सजवा तुमचे फोटो


पुर्वीच्या काळी, फोटो बद्दलच्या आठवणी, तारखा इत्यादी फोटोच्या मागच्या बाजुला लिहुन ठेवायची पद्धत होती. काळानुरुप त्यात बदल झाले आणी आता फोटो-अल्बममध्येच ही सोय उपलब्ध झाली. फोटोच्या खालीच तारीख, वेळ आणी एखादी ओळ लिहायला जागा निर्माण झाली. ‘A photo speaks a thousand words’ हे सत्य असले तरी त्याला आपला असा खास शैलीतला आठवणींचा ठेवा जोडता आला तर कित्ती छान ना? किंवा २-४ फोटो एकत्र करुन त्याला काही सजावट करता आली, प्रत्येक फोटोबद्दल थोडी माहीती, शेरे किंवा इतर काही जोडता आला तर बहारच नाही का?

गेल्या वर्षी अशीच एक पद्धत माझ्या पहाण्यात आली. ‘डिजीटल स्क्रॅपबुक’ असे त्याचे नाव. ही पद्धत वापरुन एक किंवा अनेक फोटो एकत्र करणे, सजवणे, त्याबद्दलची माहीती लिहीणे हे सर्व तुम्ही एकाच ठिकाणी करु शकता. कसे? मी बनवलेल्या फोटोंच्या काही स्लाईडस खाली जोडल्या आहेत.

यासाठी काय लागते?
फोटो, ग्रॅफिक्स मॅनिप्युलेशन साठी वापरात असलेले ‘पेंट शॉप प्रो’ किंवा ‘ऍडोबे फोटोशॉप’ सारख्या काही संगणक प्रणालींची जुजबी माहीती, तुमच्या फोटोंची डिजीटल आवृत्ती, महाजालावर मोफत किंवा थोडेफार पैसे देउन उपलब्ध असलेले डिजीटल रंगीत कागद, डिजीटल एलीमेंट्स (किंवा एम्बेलीशमेंट्स), इतर डिजीटल साहीत्य जसे रंगीत रिबिन्स, रंगीत बटन्स, फोटो फ्रेम्स आणि बरेच काही. वर उल्लेख केलेल्या संगणक प्रणालीत तुम्ही पारंगत असाल तर या गोष्टी तुम्ही स्वतः सुध्दा बनवु शकता. काही वेळेला हे स्क्रॅप-पेजेस ‘रेडी-टु-युज’ किंवा ‘क्विक-पेज’ नावाने उपलब्द असतात म्हणजे सगळा मसाला तयार, तुम्ही फक्त तुमचा फोटो त्यात सरकवायचा आणि झाले तुमचे ‘डिजीटल स्क्रॅप-पेज’ तयार. तसेच संपुर्ण ‘किट’ पण मिळतात म्हणजे कागद-रिबिन्स,बटनं, फ्रेम्स हे सगळे एकमेकांना अनुरुप रंगाचे, आकाराचे, एकमेकांशी ताळमेळ ठेवुन एक ‘थिम’ तयार करणारे.

मी सुध्दा बराचसा मसाला हा संगणकावरुनच उतरवुन घेतलेला आहे. मात्र याचा संगणकावर उतरवुन घेतानाचा फाईल-साईज जास्ती असतो. कमीत-कमी १५-२० एम.बी पासुन ९०-१०० एम.बी पर्यंत तेंव्हा तुमच्याकडे असणारे महाजाल तितके लिमीट आणि वेग असणारे असावे.

चला तर मग करा थोडा प्रयत्न आणी सजवा तुमचे फोटो. काही मदत / माहीती हवी असल्यास जरुर कळवा.

Advertisements

One thought on “सजवा तुमचे फोटो”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s