भुन्ग्या …साँस भी कभी बहू थी …!

  स्टोरी छान होती !!!

  Reply
  • एय.. विज्या स्टोरी नाही, खरं खरं लिव्हलं आहे रावं, खरचं नाही जमणार आहे मला :-(

   Reply
 22. सलिलशी मी १००% सहमत आहे.लिहणे बंद करणे तुला शक्य नाही.भुंगा शांत बसु शकत नाही. तुझा रव ऎकायला आम्हाला अजून आवडेल.काही काळ जावू दे, पुन्हा नविन बहार येईल तेव्हा तु येशिलच.
  मी वाट पाहीन त्या मोसमाची मित्रा…..
  एक शांत वाचक.

  Reply
  • सध्याचा हवामान खात्याचा अंदाज बघता तो मौसम लवकर येईल असे वाटत नाही, पण आशा करुयात तसंच होईल आणि भुंग्याची भुणभुण पुन्हा एकदा सुरु होईल.

   Reply
 23. हा अन्याय आहे आमच्या सारख्या वाचकांवर.
  भुंगारव ऐकण्याची सवय आमची कशी मोडणार? पण आम्हांला खात्री आहे की तुझ्याकडून न लिहून राहवनार नाही. आम्ही वाट पाहू.

  Reply
  • पंक्या खरं म्हण्तोय तू, ह्यो भुंग्या न रहावून पुन्हा चालू करणार लिहिनं, कही बी झालं तरी ही त्येला सात महिन्यानपेक्षा जादा येळ जड्डेली???(हां जडलेल्ली) सवोय हाये… वुई आर वईटिन्ग ब्रदर फोर न्येवु पोश्ट ओन यूवर बलॉग… ;)

   Reply
  • मला माहीती आहे ते पंकज, लिहुण थांबवुन नाही भागणार, पण प्रश्न आहे वेळ मिळण्याचा. असो बघु कसं जमते ते.. वेळ काढुन अधुन मधुन काहीतरी लिहीण्याचा नक्की प्रयत्न राहील मित्रा.

   बाय द वे.. तुझे फ्लिकर अमेझींगच आहे, मी आठवड्यातुन एकदा तरी तिकडे भेट देतो आणि मी किती फडतुस फोटोग्राफर (!) आहे ह्याची कडवट जाणीव करुन घेतो :-)

   Reply
   • अरे ते फोटोचे थोडेफारच जमतंय. पण तुझे ओजसचे फोटो पाहून मला पण थोडे जेलसच फील आला (लग्न करायला पहिजे लवकर).

 24. दादा, तुझ्या भावना, कामाचा व्याप अन सर्व वाचकांचे अभिप्राय वाचून तरी एवढंच सांगू इच्छितो की या व्हर्च्युअल दुनियेत मी अनुभवलेला हा पहिला दुःखद प्रकार असेल. मी जेव्हा जेव्हा वर्डप्रेसवर पहिला ब्लॉग सुरू केला होता, जुलैच्या एंडला, तेव्हा सगळ्यात पहिले मी तुझ्या ब्लॉगवर आलो होतो, अन इथे नविन विझेट्स कसे जोडावे यासाठी तु लावलेल्या “मीबो” या आयएम ऍपवर तुझ्याशी बोललो होतो, मला तो प्रसंग अजुनही आठवतोय… असो… तुझा तर मी कायमस्वरूपी ऋणी आहेच (तुझ्या मदतीबद्दल!), पण तुच इथे नसल्यावर ऋण फेडायचे तरी कसे… मान्य आहे की चेन्ज इज मस्ट, अन तु चेन्ज स्विकारावा, पण सर्वकाही एकदमच… हे सत्य न पचणारे असेल… अन तुझ्या या ब्लॉगवर ओजसचा चिवचिवाट आम्हाला दिसण्यासाठी तरी तुला हा ब्लॉग जिवंत ठेवावाच लागेल…
  नव्या वर्षाच्या आगमनावर असे विचार तर मुळीच नव्हेत, महेंद्र काकांच्या सल्ल्यानुसार पोस्ट कमी असले तरी चालतील, सातत्य नसले तरी सुद्धा चालेल, पण एकाएकी सगळं काही डिलीट मारणं, बरे नव्हे….
  च्यायला, डोळ्यातून आसू पडले लॅपटॉपच्या टचपॅडवर, म्हणलं इथं ओल्लं कसं झालं म्हणून…! ;) बाकी तुपली ती नजर झुकी झुकी वाली पोस्ट मी दर आठवड्याला री-रीड करतो म्हणलं… हां एवढ्या कमेण्ट्स येतात तुला तेव्हा त्यातील बहुतेकांच्यासारख्या माझ्याही असू शकतील या भावनेने मी कित्येकदा टाळतो… च्या(मा)यला, ही कमेण्ट लिहाच्या नांदामधी मव्हा चहा थंडागार झाला बरं… :D
  अजुन काय सांगू बरं.. अंम्मsss…. हां, आठोलं, नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अन…(बाकी कशासाठी नाही..! ;) )

