क्लायंट भगवान होता है


पुण्याचा अपवाद सोडला तर बहुतेक सर्वत्र ‘ग्राहक’ हाच देव मानला जाउ लागला आहे. प्रत्येक गोष्ट मग ती दुकानातील सजावट असो की विक्रीसाठी असणारे मदतगार असोत, प्रत्येक जण ‘क्लायंट-ओरीएंटेड’ झाला आहे. परंतु तरीही ‘आमचा हा असा माल आहे, पाहीजे तर घ्या नाहीतर तुम्हाला दुसरे पर्याय उपलब्ध आहेतच!!’ असा थोडाफार सुर पहावयास मिळतो.

संगणक कंपन्या मात्र याला मोठ्ठा अपवाद आहेत, विशेषः ‘सर्व्हिस बेसड़’  कंपन्या. ‘क्लायंट’ हाच भगवान आहे. तो ‘उठ’ म्हणाला की उठायचे आणि ‘बस’ म्हणाला की बसायचे हेच ब्रिदवाक्या घेउन सगळेजण ‘धक्याला’ लागलेले असतात. बिच्चारा कर्मचारी वर्ग एकीकडुन ‘क्लायंट’ आणि दुसरीकडुन ‘बॉस’ असा दुहेरी मार खात असतो.

आजचेच उदाहरण घ्यायचे झाले तर माझी कलीग ‘अपर्णा’ जी माझ्यापेक्षाही खुssप जास्ती कामसु, आणि सिन्सियर आहे. पण ग्रह फिरले की काय होते याचा प्रत्यय तिने आज घेतला. तिच्या कामाची नेहमीच ‘तोंडी’ तारीफ करणाऱ्या क्लायंटने आज मात्र क्षुल्लक चुकांसाठी आपला निषेध आमच्या ‘बॉस’ कडे ‘लेखी’ नोंदवला. 

हे पाहुन मला खरंच प्रश्न पडला, चुकांना तुम्ही जसे ‘हायलाईट’ करता तसेच चांगल्या कामांना सुध्दा करा ना. ‘मोटीवेट’ केलेत तर तुमचे काम चांगलेच होणार आहे.  डोक्यावर बसुन काम करुन घेण्यापेक्षा, कृष्णासारखे रथाचे सारथ्य करुन काम करवुन घेणे जास्त योग्य नाही का?

आमच्या कंपनीमध्ये तरी खुप चांगली परीस्थीती आहे. मित्रांकडुन जेंव्हा त्यांच्यावर बेतलेले प्रसंग ऐकतो तेंव्हा खुssप रागही येतो आणि त्यांची किवही येते. ‘क्लायंट’ म्हणेल ती पुर्व दिशा म्हणुन कामाला जुंपलेल्या त्या बिचाऱ्यांची तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करणे हीच आयुष्याची रोजनिषी झालेली आहे.

Advertisements

3 thoughts on “क्लायंट भगवान होता है

  1. कर्मचारी वर्ग म्हणतो…..

    नवीन क्लायंट येतो तेव्हाः “क्लायंट भगवान होता है”

    क्लायंट रागावल्यावरः “क्लायंट भयानक होता है”

    सदा सर्वथा क्लायंटला खुश ठेवण्यावरच कर्मचारी वर्गाचे व कंपनीचे यश अवलंबून असते.

    1. खरं आहे रे बाबा तुझं, पडलोय या धंद्यात तर भोगा आपल्या कर्माची फळ आणखीन काय??

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s