बि.आर.टी नंतर आता नॅ.आर.टी.


पुण्यातील ट्रॅफिकने भयंकर रुप केंव्हाच धारण केले आहे आणि ते सोडवण्यासाठी कोणीही कित्तीही प्रयत्न केले तरी सध्या तरी ते तोकडेच पडल्याचे दिसत आहे. म्हणजे बघा हा, कित्तेक दिवस भिजत पडलेले ‘मेट्रो रेल्वे’, ‘स्काय बस’, ‘ट्राम’ चे घोंगडे असो किंवा पुणेकरांच्या जिवावर उठलेले बि.आर.टी असो. पुण्याच्या ट्रॅफीकला काही म्हणजे काही फरक पडला नाही.

त्यातच आता भर पडणार आहे ‘नॅनो’ ची. नॅनो रस्त्यावर उतरल्यावर ट्रॅफीकचा जो बोजवारा उडणार आहे त्याची कल्पना सुध्दा करवत नाही. आय.टी. मुळे पुण्यातील बहुतेक मध्यमवर्गीय उच्च-मध्यमवर्गीय झाले आणि प्रत्येकाच्या घरी एक चारचाकी उभी राहीली. नॅनो आल्याने काय होईल तर ज्यांच्या ‘सौ’ आत्तापर्यंत मिळेल तेंव्हाच चारचाकी चालवत होत्या त्यांच्या हातात २४ तास दिमतीला एक नॅनो उभी राहील. भाजी आणणे, पार्लर ला जाणे, लेकराला शाळा, क्लासेस, ग्राऊंड वर ने-आण करणे अश्या अनेक कामांसाठी नॅनो आहेच ना. बायकांचे ड्रायविंग आधीच चर्चेचा विषय असताना अश्या अनेक स्त्री चालकाच्या चारचाकी रस्त्यावर आल्या तर ‘आधीच मर्कट त्यात दारु प्यायलेले’ अशीच परिस्थीती व्ह्यायची. अर्थात याला अपवाद आहेतच, मी सरसकट सर्वच स्त्रियांचे ड्रायविंगला नावं नाही ठेवत, पण स्व-अनुभवावरुन असे लिहीणे मला भाग पडले इतकेच.

आता बि.आर.टी का आली तर बसेसचे ते मोठ्ठे धुड रस्ता अडवुन ट्रॅफीकच्या प्रॉल्बेम मध्ये भरच घालत होती. बसेसचे जाणे येणे सुरळीत व्हावे, इतर वहानांना त्याचा त्रास होऊ नये म्हणुन बसेस साठी वेगळे रस्ते ठेवले, जे ‘बि.आर.टी’

उद्या या हजारो नॅनोंचा ट्रॅफीकला असाच उपद्रव चालु झाला तर नॅनोसाठी वेगळे रस्त आखले- ‘नॅ.आर.टी’ म्हणुन तर आश्चर्य वाटायला नक्को ssss!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s