फोटोग्राफी*


मला अनेकदा लोकं डी.एस.एल.आर कॅमेरा घ्यायचा आहे, कुठला घ्यावा किंवा डी.एस.एल.आर बद्दलची तांत्रीक माहीती विचारत असतात. अश्या सर्वांचे शंकानिरसन करण्यासाठी एक लिहीला होता तो इथे चिकटवत आहे, जेणे करुन इतरांनाही त्याची मदत होईल.

मी काढलेलेले फोटो ’फोटोग्राफी’ ह्या सदराखाली इतर पानांमध्ये जोडलेले आहेत, तुम्हाला फोटो कसे वाटले ह्याच्या जरुर प्रतिक्रिया कळवा –

DSLR कुणी आणि का घ्यावा?

१. DSLR मध्ये प्रत्येकासाठी काही ना काही तरी आहे. ज्याला निसर्गाचे फोटो काढायचे आहेत त्यासाठी, ज्याला पोर्ट्रेट्स काढायचे आहेत त्याच्यासाठी, ज्याला मॅक्रो (सुक्ष्म) गोष्टींचे फोटो काढायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना वाईल्ड लाईफ, पक्षी निरक्षण करायचे आहे त्याच्यासाठी उत्तोमत्तोम पर्याय आहे. आपल्या नेहमीच्या कॅमेरातुनही हे साध्य होते पण त्यात जो परीणाम साधला जाणे आवश्यक असते तो मिळत नाही. DSLR मध्ये हे शक्य होते कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी लेन्स उपलब्ध आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की एकाच लेन्सने सर्व काही साध्य होईलच असे नाही. प्रत्येक उपयोगासाठी खास बनवलेल्या वेगवेगळ्या लेन्स आहेत. म्हणजे तुम्ही लॅन्ड्स्केप साठी बनवलेल्या लेन्सने पक्षी निरीक्षण नाही करु शकणार, कारण ह्या लेन्सना झुम नसतात, पण वाईड असतो म्हणजे नेहमीच्या लेन्सने जर समोरचा एकच डोंगर फोटोमध्ये बसत असेल तर वाईड लेन्सने समोरचे ४ डोंगर त्याच कॅमेराने फोटोमध्ये बंदीस्त करु शकता.

२. DSLR मध्ये विशेष असे काय आहे? : तसे सांगण्यासारखे खुप, पण अगदी बेसीक सांगायचे झाले तर ज्याला आपण ’एक्स्पोझर ट्रांयांगल’ म्हणतो अर्थात ’शटर स्पीड’, ’अ‍ॅपेरचर’ आणि ’आय.एस.ओ’ ह्या गोष्टी आपल्या नेहमीच्या कॅमेरात जितका परीणाम साधणे आवश्यक असते तितका साधु शकत नाहीत, जे DSLR मध्ये शक्य होते.

३. तुझी गरज – जसे तु म्हणालास तुला निसर्ग-चित्रण करायचे आहे – त्यासाठी खरं तर कॅमेराबरोबर जी लेन्स येते ती कामचलाऊ आहे पण त्याने नेहमीच्या कॅमेरापेक्षा नक्कीच उत्तम फोटो येतात. मी काढलेले सर्व निसर्ग चित्र, साध्याच लेन्सने काढलेले आहेत. परंतु तुला फारच जरका हौस असेल आणि उत्तमच निसर्ग चित्र ह्यावीत असा हट्ट असेल तर ’वाईड अ‍ॅंगल’ लेन्स घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी पर्याय म्हणजे
– कॅनन १०-२२ एम.एम. (किंमत फक्त ३८,०००/-) जी मी काही महीन्यात घेईन असे वाटते आहे
– सिग्मा १०-२० (किंमत अंदाजे ३०,०००/-)

गुगलवर Canon 10-22 असे शोधलेस तर इमेज सर्च मध्ये तुला ह्या लेन्स वापरुन कश्याप्रकारचे फोटो येतात ते कळेल. कॅमेराबरोबर जी लेन्स येते ती १८-५५ एम.एम. असते. १० म्हणजे अजुन कमी आणि जास्त वाईड. नाहीच तर कॅमेराबरोबर जी लेन्स येते ती मोअर-दॅन-सफीशीयंट आहे.

ह्याच लेन्सने नेहमीचे फोटो सुध्दा काढता येतात.

DSLR चे तोटे –

आहेत.. खुप आहेत –

१. आपला नेहमीचा कॅमेरा कसा पटकन काढला आणि फोटो काढला, तितके हे काम सोप्पे नाही.. निदान थोडी सवय होई पर्यंत तरी. सेटींग जोपर्यंत निट होत नाही तो पर्यंत फोटो अती घाण येऊ शकतात. काळपट, अंधारलेले, हाललेले, मोबाईल-कॅमेराने काढलेल्या फोटोंपेक्षाही घाण. पण अर्थात हा सवय होईपर्यंतच. एकदा का सवय झाली की आपसुकच योग्य ते सेटींग केले जात ह्याची खात्री बाळग.
२. फ्लॅश वापरणार नसशील् तर कमी उजेड असलेल्या ठिकाणी शक्यतो फोटो शेक होतात त्यासाठी ट्रायपॉड लागतोच
३. कॅमेरा घेतल्यावर गरजा वाढत जातात. मी पण घेताना फक्त एक साधा DSLR आणि पोरांचे फोटो काढायला एक पोर्टेट लेन्स हेच समीकरण होते, पण त्यात हळुच झुम सुध्दा हवा आणि मग झुम लेन्स आली आणि आता नेहमीच्या लेन्स पेक्षा वाईड हवी म्हणुन वाईड-लेन्सपण लवकरच घेणार आहे. मग हा सगळा लवाजमा घेऊन फिरायला लागते. गरजेनुसार पहीली लेन्स काढुन दुसरी लेन्स लावणे आले.
४. किंमत – माझा पहीला बदलुन नविन घेतलेला कॅमेरा (४५,५००/-) + पोर्ट्रेट लेन्स (६,५००/-) + अजून एक पोर्ट्रेट लेन्स (२५,०००/-) + झुम लेन्स (१०,५००/-) + ट्रायपॉड (४,५००/-) + मेमरी कार्ड आणि यु.व्ही.फिल्टर (२,५००/-) असा माल आहे. आणि काही दिवसांत त्यामध्ये एक फिल्टर (२,५००/-) आणि वाईड अ‍ॅंगल लेन्स (३६,०००/-)ची भर पडणार आहे.

