बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह


शालेय जिवनात शिकलेल्या बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह इमेलमधुन मला आला होता तो इथे जोडत आहे. या सुमधुर गितांचा गोडवा आणि चाली तुमच्याही मनामध्ये अजुन रेंगाळत असतील याबद्दल शंका नाही.
हा संग्रह संगणकावर उतरवुन घेण्यासाठी इथे टिचकीमारा.

संग्रहामध्ये पुढील गितं समाविष्ट आहेत.

– केवढे हे कौर्य – ना.वा.टिळक
– कणा – कुसुमागज
– या झोपडीत माझ्या – संत तकु डोजी महाराज.
– खबरदार जर टाच मारनी – वा. भा पाठक
– आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे – बालकवी
– उठा उठा चिऊताई- कुसुमागज
– श्रावणमासी हर्ष मानसी – बालकवी
– रे हिंदबांधवा, थांब या स्थळी – भा. रा. तांबे
– खोपा – बहीणाबाई
– मन वढाय वढाय – बहीणाबाई
– पिंपात मेले ओल्या उंदिर – बा.सी.मढेकर
– एका तळयात होती – ग.दि.माडगूळकर
– पैठणी – शांता शेळके
– गाई पाण्यावर – कवी बी
– फुलपांखरं – ग.ह.पाटील
– टप टप टाकित टापा – शांता शेळके
– आजीचे घडाळ – केशवकुमार औदुंबर
– पेम कर भिललासारख
– फ़ुलराणी – बालकवी
– गवतफुला – इंदिरा संत
– तुतारी – केशवसुत
– विचत वीणा – बा. भ. बोरकर
– गणपत वाणी – बा.सी. मढेकर
– सहानभूती – कुसुमागज
– आम्ही कोण? – केशवसुत
– सागरा पाण तळमळला ! – सवा. विनायक दामोदर सावरकर
– लेझिम चाले जोरात – श्रीधर बाळकृष्ण रानडे
– लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी – सुरेश भट
– मधुघट – भा. रा. तांबे
– नको नको रे पावसा …!! – इंिदरा सतं
– किती तरी दिवसांत – बा. सी. मढेकर
– देणाऱ्याने देत जावे – विंदा करंदीकर
– पृथ्वीचे गित – कुसुमागज
– घरटा – बालकवी
– या नभाने या भुईला दान – ना. धो. महानोर
– अरे, संसार संसार – बहीणाबाई चौधरी
– उगवले नारायण – बिहणाबाई चौधरी
– बाळ, चालला रणा – पदमा गोळे
– अनामवीरा – कुसुमागज
– उतुंग आमुची उतर सीमा इंच इंच लढवू – वसतं बापट
– खरा तो एकची धर्म – साने गुरजी
– घाल घाल पिंगा वाऱया – कृ . ब. निकुंब
– देवाचे घर – ग. दि. माडगूळकर
– आई’ महणोनी कोणी, आईस हाक मारी – यशवंत
– रदास आवाहन – भा. रा. तांबे
– कोठुनि येते मला कळेना – बालकवी
– निझररास – बालकवी
– सांग मला रे सांग मला – ग. दि. माडगूळकर
– आली बघ गाई गाई – इंदिरा संत
– देवाचे घर – ग.दि. माडगूळकर
– माझ्या छकुलीचे डोळे – वि. भि. कोलते
– शतकानंतर आज पाहिली – वसंत बापट
– पारवा – बालकवी
– तळयाकाठी – अनिल
– माझ्या मराठीची गोडी -वि. म. कुलकणी
– अ आ आई, म म मका – मधुसूदन कालेलकर
– चढवू गगनी निशाण – बा. भ. बोरकर
– गदड निळे – बा. भ. बोरकर.
– या बाई या… – दतातय कोडो घाटे
– बाळ जातो दुर देशा- गोपीनाथ
– बाभुळझाड – वसतं बापट
– कोलंबसचे गवरगीत – कुसुमागज
– आम्ही कोण? – प. के . अते
– सवारतमका शिवसुंदरा – कुसुमागज
– गे मायभू- सुरेश भट
– जयोऽस्तुते – विनायक दामोदर सावरकर
– थोर तुझे उपकार – भासकर दामोदर पाळंदे
– महाराष्ट्र गीत
– हा हिंद देश माझा – आनंद कृष्णाजी टेकाडे
– गाउं तयानं आरती – कवी यशवंत
– कण-र श्रीकृष्ण संवाद – मोरोपंत
– फटका – अनंत फं दी
– घड्याळ – केशवसुत
– ऐकव तव मधु बोल – माधव ज्युलीयन
– चिमणा राजा – दामोदर अचयतु कारे
– अनंत – बालकवी
– टप टप पडती अंगावरती – मंगेश पाडगावकर
– सदैव सैनिका, पुढेच जायचे – वसतं बापट
– पसायदान – संत ज्ञानेश्वर
– संथ निळे हे पाणी – मंगेश पाडगांवकर
– पितात सारे गोड हिवाळा – बा. सी. मढेकर
– पेमस्वरुप आई – माधव ज्युलियन
– कोकिलानय – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– बाभळीविषयी अनयोकि – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– विदाप्रशंसा – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– झाल्या तिन्ही सांजा – यशवंत
– कशासाठी पोटासाठी – माधव ज्युलियन
– कादरखां – केशवकुमार
– लाडकी बाहली – शांता शेळके
– मामाची गाडी – ग. ह. पाटील

