डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

सायकल


कुठली सायकल घ्यावी

आनंदवन, खानापुर, पुणे
Venue राजाराम पुल> सिंहगड रोड> खडकवासला > डोणजे फाटा > खानापुर> पाबे खिंड फाटा
अंतर – जाऊन येऊन अंदाजे ६० कि.मी.

रस्ता एक तर तसा खराब आणि उखडलेला होता त्यामुळे आधीच अंग खिळखिळे झाले होते आणि शेवटचा तो ३-४ कि.मी. चा रस्ता तर महाभयंकर चढ होता. बेक्कार वाट लागली होती.
सविस्तर नंतर लिहीतो, तुर्तास फोटो –

नुकतेच हे काका/आजोबा एकटे पुणे ते कन्याकुमारी सायकल वरुन जाऊन आले.

The Poona School and Home for Blind Girls
Venue Deccan Gymkhana Club > F.C. Road > B.M.C College (Cycling track) > Nal Stop > Kothrud > Gandhi Bhavan


प्रतिभाताईंनी संस्थेविषयीची माहीती सर्व सायकलस्वारांना दिली.

१९७४ साली सुरु झालेल्या ह्या योजनेला आज सरकारतर्फे ६६% फंडीग आहे. तुर्तास इथे साधारणपणे १४० अंध मुली वस्तीस आहेत. ह्या सर्वांच्या रहाण्या-खाण्याचा, औषधांचा, शिकण्याचा खर्च संस्थेतर्फेच केला जातो. १८ वर्षावरील मुलींना भरतकाम, शिवणकाम, खडु, मेणबत्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्या योजनेअंतर्गत मिळणारा पैसा त्यांनाच दिला जातो.

संस्थेतर्फे सर्व प्रकारच सहाय्य (जुने कपडे सोडुन) स्विकारले जाते. जुने फर्निचर, वस्तु, भांडी, धान्य आणि आर्थिक मदत सुध्दा.

“सायकलींग फॉर ए कॉज” या योजने अंतर्गत महिन्याच्या दर दुसऱ्या रविवारी समाजकार्य करणाऱ्या संस्थांना सायकलवरुन भेट देण्याची योजना चालु केली आहे. मागील महिन्यातील रविवारी जाऊ शकलो नव्हतो त्यामुळे ह्या वेळेला जायचेच असे नक्की ठरवले होते. आणि बघा नं मनाने ठरवले असले की कसे घडते, सकाळी कुठलाही गजर न लावला ६.२५ला आपोआप जाग आली. इतरवेळेला हाका मारुनही ८.३० पर्यंत उठत नाही. असो, बाहेर बऱ्यापैकी थंडी आणि अंधार होता, सकाळच्या गार वाऱ्यात सायकल चालवायला मज्जा आली.

“सौरभ कुलकर्णी”, जुना कार्यालयीन सहकारी भेटला होता. कसला बारीक झाला आहे सायकल चालवुन. रोज २५ कि.मी. चालवतो सायकल, घर ते कार्यालय आणि परत घर. मस्त रे.. किप सायकलींग.

 

सायकल चालवण्यासाठी ४१४ कारणं:

Critical Mass Oct 2009
Venue F.C. Road To Kothrud Bus Stand


ह्या ‘क्रिटीकल-मास’ चे अनेक मुद्दे उठुन दिसण्यासारखे होते, एक म्हणजे ३ सिग्नल्स ला आम्ही ‘सायकल’वाले फ्रंट-रो मध्ये होतो. म्हणजे सिग्नलला पुढे सगळ्या सायकली आणि बाकीचे सगळे ट्रॅफीक आमच्या मागे. कित्ती सुखावहः दृष्य होते ते. दुसरे म्हणजे आज सगळ्यांनी ठरवुन सायकल-ट्रॅक्स वापरले. अचानक सायकलच्या घंटांची ट्रिंग-ट्रींग ऐकुन पादचारी, विक्रेते भांबावुन गेले. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक ‘ऍटीट्युड’ होता.. सायकलस्वार असण्याचा. ‘चला बाजुला व्हा.. आमचा रस्ता आहे हा..’ खरंच सगळ्यांनी सायकल-ट्रॅक्स चा वापर सुरु केला तर अर्धवट बांधुन सोडुन दिलेले, गैर-पार्कींग, पादचारी, विक्रेत्यांच्या बळी पडलेले हे ट्रॅक्स खऱ्या अर्थाने ‘सायकल-ट्रॅक्स’ होतील.

