प्रोजेक्ट ३६५


नव वर्षाच्या सुरुवातीला ‘प्रोजेक्ट ३६५’ नावाची बरीच चर्चा मी महाजालावर वाचली होती. कल्पना अशी आहे की तुम्ही रोज एक तरी फोटो काढाच. कसलाही चालेल पण रोज पाहीजे. मग तो फोटो तुमचा, तुमच्या कुटुंबातील कुणाचा, ऑफीस मधला पासुन रस्त्यावर घडलेली घटना ते अगदी आजच्या जेवणाचा मेनु, विस्कटलेले अंथरूण, आजचा सुर्योदय/सुर्यास्त काही असु शकते.

या सगळ्या फोटोंचा एक महाजालावर अल्बम बनवत चला. वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे ३६५ असे फोटो असतील जे सरत्या वर्षाची एक सुंदर आठवण बनुन जातील.

कल्पना मला फारच सुरेख वाटली आणि त्याप्रमाणे मी सुरुवात पण केली. पण काळाच्या ओघात मी मागे पडत गेलो आधी १-२ दिवसांची असणारी गॅप आता आठवड्यावर पोहोचली आहे. अर्थात थोडे फार तरी आहेत फोटो, हे ही नसे थोडके.

फोटोग्राफीची मला खरंच खुप आवड आहे, पण नाहीना जमत मनासारखे फोटो काढायला. वेळच मिळत नाही. मला ते ‘डिस्कव्हरी चॅनल’, ‘नॅशनल जिऑग्राफी’ वर काम करणाऱ्या लोकांचा फारच हेवा वाटतो. त्यांचे उत्पन्नाचे साधन हेच मुळी फोटोग्राफी आहे. कित्ती छान ना? कित्ती मस्त मस्त ठिकाण पाहायला मिळतात त्यांना, कित्ती सुंदर आठवणींचा आणि फोटोंचा खजीना असेल त्यांच्याकडे..!!

हाय हाय ये मजबुरी.. मेरी दो टकीये की नोकरीमे मेरा लाखोंका जिवन जाये..ssss!!

Advertisements

2 thoughts on “प्रोजेक्ट ३६५

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s