265 thoughts on “बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह

  1. Vijay Dhondiram patil

    Mala ” tatya kathi gaati lata,
    Latanmadhe ubhe zaad ”
    Hee dheevar pakshyavar lihileli kavita are.
    Tasech,
    ” Ghatatali vaat, kay ticha that”
    Ya donhi kavita pahijet.
    Please, Mala konitari pathva na…

    Reply
  2. Pallavi Gaikwad

    Ghatatli wat kay ticha that
    murakate girakate lavate pathoath
    nili nili pardi khali koni padli
    pane phule sandli var ani khalti…

    Pls mirtano tumha konakade hi kavita aslyas,tumhala sapdalyas mala ya id var send kara.

    Reply
  3. Pallavi Gaikwad

    Ghatatli wat kay ticha that,
    murakte girakte lawte patho path.
    Nili nilipardi khali koni sandali
    pane phule sandli war ani khalti.
    Khali khol dari ,war unch kada ,
    bhala motha nag janu phana kadhun ubha.
    Bhiu naka koni pakhranchi gani,
    sobtila gat gat khalalt pani …..
    Pls mala konitari sangana hi kavita konakade aheka te.
    Kharach asel tar mala nakki mala pathwa.

    Reply
  4. Ashwini Mahadik

    maze baba nehmi ek kavita mhanatat Kari aarti gheuni aary bala …… milel ka plz konal mahit asel tar

    Reply
  5. NAMITA RAUT

    jr konakde
    पलीकडे ओढ्यावर माजे गाव ते सुंदर …….

    अशी काही तरी एम कविता होती ३ री ४ थी ला
    please konakade asel tr send kra.

    Reply
    1. Raju Chalke

      पलीकडे ओढ्यावर
      माझे गाव ते सुंदर,
      झाडाझुडपांत आहे
      लपलेल्रे माझे घर

      माझ्या गावातून जाते
      चिमुकली हीच वाट,
      मला ओढुनिया नेते
      माझ्या घराशी ही थेट

      पिंपळाच्या झाडाखाली
      लहानसे माझे घर,
      तुळशीचे वृंदावन
      चिरेबंदी ओट्यावर

      माझी आई येते दारी
      माझ्या भावंडांचा मेळा,
      घरी गेल्यावर होतो
      माझ्या भोवताली गोळा

      कमा सुमा अरु चंदू
      भाऊ आला म्हणतात
      मिठी मग सोडवावी
      हातावर खाऊ देत

      Reply
    1. SURESH SAMBHAJI POHARE

      घाटातली वाट
      काय तिचा थाट ,
      मुरकीते, गिरकीते , लवते पाठोपाठ ||
      निळी -निळी परडी ,
      कोणीi केली पालथी ,
      पान, फुल सांडली
      वरात i नाही खालती ..||1||
      खाली खोल दरी,
      वर उंच कडा,
      भाला मोठा नाग जणू
      उभा काढी फडा ||2||
      भिऊ नका कोणी ,
      पाखरांची गाणी ,
      सोबतीला गाता गाता
      खळाळत पाणी ||3||
      घाटातली वाट ,
      काय तिचा थाट ,
      गाणी म्हणू , टाळ्या पिटू ,
      जाऊ रुबाबात ..!!

