पत्र- अंध शाळेला भेट


दिनांक – बुधवार, ९ डिसेंबर २००९

प्रति,
अध्यक्ष,
दिपज्योती प्रशाला,
१२, नवसह्याद्री सोसायटी,
कर्वेनगर,
पुणे – ४११ ००४

विषय – शाळा भेट

महोदय,

दरवर्षी ‘ज्ञानदिप हायस्कुल’ मुलांना वेगवेगळ्या विश्वाची माहीती व्हावी म्हणुन वेगवेगळ्या ठिकाणी सह्रुदय भेट आयोजीत करत असते, जसे ‘एन.जी.ओ.’, ‘अपंग पुनर्वसन केंद्र’, ‘अनाथ विद्यार्थी गृह’ इत्यादी. ह्या भेटीचा हेतु हा की मुलांना त्यांच्याशिवायही एक वेगळे विश्व आहे जेथील मुलं ही परीस्थीतीशी झगडत, जिवनाशी लढत शिकत आहेत, मोठ्ठी होत आहेत, आपल्या पायावर उभं रहाण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याची माहीती व्हावी.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन आमची शाळा, ‘दिपज्योती प्रशाला’ ह्या अंधांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेस भेट देण्यास उत्सुक आहे. भेटीचा कालावधी हा पुढील महीन्यातील पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यातील, आपणास योग्य वाटेल त्या दिवशी चालु शकेल. भेट देणाऱ्या विद्यार्थांच्या संख्या साधारणपणे ४० च्या आसपास असेल. सोबत वर्गाचे प्राध्यापक आणि दोन शिपाई काका हे सुध्दा असतील.

ह्या भेटीद्वारे आमची मुलं अंधांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेची माहीती मिळवतील. आपल्या प्रशालेमार्फत अंधांसाठी चालवल्या जाणाऱ्या विवीध उपक्रमांची माहीती ह्या अनुषंगाने त्यांना घेता येईल. आपल्या अंधत्वावर मात करुन आयुष्यात दिप उजवळवण्याची स्वप्न पहाणारी तुमच्या शाळेतील मुलं आमच्या मुलांसाठी एक प्रेरणाच ठरतील.

ह्या भेटीमध्ये आमच्या मुलांचे विवीध गट वेगवेगळ्या वर्गांमध्ये जाऊन त्यांना गाणी, गोष्टी म्हणुन दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या गोष्टी ही अंध मुले पाहु शकत नाहीत अश्या अनेक गोष्टींचा परीचय हे गट त्यामुलांना करुन देतील उदाहरणादाखल ग्रहणं, चंद्राचे विवीध आकार आणि त्यामागचे शास्त्र इत्यादी.

ह्या उपक्रमाचाच एक भाग म्हणुन आमच्या शाळेमार्फत आपल्या प्रशालेस देणगी दाखल रु. ५००१/- (रुपये पाच हजार एक) देण्याची आमची इच्छा आहे.

आम्ही आशा करतो की आपण आमच्या ह्या भेटीस परवानगी द्याल.

आपल्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत.

कळावे,

क. य. पाटणकर
मुख्याध्यापक
ज्ञानदिप हायस्कुल.

2 thoughts on “पत्र- अंध शाळेला भेट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s