  शेवटची अन महत्वाची विनंती, तू हा ब्लॉग बंद करण्यापेक्षा ही पोस्टंच पब्लिश न करता ड्राफ्ट करावी, जेणेकरून तुला या विषयावर येणार्‍या कमेण्ट्सच मिळणार नाही, कारण ही पोस्टंच कोणाला दिसणार नाही, म्हणजे तुझ्या जाण्याचा संबंधच नाही… काय….???? ;)

  - विशल्या!

  Reply
  • हो मित्रा, मला आठवतं आहे जेंव्हा आपणं पहिल्यांदा भेटलो होतो आणि तु नविन ब्लॉग चालु करण्याबद्दल विचारत होतास आणि आता बघं.. तुझा ब्लॉग माझ्यापेक्षाही छान झाला आहे. टेम्प्लेट्स पण छान आहेत आणि विजेट्स पण. असाच लिहीत रहा.

   तुझ्या सर्वच विनंत्या मान्य करणं शक्य असतं तर काय रावं बहारच झाली असती. असो, अधुन मधुन नक्की पोस्ट करण्याचा प्रयत्न करीन

   Reply
 25. Hi Aniket,
  Tumchya blog la comments denyachi hi pahilich vel. Atta kuthe marathi blog vish me vachayla suruvat keli hoti, tyat tumchya blogchi sabardast fan jhale hote. Tumchya saglya junya post sudhha vachun kadhlya. ‘Alvida’ title vachunach khup vait vatale. Tumchya post madhil kathansarkhach yala kahitari twist devun shevat god god karava hi vinanti.
  By the way, tumche hi kahi personal vichar asu shaktat. Happy New Year to u & ur family.

  Reply
  • ओ..हो!! :-( माफ करा, आणि तुमचे या ब्लॉगवर स्वागत. वाचुन आनंद झाला की माझा ब्लॉग तुम्हाला आवडला, पण खरंच कारणच तसं आहे त्यामुळेच हा निर्णय घेतला. तरीही शक्य झाल्यास अधुन मधुन काहीतरी पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करीन

   Reply
 26. अनिकेत, तुम्ही ब्लॉग बंद करताय हे वाचून निश्चितच वाईट वाटत आहे. तुम्ही लवकरच ब्लॉग वर परत याल. अशी आशा करतो. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!

  Reply
  • :-( दुःख मला पण झाल आहे. मी सुध्दा आशा करतो की लवकरच वेळ मिळे आणि ब्लॉगवर परत पोस्ट करता येईल.

   नवीन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा!!

   Reply
 27. आपल्या भावी जीवनासाठी शुभेच्छा…
  या ब्लॉगवर किंवा अजून कुठे… पण लिहीत रहा!

  आल्हाद

  Reply
 28. Aniket are ekdam Alvidach karun taku nakos……vadhate vyap, jababdarya yatun puresa vel family sathihi deta yet nahi ani tyat ha ek bhunga lavoon ghyayacha mhanje….. kalatey mala. pan adhun madhun lihit raha re. arthaat ithe nahi tari maitri rahilach shivay tuzya navin blog var madhun madhun lekha yetilach.:) Happy New Year and Best Luck.

  Reply
  • भाग्यश्री,
   हो, अधुन मधुन नक्की लिहीण्याचा प्रयत्न करेन. बाकी मैत्री तर नक्कीच राहील, ऑर्कुट झिंदाबाद :-)

   Reply
 29. तुमच्याकडून हे अलविदा पूर्णपणे अनपेक्षित होते. आम्ही इथे नवीन वर्षी काय काय लिहायचे हे ठरवतो आहे आणि तुम्ही एकदम अलविदा वैगरे. This is not fair yaar. We will miss your posts.