      Reply
    2. संजय मोरडे

      कुणाकडे
      विटी दांडूचा खेळ मजेदार
      गुंग झाला बाळ खेळन्यात
      ही कविता असेल तर
      माझ्या 9867574586 ह्या नंबर वर पाठवा

      Reply
    1. Suresh Shirodkar

      बालभारती” आणि कुमारभारतीमधील संकलित कवितांचा आनंद घेण्यासाठीची लिंकवर क्लिक करा.
      ​http://balbharatikavita.blogspot.in

      Reply
  6. Harshada maruti kulkarni

    अप्रती…आठवणी जाग्या होतात..ही नावं वाचून

    Reply
  7. Pallavi Gaikwad

    Hi. konala sapadali ka ti kavita?
    Talya kathi gati lata,lata madhe ubhe zada.
    Zadawar dhivaraj…,..

    Ajun ak kavita pahije….
    Ghtatali wat kay ticha that
    murakate girakate lawate patho path …..
    Pls ya don kavita konakade asalya,konala bhetal tr mala sand kara.

    Reply
    1. Shilpa Madkar

      घाटातली वाट
      काय तिचा थाट ,
      मुरकीते, गिरकीते , लवते पाठोपाठ ||
      निळी -निळी परडी ,
      कोणीi केली पालथी ,
      पान, फुल सांडली
      वरात i नाही खालती ..||1||
      खाली खोल दरी,
      वर उंच कडा,
      भाला मोठा नाग जणू
      उभा काढी फडा ||2||
      भिऊ नका कोणी ,
      पाखरांची गाणी ,
      सोबतीला गाता गाता
      खळाळत पाणी ||3||
      घाटातली वाट ,
      काय तिचा थाट ,
      गाणी म्हणू , टाळ्या पिटू ,
      जाऊ रुबाबात ..!!

      Reply
          1. Prathamesh pachpande

            ही कविता मिळेल का?
            वनी खेळती बाळ जे बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लावांचे

    2. Milind Dhokre

      कविता – धीवर पक्षी
      ——————————
      तळ्याकाठी गाती लाटा
      लाटांमध्ये उभे झाड
      झाडावर धीवराची हाले चोच लाल जाड
      शुभ्र छाती पिंगे पोट
      जसा चाफा यावा फूली
      बंडी जणू थंडी मध्ये
      बंडी घाले आमसुली
      गड्या पाखरा तू असा
      सारा देखणा रे कसा
      पाण्यावर उडताना नको मारू मात्र मासा

      Reply
      1. मदन काशिनाथ साळुंके

        धन्यवाद मिलिंद,
        खूप दिवसांपासून हि कविता आठवायचा प्रयत्न करत होतो. अपलोड केल्याबद्दल खूप धन्यवाद.. बालपण आल्यासारखे वाटते आहे ही कविता वाचताना..

        आभार,
        मदन काशिनाथ साळुंके.

        Reply
        1. वसंत सोळंकी

          कोणाकडे आला अश्विन अश्विन ही कविता असेल तर mail करा किंवा खालील no वर whatsapp करा, please

          Reply
  8. Pallavi Gaikwad

    Tula hi kavita mahit ahe ka?
    Bolat ka nahi?
    gade tu bolat ka nahi?
    Zale kay tula bai,
    gade tu bolat ka nahi?

    Hi pan kavita sapadali asel tar pls mala sanga.konala hi sapadali tari mala pls sanga.

    Reply
      1. SANJAY PATIL

        आपल्याकडे सुगी ही कविता आहे का…चला मर्दांनो चला बयांनो म्हणा गाणं आता म्हणा गाणं सोन्याच्या ताटाला मोत्याच दाण.अश्या काहीतरी ओळी होत्या 1972 to 1976 दरम्यानच्या इयत्ता 4थी पर्यंत असावी बहुतेक

        Reply
        1. Shilpa

          Thodich aathavtey. Music composed by Kamlakar Bhagwat

          देवाचं देणं हे देवाचं देणं
          सोन्याचा ताटाला मोत्याचं दाणं
          पिकला शाळू परोपरी
          चढली कणसं…….
          गोफण फिरवू माथ्यावरी

          खळं दाण्याचं तळ मोत्याचं
          लुटू वाण आम्ही लुटू वाण

          Reply
    1. Vijaya Bobde

      बोलत का नाहीं,झाले काय तुला बाई
      चोली परकर नवीन शिवले
      दाग़ दागिने सर्व घातले
      चूल बोलके जवल मांडिले
      दिले सर्व काही,तरी तू बोलत का नाहीं
      आई तुजला रागे भरली,
      की दादाने खोड़ी केली
      रूसली माझी बाल सोनुली
      काय करु बाई,गड़े तू..
      सांग तुला का भूक लागली,
      देऊ का मी लाटुन पोली
      ओलखले बाई,तरी तू बोलत..
      शेजारीण वेणुचा बाहुला
      नवरा तुजला आज पाहिला
      म्हनुनी लाजूनि धरसी अबोला
      कले सर्व काही,झाले काय तुला बाई..

