२५० कोटी


काल का परवा पेपरमध्ये वाचनात एक बातमी आली, एका पोलीस अधीकाऱ्याची २५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली. अंगाचा इतका तिळपापड झाला ना!! एवढे पैसे एका पोलीस अधीकाऱ्याच्या घरी आलेच कुठुन?? गेली ७ वर्ष मी सॉ्फ्टवेएर कंपनीमध्ये काम करतोय आयुष्यभर काम केले तरी माझे २ कोटी रुपये सेव्हींग होईल की नाही सांगता येत नाही. मग एका पोलीस अधीकाऱ्याची एवढी मालमत्ता? छे.. सहनशीलतेच्या पलीकडचे आहे हे सगळे. ज्यांच्यावर विश्वास टाकावा त्यांनीच अशी फसवणुक करावी?

काही दिवसांपुर्वी काही अपरीहार्य कारणामुळे पोलीसचौकी चढण्याची वेळ आली. तेथील एका पोलीस अधीकाऱ्याच्या हातात ‘हाय-ऐंड’ PDA मोबाईल दुरध्वनी पाहीला. खरंच सांगतो, घ्यायची इच्छा असुनही मी अजुन घेउ शकलो नाहीये 😦

ज्यानी आयुष्यात कसलीही नोकरी केलेली नाही असे निवडणुकीला उभे राहीलेले नेता पैसे वाटतात. कुठुन आले हे पैसे?

अमेरीकेला कितीही नावं ठेवोत, पण त्यांची ‘Law & Order’ व्यवस्थीत आहे. लोकांच्या मनात कायदा/ न्यायव्यवस्थेबद्दल भय/आदर आहे. अमेरीकास्थीत भारतीयांची बऱ्याच वेळेस मला किव येते आणि त्यांना मी नावं ही ठेवतो. आपल्या देशापासुन, आई-वडील, नातेवाईकांपासुन हि लोकं दुर रहातात. आपले सण-समारंभ सगळ्याला मुकतात. पण अश्या बातम्या वाचल्या की वाटतं ही लोकं कित्ती सुखी आहेत.  ‘दृष्टी आड सृष्टी’ या उक्तीप्रमाणे असल्या मनाला त्रास देणा़या गोष्टींपासुन ते हजारो मैल लांब आहेत.

खरंच आपण आपल्याच देशात सुखी आहोत का? खरंच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेय ते योग्य झाले का आपण आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेतलाय???

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s