फोटोमध्ये अतीउत्तम परीणाम साधायचा असेल तर फोटोशॉप मस्ट. मला पण ते येत नाही, पण रोज एक तास खर्च करुन मी सध्या यु-ट्युबवरुन ते शिकत आहे.

पण एवढे सगळे दिव्य पार केल्यावर खरोखरच अती सुंदर फोटो मिळतात. मानसीक समाधान मिळते ते वेगळेच.

डी.एस.एल.आर हे वाचल्यावर पटत असेल तर सांग, आपण कुठला घ्यायचा, लेन्स कुठली घ्यायची ह्यावर अधीक खोलात विचार करु, नाही तर मग पॉईंट-शुट मधला एखादा चांगला कॅमेरा शोधु.

34 thoughts on “फोटोग्राफी*

 1. ” kuthla camera vapartos tu ? ” pahilayndach lihtoi tula ..pan A-keri hak maravishi vatli…mahit nahi ka.. normally mi asa karat nahi..

  kadachit ..aapley passions match kartait.. cycling & photography.. ( pan sadhya mi donhi karat nahi ) ..hhaaa tasa jamel tevha mazya e51 madhun “life capture” karto.. pan kahi dam nahi tyat…

  • बिंधास्त.. एकेरी हाकच बरी रे.. 🙂

   मी सध्यातरी कॅनन S2IS वापरतो आहे, पण मनात डीजीटल एस.अल.आर बसलाय nikon D90 तो निघतच नाहीये. पैसेही जमले आहेत, पण होम-मिनीस्टर कडुन परमीशन मिळत नाहीये रे 🙂

 2. अनिकेत,
  आज पुणे मिरर मध्ये तु पाठवलेला फोटो पाहिला…. सायकल पाहताच वाटले तुच पाठवला असणार…. मग नाव वाचले .. तर अनिकेत समुद्र…. तुच ना?

  • हो.. मीच तो, दोन दिवसांपुर्वी नव-भारत मध्ये माझा फोटो आला होता 🙂

 3. फोटो खतरनाक आहेत.. चला कुणीतरी माझ्याएवढा वेडा आहे म्हणायचे 🙂
  मी पण अगदी शेम टू शेम. फोटो काढायला अगदी कुठेही कधीही जाऊ शकतो.
  फ्लिकर वर पण आहे मी .

  20121222_162908 copy
 4. aniket,
  tuzya mulache phs khup chan aale aahet.

  i hv one dout

  tya saffolachya new ad madhe tuza mulgach aahe ka re??

 5. nad kula photography .
  khup kahi sangun jatat bhav manatil bolun jatat ooath sangat nahit pan khup kahi bolun jatat tuje photo .
  tuje photos mala khup avadale.

 6. Dear Aniket
  I want to buy a digital class Camera, which camera is best please inform.

  Sanjay Deshpande
  9923538885

 7. Hy aniket pahilyandach lihitoy tula mi pan photography karato pan tuzya itki best nahi tuzya photo mule mala photography karnyachi prerana milali

 8. yaar tu kadlele photo ekdam zakaaaaaas !!!!!!!!!!!!!!!ahe. mala pune city che old / new photo send karshil ka jar tuzya kade astil tar.plz

 9. Tumchi Photography Bhnaaaaaaaaaaaaaat aahe Gondwale Kh ( Shri Bramhachaitnya Maharaj Samadhiche Darshan Ghayachanimmit Ya

 10. Hi Aniket,

  Mala tumche photos khup avdale.actually te baghtana mazya dolyat pani ala….asa hya purvi kadhi zala nahi…keep it up.

 11. ekandar tuzi spashtayokti awadali…. masta watata tuzi site wachtana…. aani tuzya photographi ani equipment baddalchya coments awadlya …. manapasun…. photography pan khup awadli…. mala pan awad ahe photographichi… sadhya mazyakade sony cha sadha digital camera aahe … motha ghyaycha aahe pan tuzyach sarkha maza hi home minister parvangi det nahi aahe…. tari suddha iccha khup aahe…. ghenar aahe lavkar … tuzhya kadun kahi tips gheeen… deshil na… thanks…

 12. actualy surfing kartana fakt tumcha blog vachala photo khup shodhale pan nahi milale. please mala sangal ka ki te kuthe shodhatat. mala kadachit tumhi math mhanal pan jaudya please mala kalava.aabhari aahot.

 13. Namsakar.

  2 Diwsat dhigane wachun kadhle nlog warche likhan…
  Kharach Layi bhari…

  Asech lihit raha….

  Subhechchha,
  Vimala

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s