पुढच्या वेळेस ‘मिडीया ऍटेंशन’ मिळवण्याचा प्रयत्न करणे हा एक मुद्दा ठरवला आहे. सायकल-ट्रॅक्स ची झालेली वाताहतं नजरेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे, नाही का?

Photographs of the Cycle Awareness Ride on 12th Sept., 2009
Venue Someshwar Temple

Route – Deccan Gymkhana > F.C.Road > Agriculture College > University > Baner > Someshwar Temple and then while coming back i took the long route from Pashan Link road > Pashan > Chandani Chowk > Bhusari Colony > Kothrud > Home

लेह-लडाखला गेलेली टिम परत आली आणि सायकल राईड्सना पुन्हा एकदा जोश आला. आजची राईड, पुणे सायकल प्रतिष्ठान, झेन सायकल आणि डेक्कन जिमखाना मिळुन होती चक्क १०९ लोक होती आज. मस्त रे. अस्सेच लोकं वाढत राहीली पाहीजेत..

लेह-लडाख अनुभव कथन लवकरच होईल, looking forward to it.
गुहागर ते मालवण कोकण सायकल राईड प्लॅन्स ऑन.. details लवकर मिळाले तर बरं सुट्टीला कटकट नाही होणार 🙂






Photographs of the Cycle Ride on 22nd August 2009
Venue – ‘Rural Ride’.

Route – Paud Phata > Chandani Chowk > Pune-B’lore Highway > Nande > Chande > Ghotawade > Raut Wadi > Pirangut Gaon > Pirangut Ghat > Bhugaon > Chandani Chowk> Home Approx 40 kms

After a hectic work-loaded week, its a must thing now-a-days for me to take the bike and go out of the crowded city. This time the route we choose is bit off the usual trails. This is where i was today morning.

Paud Phata > Chandani Chowk > Pune-B’lore Highway > Nande > Chande > Ghotawade > Raut Wadi > Pirangut Gaon > Pirangut Ghat > Bhugaon > Chandani Chowk> Home Approx 40 kms

The road was quiet good, atleast it was not dusty so cycling was bit easy. Road was always surrounded by green trees and rice fields. The smell of fresh rice was too good to be true. Villegers were curiously looking at us and whispering that “jogging jogging..” well dudes, its not jogging, its cycling 🙂

Four hrs ride was a excellent way to relax. One thing i have observed is you might will feel tired after driving a car, but with cycling i never felt i am too tired. Best thing is you can stop anywhere choose any road, anytime can go off road. I have seen many new places and meet-up with many peoples while cycling than with any other vehicle. Its truely a experience to cherish.

Highlight pt of the ride is i could climb almost 70% of the pirangut ghat. Loved it 🙂

Anyways.. won’t write much, the pictures will speak-up the rest of the things.


Which one is real and which is the reflection

Photographs of the Cycle Ride on 16th August 2009
Venue – ‘Pune Katraj Tunnel’.

Route – Dashbhuja Ganapati, Paud Phata > Karve Nagar > Sinhgad Road > Pune -Bangalore highway – Katraj Tunnel.

This was approx. 40 km ride. Time duration, to reach there approx 1.25 hrs, to return 40 mins. जाताना सगळा चढच असल्याने थोडा वेळ जास्ती लागतो.

Photographs of the Cycle Ride on 8th August 2009

Venue – ‘Oxford Golf Club’. Bavdhan Pune (This is behind Bavdhan hill- on the Mumbai-Bangalore by-pass)

Route – Dashbhuja Ganapati, Paud Phata > Chandani Chowk > Toyota show room (Mumbai-Bangalore by-pass) – Oxford Hill.

Participants – Rahul, Aniket

This was approx. 25 km ride. (3 kms Ghat-section) Started at 6.30 a.m.


