बार्बी डॉल


आम्हाला मुलगी व्हावी असं फार वाटत होतं, पण मुलगा झाला. त्यानंतर मात्र त्याचे आणि माझे मस्त मेतकुट जमलं. पण २-३ दिवसांपुर्वी परत एकदा वाटले मुलगी पाहीजे होती राव. मग मी माझ्या मुलाच्या मागेच लागलो, चल तुला बाहुली घेउन देतो. गाड्या, बंदुकांमध्ये रमणाऱ्या त्याला बाहुलीचे ते काय आकर्षण तो काही ऐकायला तयार नाही, मी मात्र त्याला बार्बी डॉल घेउन द्यायच्या इराद्यानेच पेटलो होतो. बायको पण चकीत, “अरे मुलं कधी बाहुली खेळतात का?” पण नाही.

नेमकं दुर्दैव आड आलं आणि बायकोला दुरचित्रवाणी चाळताना ‘ती’ बातमी दिसली “कॅटरीना कॅफ बार्बी डॉलच्या वेशात रॅम्प वर” झालं, तिने जे उशीने आणि शब्दाने मला बडवलेय म्हणुन सांगु, “अरे.. ३ वर्ष मुलाचा बाप ना तु, हिच शिकवण देणार का तु मुलाला??’ वगैरे वगैरे.

पण काही असो, ‘कॅट’ काय दिसत होती राव बार्बी-डॉल च्या पेहरावात!! काही दिवसांपुर्वीच तिची ती ‘आमसुत्र’ ची जाहीरात बघुन घायाळ झालो होतो, जेव्हा ती तो आंबा आपल्या कोमल हातांनी असा आवळतेना!!.. अंगावरुन मोरपीस फिरल्यागत होतं बघ्घा अगदी. आत्ता जर मी शाळेत असतो आणी ‘मी आंबा झालो तर?’ असा काही विषय ‘कल्पनाविस्तार’ म्हणुन आला असता ना तर सांगतो पैकीच्या पैकी मार्क मिळवले असते. ‘मी सलमान खान झालो तर?’, ‘मी अक्षय कुमार असतो तर?’, ‘मी ब्रिटनचा राजकुमार असतो तर?’, ‘मी विजय मल्या असतो तर?’ असे अनेक निबंध माझ्याकडे तयार आहेतच 🙂

काही लोकं, मला वाटतं, उगीचच ‘कॅटरीना’ आणि ‘ऍश’ ची तुलना करतात. माझ्या मते ऍश ला उगीचच लोकांनी डोक्यावर चढवलयं ती कुठं आणि आपली ‘कॅट’ कुठं.

Advertisements

6 thoughts on “बार्बी डॉल”

 1. ’आपली कॅट” कुठे…”
  प्रत्येकालाच कॅट ’आपली’ वाटायला लागली आहे…(मला पण)
  आवडलं.. बरं का. अगदी मनातलं लिहिलंय तुम्ही.. 🙂

  1. मना-मनांमध्ये कॅटच आहे आजकाल, काय क्युट स्माईल आहेना तिची??

 2. Katrina mhanaje khandani saundarya, madhubala sarakhe.

  Baki tumachya gavala bhunge marathi asatat he aikun dachakalech. 🙂 Marathi bhashik bhunge mhanaje kayachya kay…

  1. खरंच, कसली क्युट आहे ती!! आमच्या सौ.ची पण तीच आवड आहे त्यामुळे संगणकावरील किंवा मोबाईलवरील ‘वॉलपेपर’ मी तीचाच लावला असुनही ती आक्षेप घेत नाही ही त्यातल्या त्यात एक जमेची बाजु.

   बाकी ऍक्टींग चे लोकं म्हणतात की तिला काही येत नाही, पण तिच एवढी सुंदर आहे की तिच्या ऍक्टींग कडे बघायला वेळच मिळाला नाहीये अजुनsss!

   आधीच ती क्युट आणी तिने ऍशच्या वर्चस्वाला (होते का??) धक्का दिला त्यामुळे दिल खुश!!

   मराठी भुंगा…हा हा हा! नविन ब्लॉग तयार करताना काही सुचतच नव्हते म्हणुन असले काहीतरी अतरंगी नाव लिहीले. नाही वाटत का चांगले?? बदलु का?

   डोक्यात भुणभुणणारी कॅट किंवा बार्बी डॉल असे नाव कसे वाटेल?

 3. अगदी अचानक तुझा ब्लॉग मिळाला. मजा आली..जे.हॅ.चे. ते रामसेचे भंकस सिनेमे…आपले बरेच गुण जमले क राव 🙂

  आणि हो, कोपरयातले तुझ्या पोराचे फोटॊ एकदम सही आहेत…

 4. आमच्या सौ.ची पण तीच आवड आहे त्यामुळे संगणकावरील किंवा मोबाईलवरील ‘वॉलपेपर’ मी तीचाच लावला असुनही ती आक्षेप घेत नाही>>>
  i la lucky u aniket! :-O

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s