      Reply
  9. Pallavi Gaikwad

    Hi everyone!

    Mala kharach ya page var yeun far bar vatate.
    jehva thakaleli aste kivha dokyala far tras hot asto,jiv vaitaglela asto tevha mi
    ithe ya page var yete.
    Bar vatat,junya athavani dolyan samorun firu lagtat…
    Mi punha lahan hote ani tyach chhotyasha duniyet jaun basate..
    Thakawa jato sara.
    Kharach khup khup “Dhanyawad”
    he sundar page dilya baddal…

    Reply
    1. Milind Dhokre

      ही कविता काहीशी अशी आहे,

      पोर खाटेवर मृत्यूच्याच दाढा
      कुणा गरिबांचा तळमळे बिचारा

      Reply
  10. Atish magar

    Mazya aajila ek kavita hoti abhimanyuchi ti mala havi aahe konakde asel tar plz dya kaviteche bol aahet pahate uthuni dharmane kay kele abhimanyula bolavale

    Reply
    1. मंजिरी

      ऐषा भोळ्या चतुर रे,बालपणीच्या गोविंदा
      हे गाणं कुणाला येतंय?
      मंजिरी

      Reply
  11. मदन काशिनाथ साळुंके

    तळ्याकाठी गाती लाटा
    लाटांमध्ये उभे झाड..

    ही पुर्ण कविता मिळेल काय?
    आणि शंकर पाटील यांचे खेळखंडोबा हे पाठ्य मिळेल काय?

    Reply
    1. Aarya Tari

      khup chaan……..spl thanks of u
      mi ajun ek kavita shodhatey…..mi 4th la astana hoti ……Aaichya kushit jagle nivant…..kadhi na bhasli kashachich bhrant….
      plz hi kavita tumhala kuthe milali tar mala share kara……tumchya parents na kadachit mahit astil ya kavitechya oli……….

      Reply
  12. Shree

    घन नीळ सागराचा घन नाद येत कानी hi kavita havi ahe mla…mi khup miss kartoy

    Reply
    1. Aarya Tari

      Ghan neel sagracha Ghan naad yet kaani
      Ghumti disha dishant lahri madhil gaani
      Chaufer suryajwala , wara abol shaant
      Kothe samudra pakshi gagani fire niwant
      Aakash tej bhare madavari ssthirave
      Bhatki chukar hodi ladat santh dhave
      Valut stabdh zala rekhakruti kinara
      Javli asun paani atrupt to bichara….

      Reply
    1. Vinayak Bhide

      सुसंगती सदा घडो या कवितेतील या ओळी आहेत

      On 22 Jan 2018 6:40 pm, “डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा” wrote:

      > kishor ashtikar commented: “hi kavita milel ka…krutanta katkamal dhawj > jara diso lagali..” >

      Reply
    2. श्री विनायक भिडे

      तुम्हाला हव्या असलेल्या ओळी सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो या कवितेतील आहेत

      Reply
  13. Sameer Deshmukh

    Kona kade hi kavita aahe ka?
    Jalave anantat maaze jine he mala dhyas mi kon he janane
    sada baddh padmasana manduni mi dishanchi baghe langhnya kumpane…

    I have almost the whole version but one line in between doesn’t seem to be fit. I suspect the version has a missing line… It’s supposed to be the Sun’s answer to ‘pruthviche premgeet’… posting below the version I have:

    जळावे अनंतात माझे जिणे हे मला ध्यास मी कोण? हे जाणणे
    सदा बद्ध पद्मासना मांडुनी मी दिशांची बघे लंघण्या कुंपणे

    निराहार मी भस्म भक्षुनी माझे तपस्या किती उग्र केली युगे
    किती दंडिला देह विच्छिन्न केला अजुनी पहा साक्ष देती भगे

