लॉटरी..


परवा सकाळी मेलबॉक्स उघडला आणी समोर दिसणारी मेल बघुन थक्कच झालो. अहो दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही तर चक्क लंडनमधील एका प्रतिथयश लॉटरी कंपनीच्या अधीकाऱ्याची होती. त्या सदगृहस्थाने मला कळवले की मला GBP 5,000,000.00 लॉटरी लागली आहे. म्हणजे नक्की किती ते मी अजुन कॅलक्युलेट करतोच आहे पण तो मोठ्ठा आकडा बघुनच मला भोवळ यायला लागली. आणि विषेश म्हणजे कुठल्याही प्रकारचे लॉटरीचे तिकिट स्वतःचे पैसे घालवुन विकत न घेता लॉटरी लागल्याचे ऐकुन मला आनंदाला पारावारच राहीला नाहीये. मी एकटाच हर्षावायु झाल्यासारखा हासत सुटलो.

लगोलग त्यांनी मागीतलेली माहीती भरून पाठवुन दिली (बॅक अकाऊंट नं. सोडुन :-)) पण त्यानंतर एक दिवस झाला, दोन झाले, चांगला आठवडा होऊन गेला पण काही खबर-बातच नाही.. काय राव?? दिल तोड दिया ना??? 😦

One thought on “लॉटरी..”

  1. हाहाहा… माझ्याही बाबतीत असं झालं होतं एकदा. मला नायजेरियातून एका माणसाचं ईमेल आलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार नायजेरियन सरकारने अनेक लोकांना बरेच पैसे देणं बाकी होतं. आणि त्यांच्या ऑफिसची मुख्य इमारत जळली. त्यामुळे आता त्यांच्याकडे प्रत्येकाला एवढे पैसे कसे काय द्यायचे आहेत याचे तपशील नाहीत. फक्त लोकांची नावं आणि रक्कम लिहिलेला एक कागद शिल्लक आहे. आणि त्यात माझ्या नावापुढे $ ५०,०००,००० लिहिले आहेत! मीही माझी माहिती पाठवली होती (अर्थात बँक अकाउंट सोडून), पण काहीच उत्तर आलं नाही. आपण दोघे एकाच नावेतले प्रवासी आहोत राव… 😉

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s