इथे बसलेला एक छोट्टासा पक्षी मी क्लिक करायला आणि उडुन जायला एकच वेळ आली. कुचकट मेला.. 😦


भोलेssss.. ओ..भोले…sss

ARAI टेकडी, ३ कि.मी. चा सरळ चढाचा घाट

घामाने निथळतो आहे अजुनही, भुक तर इतकी लागली आहे ना…!! पण पहीले फोटो बघायचे होते कसे आलेत म्हणुन संगणक चालु केला. खुप मज्जा आली या डर्ट-रोड वर सायकल चालवण्यात. एकटाच गेलो होतो तरीही कंटाळा आला नाही. सर्वत्र शुकशुकाट होता.. घनदाट झाडीत, चिखलाने भरलेल्या रस्त्यावर निसर्गाशी समरस होतं सायकल चालवण्यात काय सुख आहे राव.. जबरदस्त. पक्षांचा आवाज सोडला तर कसलाही आवाज नव्हता. मध्ये तर चक्क मी मोरांचा आवाज ऐकुन इतका ए़क्साईट झालो होतो ना.. पण मोर दिसले मात्र नाहीत कुठे.. :-(. खुप शुटींग करायचे होते, पण रस्ता इतका खराब होता आणि चिखल टायरला चिकटलेला असल्याने सायकल चालवणे खुप जड जात होते, त्यामुळे फारसे करता आले नाही..


[या रस्त्यावर कोणी दिसणार आहे की नाही?]


[न्हे.. न्हे तु चिखलातुन.. स्वतः बसशील वरती.. पण सांगुन ऐकतो कोण माझे?]


[उचलुन घे रे जरा मला पुढे.. त्या ओहोळात काही मी जाणार नाही हाsss]


[थकले रे बाबा मी.. जरा टेकते झाडाला]

Vodpod videos no longer available.

साधारण एक वर्षापुर्वी, कुठुन कुणास ठाउक माझ्या डोक्यात सायकल चालवण्याचे वेड घुसले. परंतु गगनाला भिडलेल्या सायकलच्या किंमती बघुन घेण्याचा धिर होत नव्हता. तसेच सायक्ल घेउन वापरली जाईल का? वापरली तर लोकं काय म्हणतील असे अनेक प्रश्न डोक्यात होते. परंतु त्याच वेळेस कार्यालयातील एक ‘कलीग’ ही सायकल घेण्याचा विचार करत होता. किंबहुना त्याने लगेच घेतली सुध्दा. मग मात्र मी निर्धार केला आणि सायकलला आपलेसे केले. त्यानंतर जो आनंद मिळत आहे.. वाटलं.. इतके वर्ष उगाचच सायकलींग पासुन दुर राहीलो. पहीले काही महीने ‘हिरो रेंजर डी.टी.बी.‘ वापरल्यानंतर फेब्रुवारी २००९ मध्ये इंपोर्टेड ‘ल्युमाला‘ घेतली. खरंच सांगतो या सायकल मध्ये इतके सुख आहे ना चालवण्यात!! कार्यालयात मला कार ने जायला जेवढा वेळ लागायचा तेवढाच किंबहुना बऱ्याचवेळा कमी वेळात मी सायकलवरुन पोहोचतो. ट्राफीक जॅम ची कटकट नाही, सिग्नल्स म्हणलं तर आहेत..शिवाय पुण्यात बऱ्याच ठिकाणी सायकलींगसाठी वेगळे ट्रॅक्स बनले आहेत.. बनत आहेत.

सायकलींगचा वापर मी मुख्यत्वे कार्यालयात जाण्या-येण्यासाठी करतो. अर्थात मध्ये काही महीने तप्त उन्हाळ्यामुळे सायकलींग शक्यच नव्हते, पण अश्यावेळेस सकाळी लवकर उठुन लॉग-राईड्सची मजा अनुभवली.

त्यानंतर सायकल च्या जगताशी माझी जवळुन ओळख होत गेली. पुण्यामध्येच कित्तीतरी हौशी सायकल चालवणारी लोक आहेत. ३,०००/- रुपायांपासुन चक्क ४०,०००/- पर्यंतच्या सायकल वापरणारेही आहेत. कार्यालयाव्यतीरीक्त दर आठवड्याला एकत्र जमुन ८० कि.मी. चालवणारेही आहेत आणि लोकांमध्ये सायकलबद्दल जागरुकता निर्माण व्हावी म्हणुन ठरावीक दिवशी वेगवेगळ्या मार्गाने सायकलच्या रॅली आयोजणारेही आहेत.

हे स्वतंत्र पान खास सायकल आणि सायकलींग्च्या माहीतीसाठीच..
या पानावर सायकलींग बद्दलचे ट्युटोरीअल्स, सायकलचे प्रकार, ‘कुठली सायकल घ्यावी’, ‘सायकलींग बद्दलचे काही प्रश्न आणि उत्तरं’ आणि बरेच काही गोष्टी टाकणार आहे.

नविन पेज अपडेट्स खाली असतील.. So don’t forget to check till end for the updates till you move away.