    तपाच्या गुणे अंश माझे सभोती फिरू लागले होउनी सेवक
    परी विक्रमे शांती ये ना मनाला जरी तेज त्याचे चिरंजीवक

    अकस्मात आले फळा पुण्य माझे तुझ्या दृष्टीला दृष्टी गे भेटली
    सखे पृथ्वि! अर्धांगिनी तूच माझी प्रचीती अशी अंतरी वाणली

    तुझी रक्तकांती, हरिद्वेषभूषा, पदन्यास, रत्नांग, आभूषणे
    बघुनी जडे वेध तुझा जिवाला सले जिवीचे तीव्रतेने उणे

    आये भिल्लिणी! हास्य पाहुनी तुझे तपस्या विसर्जुन मी हासलो
    **************This line is missing*****************

    तपस्या दुजी श्रेष्ठ गे प्रीति तुझी असे पेटले अंतरी स्थंडील
    तुला त्यातल्या लाल दावा सुमांनी सदा अर्पिती प्रीति ऊर्जस्वल

    जरी अंतरे आपुलाली मिळाली रहावे दुरी योजने आपण
    विधीची जरी योजना क्रुर ऐशी मनांचे पुरे गोड हे मिलन

    वृथा दग्धहस्ते धरावी कशाला अपेक्षा तुझा हात घ्याया करी
    करू पाप कैसे तुला स्पर्शण्याचे जगाचे कसे शाप घेऊ शिरी

    नको चुंबने आणि आलिंगने गे पुरे प्रीति दृष्टी – भेटीतली
    फळा आणुनी तीच पितृत्व मोठे दिले तू मला कामिनी, माउली

    जधी व्यास ओंकार उच्चारूनी गे मला अर्घ्य द्यायास झाला उभा
    सखे प्रीतिची सांगता दिव्य झाली जगा आणखी झाग आली नभा

    दणाणून गेल्या दिशा मंत्रघोषे महाप्राण सांगे जगत्कारण
    न तू धुली गे तूच माता जगाची तुझ्या पोटी घे जन्म नारायण

    Reply
      1. दीपाली कात्रे

        म्हणो विश्व झाला तपोभंग माझा,वृथा नित्य मी भाजलो लासलो

        Reply
    1. Ninad Kulkarni

      please post a poem – The words I vaguely know are

      कुजबूज कुजबूज कुजबूज रे
      चंदनाच्या झाडाखाली पाय का वाजे
      चंदनाच्या झाडाखाली आल्या सावल्या
      दिवसाच्या ऊन्हानं त्या होत्या कावल्या……

      Reply
      1. Rajendra Patil

        मला आठवते ते असे (sometime 1969):
        खुजबुज खुजबुज खुजबुज रे
        चंदनाच्या झाडाखाली माती का गळे…

        पुढील ओळी आठवत नाहीत. कुणी सांगेल काय?

        –durganandaswami@gmail.com

        Reply
        1. sonamnk

          I just got one more stanza for the poem probably the concluding one.

          नका धावू नका पळू
          जमा सारे हळूहळू
          हरणांनो पाडसांनो कोंडीत शिरा
          पारध्याला हिव आले आज न दगा

          Please send me full poem if you get.
          ninadkulkarni1966@gmail.com

          Reply
        2. Vilasini

          Kari aarati gheuni aryabala
          Tvare patalya Narmadechya tatala
          Karuni tayanni sarit pujanala
          Pravahi dili soduni deepmala -1
          Aha kay shobha vadu tya kshanachi
          Trusha shant zali madiye kshanachi
          Tada astagami Jari anshumali
          Mana vatale yamini kay zali – 2
          Saritpatra te svachha taise vishal
          Tada bhasale ki duje antaral
          Tati tyavari shobhali deepikanchi
          Udeli jano pankti ti tarakanch – 3
          Jashi anrarikshi phire chandra kor
          Pravahi kari ramya nauka vihar
          Nabhi swair sancharati megh khand
          Jali khelati vichi taisha udand- 4
          Ashi divya shobha pahata pahata
          Mani shant zalo laya jay chinta
          Zali suchali kalpana ek chitta
          Ase sarva srushtich jee mulbhuta- 5
          Dile soduni deep jai balikanni
          Dila sarikha veg sarva tayanni
          Tayanchi sthiti takkshani bhinna zali
          Vari drushya koni kuni jay khali – 6
          Kuni guntuni rahile bhovaryat
          Jaloughasave jay koni vahat
          Tayatil kahi tata anya gele
          Pudhe jauni alpa magechi aale- 7
          Jase deep tase asakhyat jeev
          Prabhu nirmito thor jyacha prabhav
          Taya soduni det kal pravahi
          Vahati taduaghasave sarva dehi – 8
          Kuni rank hoi kuni hoy raja
          Duja dekhana ho tija heen teja
          Kuni murkha hoi kuni ho shahana
          Kuni dhairyashali tasa bhyad jana- 9
          Tase ka karave? Ase mi karin
          Vrutha valgana manavanchya ajan
          Sthiticha ase kinkar pranimatra
          Sthiti tya kari patra kivva apatra – 10
          Jari rahile Narmada teer dur
          Jari aaj bala na drushti samor
          Smaroni tari deepsargaprasang
          Zani harshayoge bhare antarang – 11
          Kaviteche nav- Deep visarjan
          Kavi- Madhavanuj

