डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

भली मोठ्ठी कासवं

Leave a comment


भलं मोठ्ठ कासव
‘ऍनीमल प्लॅनेट’ माझा अतीशय आवडता चॅनल आहे. ऑफीस मधुन घरी आलो की आवरुन लगेच टि.व्ही वर मी हाच चॅनल लावुन बसतो. तर काल संध्याकाळी असाच बघत बसलो असताना ‘स्टीव्ह आर्यविनचा’ ‘गॅलपगॉस आयलंड’ (Galápagos Islands) वरील वन्यजीव सृष्टी संबंधीत कार्यक्रम लागला होता. काय मस्त मस्त प्राणी होते त्या छोट्याश्या बेटावर. पण माझे लक्ष वेधुन घेतले ते तेथील महाकाय कासवांनी. काय मोठ्ठी कासवं होती ती बापरे. मला एवढे मोठ्ठे कासव असु शकते यावर विश्वासच बसत नव्हता. वरील चित्र तुम्ही बघीतले असेलच. खुप मस्त माहीती सांगीतली ‘स्टीव्ह’ ने. ‘ब्ल्यु फुटेड बुबी’, ‘विवीध प्रकारचे एग्युना’, ‘सि-लायन्स अर्थात सील-मासे’, ‘शार्क्स’, ‘रे फिश’ हे सगळे बघता बघता एक तास मी अक्षरशः खिळुन गेलो होतो.

कासव हा प्राणी माझा पहिल्यापासुन आवडीचा. कसलीही घाई नाही. संथ, आपल्याच धुंदीत आरामात असणारा हा प्राणी. शांतपणे इकडे तिकडे फिरणार, खाणं पिण, चिखलात लोळणं, झालंच तर थोडे पोहोणे आणि आराम करणे. कसलीही चिंता नाही. पाठीवर ढाली प्रमाणे असलेले कवच, त्यामुळे भिती अशी कशाची नाही!! एकुण सुखासीन जिवन वाटते त्यांचे. मला नेहमी वाटते देवाने मला पुढचे आयुष्य कुठले हवे असे विचारले तर कदाचीत मी ‘कासवाचे’ असेच उत्तर देईन.

असो, तुम्हाला संधी मिळाली तर तो कार्यक्रम परत कधीतरी लागेलच तेंव्हा जरुर बघा. कासवात इंटरेष्ट नसला तरी, ‘Galápagos Islands’, एकुणच तेथील वन्यजिवन आणि पक्षांची वैवीधता तुम्हाला भुरळ घालेल यात शंकाच नाही.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s