माझी ल्युमाला सायकल

माझी ल्युमाला सायकल

माझी ल्युमाला सायकल

जाणुन घ्या तुमची सायकल

जाणुन घ्या तुमची सयकल

काही माहीतीदर्शक व्हिडीओज

Bicycle Anatomy for Beginners

How to Repair a Flat Bicycle Tire

How to replace a bicycle chain

How to Lock Your Bike

सायकल बद्दल काही ‘टिप्स’

 

27 thoughts on “सायकल

  1. kuthe ghetalis hi bike. lumala chya site (lumala.lk) war tar nahi disli mala.

    sachin

    • पुण्यात फडके हौद- शनिवार वाडा/लाल महालाजवळ- साईबाबा सायकल्स म्हणुन आहे दुकान.. त्याच्याकडे सगळ्या इंम्पोर्टेड सायकल्स आहेत.

  2. माझे प्रश्न:
    १. “ल्युमाला” कितीला आणि पुण्यात कुठे मिळते?
    २. “फायरफॉक्स” बद्ल बरंच ऐकलयं… कशी वाटते?
    ३. “हिरो रेंजर” गियर्स वाली मिळते का? कितीला?
    ४.”इंडियन” ब्रॅड मध्ये कोणती सायकल रेकमेन्ड कराल?

    भाऊ, कधी देताय माहिती?

    • १. ल्युमाला साधारण ९ हजारापासुन पुढे आहे. पुण्यात “साई-बाबा सायकल्स”, फडके हौद सायकल लेन् मध्ये मिळते
      २. फायरफॉक्स ट्रेक मेरीडा अतीउत्तम सायकल आहेत, पण थोड्या महाग आहेत
      ३. गेअर मध्ये मिळते ना.. ५ हजारपासुन आहे, पण फार जड आहे सायकल. पहिली माझी तिच होती, पण मजा नाही आली म्हणुन टाकली बदलुन
      ४. इंडीयन मध्ये “हिरो ऑक्टेन” (विदाऊट डिस्क ब्रेक्स) बघ चालवुन, चांगली आहे, किंमत साधारण पणे ६,५००/-

  3. i did send my opinion…. but did not get any response from u..

  4. एकदम झकास!!! मस्त!!! सायकल आहे अनिकेत दादा
    बस त्यावर बसून एक राईड घ्यावीशी वाटते…

  5. Pingback: Internet Activism – इन्टरनेटच्या माध्यमातून सामाजिक सक्रियता…. « मी मिलिंद

  6. मस्तच आहे तुमची सायकल ! .. सही

  7. अनिकेत,

    सायकल घ्यावी असा मी पण गेले एक वर्षापासुन विचार करत आहे. पण आपला हा ब्लॉग पाहिल्यावर हा विचार अमलात आणलाच पाहिजे असे वाटत आहे.

    मला जुन्या प्रकारची हिरो किंवा हर्क्युलस घ्यायची आहे.
    कारण नविन किंवा imported cycles sturdy वाटत नाहीत, हलक्या वाटतात.

    मध्यंतरी मी फडके हौदाजवळ असलेल्या काही दुकानांमधे चौकशी केली. तेव्हा मला असे कळाले की आजकाल या traditional type cycles तयार मिळत नाहीत, order दिल्यावर spare parts जोडून तयार केल्या जातात. कारण अशा cycles ना हल्ली मागणी फारच कमी आहे. काळाचा महिमा दुसरं काय ?

    महेश

    • व्वा महेश, बिनधास्त घेऊन टाक सायकल. बिलीव्ह मी, सायकलींचेच युग लवकरच अवतरणार आहे. तेंव्हा लाखाची सायकल घेण्यापेक्षा आत्ताच हजारातली घेतलेलि काय वाईट?

  8. wow kay chaan photo kadhtos re tu. khupch chhan aani tujhi cycle tar khupch chhan aahe.me ha cycle cha blog kadhi vachalach naahi pun aaj me to vachala kharch khup chhan aahe.

  9. aho aniket dada mast photo ahet ha mala khup avadle ani parat kadhi asa plan asel tar naki sanga mala tumchi sahamati asel tar naki yeyen mi khup lhup avad ahe mala cycling chi

  10. Mi saaykal ghetli firefox pan aata kapalaala haat maaraychi vel aali aahe.Ethe mhane Punyaat saaykal chorilaa jaate.ti jaaou naye yaasathi kaahi upaay pan saanaga jaraa kiti
    divas tilaa ase gharaat kondun thevaayche?