          Reply
      2. जयंत गाडगीळ

        हरणांनो, पाडसांनो

        खुजबुज खुजबुज खुजबुज खुजबुज
        खुजबुज खुजबुज खुजबुज रे.
        चंदनाच्या झाडाखाली पान का वाजे?
        चंदनाच्या झाडाखाली आल्या सावल्या
        दिवसाच्या उन्हाने त्या होत्या कावल्या,
        नका धावू, नका पळू,
        जमा जमा हळू हळू,
        नका देऊ कोणा कळू,
        हरणांनो, पाडसांनो, कळपात या,
        पाय नका वाजवू रे, कडे करा, या. 1

        भुसभुस फुसफुस भुसभुस फुसफुस
        भुसभुस फुसफुस भुसभुस रे
        चंदनाच्या झाडाखाली माती का गळे?
        चंदनाच्या झाडाखाली रात निजली,
        जागल्याच्या झोपडीत बत्ती विझली,
        पान वाजे खुसूखुसू,
        माती गळे भुसूभुसू
        ससा करी फुसूफुसू
        हरणांनो, पाडसांनो, कोंडीत शिरा,
        हरणांनो, हरिणींनो, पहारा करा. 2

        लुकलुक टुकटुक लुकलुक टुकटुक
        लुकलुक टुकटुक लुकलुक रे.
        चंदनाच्या झाडावरी काय लकाके?
        चंदनाच्या झाडावरी उतरे परी,
        काजव्यांना चांदण्यांना नाचते करी.
        फूलकळी पान पान
        उजळले सारे रान,
        कशी मजा छान छान!
        हरणांनो, पाडसांनो, बघा रे बघा,
        पारध्याला हिव आले, आज न दगा. 3

        कुजबुज कुजबुज कुजबुज कुजबुज
        कुजबुज कुजबुज कुजबुज रे,
        चंदनाच्या झाडातून कोण गातसे?
        चंदनाच्या झाडातून रातकिडे रे
        घुमविती कलगी नी डहाळ्या डिरे,
        किर्र किर्र कीण कीण
        छूम छूम झन झन
        टवकारा तुमचे कान,
        काळविटा, नको रोखू शिंग उभारू,
        नको सोडू रवंथाला बैठक मारू. 4

        किलबिल चिवचिव किलबिल चिवचिव
        किलबिल चिवचिव किलबिल रे,
        चंदनाच्या झाडामागे कोण उगवे?
        चंदनाच्या झाडामागे चंद्रचकोर
        पालवीत तांब फुटे, उठे सुकीर,
        जागे झाले शेतमळे
        जागे झाले तळे खळे
        उभे पीक सळसळे,
        पाडसांनो, हरणांनो, काळविटांनो,
        पाखरांनो, कोकरांनो, शेतकऱ्यांनो… 5

        कवि र.वा. दिघे

        Reply
  14. लक्ष्मीकांत

    मला आवडते वाट वळणाची
    ही कविता कुणाकडे असेल तर नक्की पाठवा।

    Reply
    1. Akash Jadhav

      वाट
      मला आवडते वाट वळणाची
      दाट झाडीची नागमोडीची
      ही अलिकडची, नदीच्या थडीची
      मला आवडते वाट वळणाची

      मला आवडते वाट वळणाची
      सरघसरणिची पायफसणीची
      लवणावरची पानबसणीची
      मला आवडते वाट वळणाची

