गिधाडांची जातच चिवट


एखादी गोष्ट तुम्हाला अगदी ‘डेस्परेटली’ पाहीजे असते. तुम्ही सगळीकडे शोधता आणि मिळतच नाही. तुम्ही निराश झालेले असता, काही दिवसांनी त्या गोष्टीचा विसरही पडलेला असतो, आणि एक दिवस ती गोष्ट सहजच, अगदी सहजच काहीतरी शोधाशोध करताना सापडली तर काय होईल? अत्यानंद नाही का?

अगदी तसेच माझे आज झाले. तसा मी दर्दी वाचक वगैरे नाही. मी फार कमी पुस्तक वाचतो, इंग्रजी तर त्याहुनही कमी. पण ‘जेम्स हॅडली चेस’ आणि ‘सिडने शेल्डन’ यांच्या पुस्तकांचा मी नित्सीम चहाता आहे. सापडले की मी अक्षरशः तुटुन पडतो. ‘सिडने शेल्डन’ ची पुस्तक मोठ्ठी असल्याने एका बैठकीत होत नाहीत पण ‘जेम्स हॅडली चेस’ मात्र मी घेतले की संपल्यावरच उठतो. दोघेही ‘क्रिमीनल’ गोष्टी लिहीण्यात अगदी पटाईत. ‘जेम्स हॅडली चेस’ म्हणजे तोच ज्याच्या कथानकातील काही गोष्टी ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटात घेतल्या आहेत, रेल्वेमध्ये ज्याचे पुस्तक वाचतानाही चित्रपटातील नायकाला दाखवले आहे.

तर सांगण्याचा मुद्दा हा की, आज महाजालावर मी उगाचच इकडुन तिकडे काहीतरी शोधाशोध करत होतो आणि एका ठिकाणी मला ‘जेम्स हॅडली चेस’ ची ‘ई-बुक्स’ मिळाली. इतका आनंद झालाय म्हणुन सांगु. मी अक्षरशः संगणक-स्क्रिनला पापेच द्यायला लागलो.

तर सगळ्यात पहिल्यांदा ‘Vulture is a patient bird’ (गिधाडांची जातच चिवट) नावाचे पुस्तक हाती घेतले आहे. धर्मेंद्रचा ‘शालीमार’ हा चित्रपट याच पुस्तकावर बेतलेला आहे. आता उपकार केल्यासारखे पटापट जेवणार आणि मस्त कथानकात आकंठ बुडुन जाणार.

ज्यांना ‘जेम्स हॅडली चेस’ ची पुस्तकं आवडतात / उत्सुकता आहे त्यांच्यासाठी पुस्तकाच्या डाउनलोडची लिंक सोबत देत आहे.

गिधाडांची जातच चिवट
Advertisements

6 thoughts on “गिधाडांची जातच चिवट”

 1. अरे अनिकेत मी पण तुझ्यासारखा “जेम्स हॅडली चेस” आणि “शेल्डन” चा पण भक्त आहे.

  अरे प्लीज मला तुझ्याकडे आहेत तेवढी जेम्स हॅडली चेस ची ई-पुस्तके ई-मेल करशील का
  sonerisagar@gmail.com खूप आभारी असेन मी तुझा…
  आणि एक मराठीतून जेम्स हॅडली चेस ची पुस्तके आहेत का तुझ्याकडे? किंवा कुठे मिळू शकतील सांगता येईल काय? मला जेम्स हॅडली चेस ची पुस्तके विकत घ्यायची आहेत तर ऑनलाईन खरेदीसाठी कुठेही उपलब्ध नाहियेत.

  प्लीज मदत कर…
  धन्यवाद
  सागर

  1. जरुर.. पण मी ई-मेल करण्यापेक्षा तुला साईट सांगतो तिकडुन तुला पाहीजेत ती डाऊनलोड करुन घे. नाहीच जमलं तर सांग मग करतो की तुला ई–मेल

   http://esnips.com या साईट-वर चेस आणि शेल्डनची जवळ-जवळ सगळी पुस्तकं डाऊनलोडला आहेत. जियो चेस आणि शेल्डन 🙂

   1. अरे अनिकेत मनापासून धन्यवाद… ई-स्निप्स वर मी मेंबर आहे. पण तिथे बघायचे डोक्यातच नाही आले.. भरपूर पीडीएफ़ मिळाल्या आहेत तिथे…
    पण जेम्स हॆडली चेस यांच्या मराठी पीडीएफ़ कधी चुकून मिळाल्या तर मला प्लीज लक्षात ठेव…

    मला आधी मिळाल्या तर मी नक्की तुला पाठवेन
    थॅंक्स
    – सागर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s