अंधश्रध्दा (आणि विज्ञान)


‘अंधश्रध्दा’ हा निबंध आपल्या संगणकावर उतरवुन घेण्यासाठी इथे टिचकी मारा.

वरील निबंधच जर अंधश्रध्दा विरुध्द विज्ञान किंवा तत्सम विषयावर लिहायचा झाला तर पुढील काही विज्ञानाशी संबंधीत मुद्दे त्यामध्ये जोडता येतील. हे मुद्दे उतरवुन घेण्यासाठी इथे टिचकी मारा.

13 thoughts on “अंधश्रध्दा (आणि विज्ञान)

 1. shashikant oak

  – प्राची एक्के यांच्या २५ एप्रिलच्या दै. सामना मधील पुस्तक परिचयावर आधारित

  विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन
  लेखक – प्राचार्य (नि.) अद्वयानंद गळतगे. मो.९९०२००२५८५
  मुल्य – ८० रुपये पृष्ठे १९८

  शुद्ध विज्ञानवादी भूमिका असणारे आणि नाडी भविष्य वर्तवून बुद्धिवाद ही सर्वात मोठी अंधश्रद्धा असल्याचे सिद्ध करणारे अद्वयानंद गळतगे यांचे “विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन” हे पुस्तक आहे, आता ही विधाने परस्पर विरोध वाटण्याची शक्यता आहे. म्हणून या पुस्तकातील शुद्ध विज्ञानवाद म्हणजे काय हे समजाऊन घेतले पाहिजे. कुठल्याही तत्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान म्हणजे शुद्ध विज्ञान. शुद्धविज्ञानात दैवी शक्तीला किंवा परमेश्वराला अजिबात स्थान नाही. आत्मवंचक व खोट्य़ा विज्ञानाला उघडे पा़डणे, त्याचे खरे स्वरूप वाचकांसमोर ठेवणे. हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश असल्याचे गळतगे स्पष्ट करतात.
  मोरा अंगी असोरे। पिसे असती डोळसे। परि एकली दृष्टी नसे । तैसे ते गा।।
  मोराच्या अंगावर डोळ्यासारखी पुष्कळ पिसे असतात. पण त्याचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. त्याचप्रमाणे अध्यात्मज्ञानाची दृष्टी नसेल, तर इतर पुष्कळ शास्त्रांच्या ज्ञानाची दृष्टी असून काय उपयोग? ते लोक आंधळेच असतात. असे अध्यात्मज्ञानाची महती सांगणारे हे पुस्तक आहे.
  शास्त्रज्ञांचे तीन वर्ग आहेत. त्यातील ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे आणि त्यांच्या खरेपणाची शहीनिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा आग्रह धरणाऱ्या शास्त्रज्ञांच्या वर्गाचे हे पुस्तक प्रतिनित्व करते.
  अनेक नैसर्गिक घटना अशा आहेत की ज्यांचा कार्यकारण भाव मानवाला माहित झालेला नाही. अशा घटनांची चमत्कार म्हणून पुजा करायची की त्यांच्या पाठी मागचा कार्यकारण भाव शास्त्रीय निकषांखाली समजून घेण्याचा प्रयत्न करायचा की अशा घटना घडतच नाहीत असे म्हणून दुर्लक्ष करायचे.
  दुर्दैवाने काही शास्त्रज्ञ दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारतात. ही भूमिका आत्मवंचक आणि अवैज्ञानिक असल्याचे या पुस्तकातून पटवून देण्यात आले आहे.
  अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचा अवैज्ञानिकपणा आणि सत्याला सामोरे जाण्यातील त्यांचा भ्याडपणा उघड करणारी उदाहरणे यात दिलेली आहेत. यातून अंधश्रद्धा निर्मूलन वाद्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन वापरावा अशी अपेक्षा या पुस्तकातून व्यक्त करण्यात आली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक पुस्तकातून दाखवण्यात आला आहे. श्रद्धा हा केवळ धर्माचा आधार नसून मानवी जीवनाचाच तो आधार आहे किंबहुना ज्या विज्ञानावर मानवी जीवन आधारलेले आहे त्या विज्ञानाचा आधार सुद्धा श्रद्धा आहे. तेंव्हा अंधश्रद्धा निर्मूल चळवळ मुळात चुकीची असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लेखकाने श्रद्धा निर्मूलन समिती असे म्हटले आहे. अंनिसचा आणि विज्ञानाचा काहीही संबंध नाही असे गळतगे यांनी ठासून म्हटले आहे.
  नाडी ग्रंथ तर्काने खोटे ठरवता येत नाहीत हाच मराहाराष्ट्रातील बुद्धिवाद्यांपुढे नेमका पेचप्रसंग आहे. विज्ञानवाद्यांची खरी चिंता पुस्तकात मांडण्यात आली आहे.
  थोडक्यात विज्ञानवादी बुद्दिवादी असू शकतात काय? विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार शक्य आहेत काय? भानामतीचे चमत्कार आदि विषयावर परखड चर्चा करणारे हे पुस्तक आहे.
  ————————————————————————————–
  {यावर ओकांचे विचार सुप्रसिद्ध सिनेनट व दिग्दर्शक कै. गजानन जागीरदार यांच्या आत्मचरित्रातील अनुभवांना, मरता न क्या करता या प्रकरणात खोटे ठरवण्यात दाभोळकरांची दमछाक, शाम मानवांना खटल्यात झालेली शिक्षा व दंड, विविध भानामतीच्या केसेस मधील अंनिसवाद्यांची लबाडी व माघार, बंगलोर विश्वविद्यालयाच्या कुलपतीपद विभूषित एच नरसैया यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीने भानामतीच्या केसेसच्या रिपोर्टवर लेखकाने टाकलेला झगझगीत प्रकाश सर्वच प्रकरणे वाचनीय व मननीय आहेत. अंनिवादी अवैज्ञानिक व प्रसंगी लबाडी करणारे असतात. याची उदाहरणे यात मिळतात. अंनिस वाद्यांनी हे पुस्तक जरूर वाचून मनन करावे.}

  Reply
 2. eshwar

  jar tumhala manapasun vidyan ani andhashraddha nirmulan janun ghyayche asel tar ekda BUDDHA ANI TYANCHA DHAMM vacha……

  Reply
 3. eshwar

  tumche jag badlun jail….. jivan khup sundar vatel.. aani urlele aayushya agdi aanandat jagta yeil… mag te faltu bhut, pret, aatma tumchya dokyat bharvinare tumchi chakri kartil. vishwas basat nasel tar prayatna kara.

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s