      मला आवडते वाट वळणाची
      अशी भुलवणिची हुलकावणीची
      सागवेळूच्या भर रानीची
      मला आवडते वाट वळणाची

      मला आवडते वाट वळणाची
      जरा अडचणिची चढउतरणीची
      घाटमाथ्याची ती पलिकडची
      मला आवडते वाट वळणाची

      मला आवडते वाट वळणाची
      इथची तिथची कधी कुणिकडची
      क्षितिजाकडची पुढची पुढची
      मला आवडते वाट वळणाची

      — अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)

      Reply
  15. कल्पेश पवार

    मी पाचवीला असताना म्हणजे 1998-99 साली मराठीतची एक कविता होती तिचे बोल काही से आठवतात…. कुणाला चांगल आठवत असेल तर plz correction करा…update करा.
    ।।@हसावी पहाट घरोघरी@।।
    घोटभर पाणी
    घासभर चारा
    मायेचा उबाळा
    मिळो सर्वा।।
    आभाळ इवले
    असो शिरावर
    हात पाटीवर
    शक्ति-शाली।।
    जळोना शरीर
    ऊन-पावसात
    कुणी लक्तरात
    राहू नये।।
    ओठावर हसू
    फुलो सदाकाळी
    वाजवावी टाळी
    सुखा-सुखी।।
    सर्वांच्या पावला
    मिळो एक वाट
    हसावी पहाट
    घरोघरी।।

    Reply
  16. LOKANAND JAMBHULKAR

    महोदय
    उठ गोपाड़जी चाल धेनुकड़े पाहती सौंगड़े वाट तुझी
    ही कविता मला हवी आहे कृपया कुणीतरी कड़वा
    सधन्यवाद

    Reply
  17. amol yewalkar

    मला “वृद्ध चंदन ते माझे नित्य जपले जपेन त्याच्या साठी आण त्याची जीव ठेवीन गहाण” ही चंदन कविता हवी आहे
    कृपया पोस्ट करा

    Reply
  18. Prakash Ranade

    Mala Ye Ye Ghari Mazya Dari Chara pani ghe tari hi kavita havi ahe. Kunala purn kavita yet asalyas pathava

    Reply
  19. Ninad Kulkarni

    please post a poem – The words I vaguely know are

    Kujbuj kujbuj kujbuj re chandanachya zadakhali ran ka vaje
    chandanachya zadakhali alya savalya
    divasachya unhan tya hotya kavalya…..

    Reply
  20. प्रदिप काशिनाथ कोळंबे

    वास्तल्य हा विषय वाचला मिळेल का

    Reply
  21. संजय मोरडे

    कुणाकडे विटी दांडूचा खेळ मजेदार
    दुम लोटूनी आलीय बहार
    गुंग खेळण्यात एक बाळ खेळण्यात

    Reply
  22. SURESH SAMBHAJI POHARE

    आवडतो मज अफाट सागर
    अथांग पाणी निळे
    निळ्या जांभळ्या जलात केशर
    सायंकाळी मिळे
    फेस फुलांचे सफेद शिंपीत
    वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येति
    गट किनाऱ्या कडे
    मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
    दंगल दारियावर करणाऱ्या वाऱ्यांच्या संगती
    संत सावली दिसते जेव्हा सागरही गर्जतो
    त्या वेळी मी चतुर पनाने दूर जरा राहतो
    खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
    ढगा ढगांना फुटते तेव्हा सोनेरी पालवी
    प्रकाश दाता जातो जेव्हा जलखालच्या गंघरी
    नकळत माझे हात जुळुनी येते छातीवरी

    ( हि माझी सर्वात आवडती कविता )

    Reply
    1. Shilpa Madkar

      आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे

      निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

      फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
      हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

      मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
      दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

      तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
      त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

      संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
      देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

      क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
      ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

      प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
      नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

      ——-कुसुमाग्रज

      Reply
  23. Raghunath Sonar.Dombivli

    Ek Juni Kavita – sadharan 60 varsha juni milalyas pathavave krupaya…

    Por khatewar mrutyuchyach dhara, kuna garibacha kalvale bichara…

    Krupaya milalyas pathavave. Thanks in advance

    Reply
  24. TUSHAR

    कुजबूज कुजबूज कुजबूज रे
    चंदनाच्या झाडाखाली पाय का वाजे
    hi kavita konakade asel tar plz post kara..

    Reply
    1. sonamnk

      I just posted one more stanza for this poem. Please share the full poem if you get.

