इमेस रेशाम्मिये


मार्च २०५९

पन्नास वर्षांपुर्वी गांधीजींच्या वस्तु भारतात आणण्यात आल्या. परंतु जग कसे बदलते ते बघा आज त्याच तारखेला एका प्रख्यात गायकाच्या वस्तु आमच्या नाहीतच यावरुन सगळ्या देशांमध्ये जुंपली आहे.

५० वर्षांपुर्वी एक ‘इमेस रेशाम्मिये’ नावाच एक गायक नावारुपाला आला होता. तरुणांमध्ये विलक्षण लोकप्रिय झालेल्या या गायकाच्या प्रतिभेला आणि त्याच्या गायकीला नंतर उतरती कळा लागली.

आज त्याच्या वस्तु, रेकॉर्डींग्स कुठलाही देश घेण्यास तयार नाही. मुख्यतः ‘तो’ गायक आमच्या देशाचाच नाही इतपत गोष्टी पोहोचल्या आहेत. त्याचे आपल्या देशाचे नागरीकत्व मान्य करुन कोणीही आपल्या देशाच्या प्रतीमेवर डाग उमटु देउ इच्छीत नाही

प्राईम टाईम शो मध्ये, ऍकर किंचाळतोय, “कौन था ये इमेस? क्या खाता था ये इमेस? कहा रहता था ये इमेस? कौssssनसे देश का है ये इमेस??” किसी को पता नही. किस्सीssके पास इसका जवाब नही. लेकीन सिर्फ हम जानते है. ‘बकवास टि.व्हि’ ले के आ रहा है इमेस के उपर एक खास पेश कश, अबसे बस्स कुछी देर मै.. कही जाईयेगा नही, हम्म अभ्भी वापस आयेंग थोडीही देर मै, देखते रहीये ‘बकवास टि.व्ही की कहानी इमेस’

लंडनच्या ऑक्शन-शो मध्ये सगळ्या देशाचे प्रतिनिधी हमरी-तुमरीवर आलेले आहेत. मोनालीसाच्या ‘स्माईल’ वर पि.एच.डी करुन कंटाळलेले अनेक तत्ववेत्ते आता ‘इमेस’ चे गाणे आणी त्याच्या गाण्याचा अर्थ ह्या विषयावर हिरीरीने संशोधन करत आहेत.

पाकिस्तान: ‘इमेस हमारे देश का नही है, ये इंडिया की हमारे खिलाफ साजीश है. इंडीया से हमने कुछ सवालोंके जवाब मांगे है, इंशाअल्ला, सच्चाई की जीत हो के रहेगी’

इंडीया: ‘देखीये देखीये, ये बुडबक जैसी बातचीत बंद कीजीये, हमारा ‘इमेस’ से को नाता नही है, हम कह रहे है ना. आप हमारी बात अपनी अकल मै ठोक क्यु नही देते है?’

अमेरीका: ‘ये अफगणीस्तान की नयी तरकीब थी, उन्होने युवा लोगोंका दिमाख खराब करने केलीये ये नया रोबोट बनाया था’

कोरीया: ‘हमे यकीन है, ‘इमेस’ टांझानीया या इथोपीया का नागरीक है. गौरसे देखो वो कैसे गाता है.. ऊंssssउम…ऊऊऊऊ”. ये तो पक्का कोई ट्रायबल सॉंग है”

थोड्याच वेळात बाहेर गडबड – कुजबुज उडते. बाहेरुन द्वारपाल धावत आत येतो आणि सभापतीच्या कानात कुजबुजतो, ‘बाहेर काही प्राण्यांचे शिष्टमंडळ आले आहे त्यांना भेटण्याची परवानगी हवी

आहे’. तेवढ्यात काही प्राणी आत घुसतात. गाढव, रेनडियर, कुत्रा, मांजर, कोल्हा, हत्ती, बदक, वटवाघुळ, माकड असे काही प्राणी त्या शिष्टमंडळात असतात.

आत आल्या आल्या त्यातील एक जण खड्या आवाजात ऐकवतो, तुम्हाला हे ऑक्शनवगैरे करण्यास परवानगी नाही. ‘इमेस’ वर गेल्या ५० वर्षांपासुन प्राण्यांच्या न्यायालयात केस चालु आहे त्याने त्याच्या गाण्यात आमच्या आवाजाचा वापर केला आहे आणि आम्हाला त्याची रॉयल्टी मिळाली नाहीये. तेव्हा जोपर्यंत त्या केस वर निकाल लागत नाही तोपर्यंत ‘इमेस’ च्या सगळ्या गोष्टींवर आमचा हक्क आहे. असे म्हणुन सगळे प्राणी ओरडा-आरडा करत बाहेर निघुन जातात. तो आवाज ऐकुन सगळ्यांना ‘इमेस’ ची गाण्याची रेकॉर्डींग लागल्याचाच भास झाला.

2 thoughts on “इमेस रेशाम्मिये”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s