    • भारती,

      सर्वप्रथम नविन सायकल बद्दल मनःपुर्वक अभिनंदन

      सायकल चोरीला जातात हे खरं आहे आणि त्यावर उपाय म्हणजे सर्वप्रथम आपल्या सायकलचे इंश्योरंन्स कव्हरेज करुन ठेवा. अगदीच नाहीच मिळाली तरी आपल्याला पैसे घेता येतात.

      दुसरे म्हणजे सायकलचा फ्रेम नंबर आणि इतर माहीती असलेली आपली रिसीट जपुन ठेवा. चोरीला गेलीच तर FIR करताना ते लागते.

      सायकल लावताना नेहमीच्या लॉक बरोबरच एखादा साखळी आणि कुलुप वापरा जेणेकरुन सेफ्टी राहील. आणि कृपया चोरीच्या भितीने सायकल ठेवुन देउ नका..

      Go Green!, Happy Cycling!!

  11. aniket dada tuzi saykal aavdli bar ka……….

  12. अरे वा !
    छानच सायकल आहे कि रे तुझी ……….
    तुला सांगते माझी बारावीची बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत आम्ही तिघी मैत्रिणीनी सायकल चालवण्याचा छंद जोपासण्याचा प्रयत्न केला (लहानपणापासून सायकल चालवता येत होती, नाही अस नाही)पण जी काही जोरात पडले ती पूर्ण सुट्टी आम्ही तिघी मैत्रिणीनी (माझ्या) मोडलेल्या हाताकडे पाहत घालवली….
    आता माझा मुलगा सहा वर्षांचा आहे . चार चाकी दोन सायकलींचे त्याने आतापर्यंत तरी पूर्ण OPERATION करून झाले आहे. मात्र आता त्याची मागणी दोन चाकी सायकलची आहे. तुझे हे OPERATION सायकल पहिले आणि त्याला सायकल घेऊन द्यावी असा विचार करतेय…
    अजून ठाम नाही……

  13. khup chan photo ani tya hun chan cycle.

  14. Hi Andya,

    I have also bought imported bicyle “SCHWINN” company.So, currently practising for stamina, after all I am back to cycling after 16 years.So let me take some time and include me or let me know for such Cycling occassions/events.

    Your’s Best Frnd,
    ~Umesh Deshpande!

  15. you are gret?

  16. जुनी इंर्पोटेड सायकल मिळेल का? तुमच्‍या सायकल ग्रूपमध्‍ये अपग्रेड करणारे असतील तर संपर्क करा.
    आपला
    सायकलप्रेमी

  17. Aniket, ha blog vacuin chaan vatle..Punyat saykalicha vedh ghenare yevdhe loka aahet he pahun ascharya vatle…ani saykal sathi vegle tracks aahet he pahun tar mi udaloch…mast lihile aahes

    • आहेत सायकल ट्रॅक्स.. पण काही उपयोगाचे नाहीत.. एकतर पार्कींग केलेले असते त्यावर नाहीतर फळ / भाजी विक्रेते असतात. पण सायकल चालवणारे आहेत भरपुर आहेत.. रेग्युलर शनिवार-रविवार राईड्स असतात.

  18. Wow! मराठीत एवढी माहिती! खुप छान!
    मी एक सायकल मेकैनिक आहे .आणि खुप दिवसापासून मी एकटाच सायकल प्रवासाचा बेत ठरवतोय.त्यासाठी मी माहिती गोळा करतोय.मी संगमनेरहून श्री अष्टविनायक व तसेच भिमाशंकर,सर्व किल्ले व गणपतीपुळे पर्यंत प्रवास करणार आहे .मला अनुभव खुप कमी आहे.हा प्रवास मी जुलै/सप्टे.ला करणार आहे. ते योग्य आह? Please help me?

  19. Hey Not sure if you have any group for cycling if yes please let me know. i would love to join you guys in your next track….

  20. AJ KAL FAKTA KHEDEGAVAT CYCLE PAHAVAYAS MILATE. PAN TUHMI CHALAVALI JARA BARE VATALE.

  21. Hi Aniket
    I bought Firefox Target in last week. My daily cycling is nearly 8 km.
    Can you please share any cycling event which you are following. I wii be very happy to participate in those events.
    Which insurance company give cycle insurance? ICICI lombard refuses me for cycle insurance.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s