  Reply
  • :-) अधुन मधुन पोस्ट करण्याचा प्रयत्न राहील

   Reply
 30. अरे अनिकेत………..हे काय ऐकतोय मी? सुट्टीवर असताना ही मनहूस खबर येऊन पोहोचली आणि लगेच सर्फ केलं.
  काहीही काय? तू थोडा वेळ नक्की काढू शकशील……
  आमच्या स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलंयं, “पोट भरावयाची विद्या । ते म्हणू नये सद्‍विद्या ॥” … एका चाकोरीत्, पोटासाठी माझ्यासारखे असंख्य पळतात रे… पण तुझ्यासारख्या प्रतिभावान माणसाने असे अचानक थांबू नये असे मला वाटते…
  विचार कर… तुझ्या पुढील जबाबदार्‍या आणि नूतन वर्षासाठी शुभेच्छा !!!!!!!!!

  Reply
  • एल.ओ.एल.. प्रतिभावान!!!

   तु पण ना!!, करीन वेळ मिळेल तेंव्हा पोस्ट अधुन मधुन

   Reply
 31. He Deva tula ekch magan ki Bhungyachya manat bhunbhunara “N lihinyacha “ha vichar kadhun tak an tyala lihinyasathi vel de…

  BTW Hi pan post chan jamliye….Pudhchi post kenva takatay?vat pahatoy….

  Reply
  • Pudhchi post kenva takatay?vat “pahatoy….”
   :-) वेळ मिळेल तेंव्हा नक्की करेन

   Reply
 32. अनिकेत,
  काय सांगू मी तुला? आताच महेंद्र्जी ना सांगून आले. किती जणांना दुखी: केलेस? असे काही करू नये. कमी पोस्ट असुदे पण निदान महिन्यातून एकदा तरी लिही. तू बंद करण्याचा
  ठाम विचार केलेलास दिसतोय. चुकीचा विचार आहे. कारणे आपल्यापेक्षा मोठी करायची नसतात.

  Reply
  • - कमी पोस्ट असुदे पण निदान महिन्यातून एकदा तरी लिही.

   - कारणे आपल्यापेक्षा मोठी करायची नसतात.

   अनुजाताई, तुमचे बोलणे कोण टाळु शकतो.. भुंग्याने ऐकले.. :-)

   Reply
 33. Oh God!! No way. Please अस नका करु. जो ब्लोग वाचुन पोट धर-धरुन हसले, जो ब्लोग वाचुन आपणहि ब्लोग लिहावा असे मनापासुन वाट्ले त्या ब्लोगला निरोप देन्याचि अजिबात इछा नाहि.
  मला माहित आहे तुम्ही लिहाल परत, माज़्यासारख्या तुमच्या वाचकांसाथी.

  Reply
 34. रस्मे-उल्फत सिखा गया कोई
  दिल की दुनिया बसा गया कोई

  वक़्त-ए-रुख्सत गले लगा कर ‘दाग़’
  हँसते हँसते रुला गया कोई

  Reply
  • कोई राह तुझे ना विरान मिले
   हर राह को एक अंजाम मिले

   चेहरे पे नही दिले पर भी हो
   तुझको ऐसी मुस्कान मिले

   Reply
 35. he kay aniketrao,
  navin varshacha ekdum dhakaach dila tumhi, me suddha tumchya blog chi niymit vachak ahe, ha comments nahi takat tari pan tumchya blogchi savay jhali ahe ani ata tumhi lihnaar nahi, kase shakya ahe, ugach navin varshachya shurvatila nako to dhakka deu naka, keep writing, pleaseeeeeeeeee

  Reply
  • नक्की साधना, अधुन मधुन लिहीण्याचा प्रयत्न राहील

   Reply
 36. काही लिखाण बंद करू नकोस …. लिहिता हो मस्त पैकी.. जितके आणि जसे जमते तसे … मी बघ जमेल तसे लिहितो आहेच ना … ४-४ ब्लोग्स वर एकावेळी .. :D

  Reply
 37. अनिकेत ही पोस्ट वाचून प्रतिक्रिया देण्याचे सुद्धा टाळले होते. मराठी ब्लोग विश्वाचे आधारस्तंभ निघून गेले या बिन भिंतीच्या घरातून तर हे घर पोरके नाही का होणार. आता ह्या आधार्स्ताम्भाने पुण्याला ब्लॉगर्स मेळावा आयोजित करून पुन्हा पूर्ण जोमाने सुरुवात केल्याने फार आनंद झालाआहे.

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s