      नका धावू नका पळू
      जमा सारे हळूहळू
      हरणांनो पाडसांनो कोंडीत शिरा
      पारध्याला हिव आले आज न दगा

      Reply
  25. sonamnk

    Hi Tushar and Rajendra Patil & all,

    I got one more stanza for Kujbuj Kujbuj Kujbuj re……… probably the concluding stanza.

    नका धावू नका पळू
    जमा सारे हळूहळू
    हरणांनो पाडसांनो कोंडीत शिरा
    पारध्याला हिव आले आज न दगा

    Reply
    1. S P

      हरणांनो, पाडसांनो, कोंडीत शिरा,
      हरणांनो, हरिणींनो पहारा करा|
      [सुरूवात थोडीशी आठवते:]
      कुजबुज, कुजबुज, कुजबुज, कुजबुज|
      कुजबुज, कुजबुज, कुजबुज, कुजबुज रे||
      चंदनाच्या झाडाखाली पान का वाजे||
      चंदनाच्या झाडाखाली आल्या सावल्या|
      दिवसाच्या उन्हाने त्या होत्या कावल्या||
      कुजबुज, कुजबुज, कुजबुज, कुजबुज|
      कुजबुज, कुजबुज, कुजबुज, कुजबुज रे||
      चंदनाच्या झाडाखाली कोण गातसे?
      चंदनाच्या झाडाखाली उतरे परी
      काजव्यांना, चांदण्यांना नाचते करी
      [मधे काही कडवी आहेत, त्यातली एक ओळ:
      काळविटा नको रोखू शिंगं उभारू
      नको सोडू रवंथाला बैठक मारू]

      फूलकळी, पान पान, उजळले सारे रान
      मजा कशी छान छान
      हरणांनो, हरिणींनो कळपात या
      पारध्याला हिंव आले,आज न दगा

      Reply
      1. Rajendra Patil

        ज्याला ह्या ओळी (हरणांनो पाडसांनो…) आठवल्या, त्याला शतशः आभार. —राजेन्द्र पाटील, भुसावळ

        Reply
      2. S. P.

        मघाच्या ओळीत दुरूस्ती:
        ‘हरणांनो, हरिणींनो बघा रे बघा|
        पारध्याला हिंव आले आज न दगा||

        आणखीही थोडी आठवली. ही ओळ दुसऱ्या किंवा तिसऱ्या ‘कुजबुज..’ नंतर असावी.
        चंदनाच्या झाडाखाली रातकिडे रे|
        घुमविती कलगी नि डहाळ्या डिरे||

        Reply
        1. S. P.

          ही कविता हळुहळू उलगडत जातेय. आणखी एक ओळ:
          हरणांनो, पाडसांनो कळपात या|
          पाय नका वाजवू रे, कडे करा, या||

          Reply
  26. दिपक शिंदे

    तुझ्या घराला वाट जात असे
    ही पूर्ण कविता मिळेल का

    Reply
  27. Rahul

    शाळेत असताना मराठी पुस्तकात हि कविता होती. मला फक्त दोन ओळी आठवतात –

    पिंपळाच्या पायाशी पाचोळा पाचोळा
    थोड्या चकाट्या पिटाया पोरे झाली गोळा

    वरील ओळींमध्ये काही शब्द चुकले असतील. पूर्ण कविता काय आहे कोणाला माहित आहे का?

    Reply
  28. Govinda Badgujar

    [14/10, 16:19] Govinda Badgujar: माझ्या आठवणीतील कवितेतील काही ओळी अशा….

    इंन्द्र घालतो सडा अंगणी

    झाडलोट करी वारा

    चंन्द्र सुर्य राखती तयाच्या

    रात्रंदिन घरादारा

    …..

    ……

    …..

    …….

    ……..

    ……..

    समाधान चिंतामणी 

    ज्याच्या दारीचा पाषाण 

    कवितेचे नांव,कवी आठवत नाही

    कृपया ही पुर्ण कविता ह्या ई-मेलवर पाठवा.

    कालावधी साधारणपणे 1963-70 चा
    [14/10, 16:20] Govinda Badgujar: तुम्हाला माहीत असल्यास पाठवा

    Reply
  29. Rahul Bhoye

    कृपया कोणाकडे “धिटबाई धिटूकली भित नाही पिटूकली” ही कविता असेल तर टाका की…

    Reply

Leave a comment