शाल वुई डान्स?


शाल वुई डान्स
खरंच सांगतो, मला ना या हॉलीवुडवाल्यांच फार कौतुक वाटतं. म्हणजे आपल्याकडे चांगले सिनेमे बनत नाही असे नाही. पण त्यांच्याकडचे विषय इतके वेगळे असतात आणि तरीही त्याची योग्य हाताळणी, सुयोग्य अभिनय आणि तांत्रीक सहाय्यता तेथील सिनेमाला एका वेगळ्याच पातळीवर नेहुन ठेवतात.

काही दिवसांपुर्वी “शाल वुई डान्स?” या नावाचा एक हॉलीवुड पट पहाण्यात आला. एस. ई. एक्स. वाय. जेनीफर लोपेज( जे.लो), शिल्पा शेट्टीवर चुंबनांचा वर्षाव करणारा रिचर्ड गिअर ही दोन प्रमुख पात्र या चित्रपटात आहेत. गोष्ट फार काही मोठी नाही. रिचर्ड एक एस्टेट एजंट असतो. लग्न झालेला, एक अपत्य असलेला सुखासीन माणुस. जिवनात फार काही वेगळे घडावे किंवा मिळवायचे रहायलेय असे नसलेला. ऑफीसमधुन घरी परतताना रेल्वेच्या खिडकीच्या काचेतुन त्याला एका इमारती बसलेली एक तरूणी (जे.लो) नेहमी दिसायची. शुन्यात नजर लागलेली, चेहऱ्यावर खिन्न भाव असलेल्या त्या तरुणीशी त्याची काही वेळेला नजरानजर पण व्हायची. बरेच दिवस असे झाल्यावर त्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागते. शेवटी एके दिवशी तो रेल्वेमधुन मधेच उतरतो आणि त्या इमारतीमध्ये शिरतो.

ती इमारत एका “डान्स क्लास” ची असते. रिचर्ड ही लगेच त्या क्लासला नाव नोंदवतो. परंतु पहील्याच दिवशी त्याच्या पदरी निराशा पडते कारण त्याची डान्स टिचर ही जे.लो. ऐवजी दुसरीच कोणीतरी असते. काही दिवसांनंतर त्याची आणि जे.लो. ची भेट होते तेंव्हा जे.लो त्याला स्पष्ट सांगते की “जर का तु डेटींग साठी हा क्लास लावला असशील तर ते कधीच शक्य नाही, त्यापेक्षा तु इथुन चालता हो.”

पण एव्हाना रिचर्ड ला डान्स आवडायला लागलेला असतो. तो जिद्दीने क्लास चालु ठेवतो. पुढे पुढे त्याची आणि जे.लो. ची चांगली मैत्री जमते. दोघे मिळुन एका प्रतीयोगीते मध्ये ही भाग घेतात. रिचर्ड मध्ये झालेला बदल त्याच्या पत्नीच्या लक्षात येतो आणि संशय आल्यामुळे ती त्याच्यावर लक्ष ठेवायला एक खाजगी गुप्तहेर नेमते.

पुढे काय होते? रिचर्ड-जे.लो जोडी ती प्रतीयोगीता जिंकतात का? रिचर्ड आणि त्याच्या पत्नीमध्ये आलेला दुरावा आणि संशयाचे मळभ दुर होते का? हे सर्व जाणण्यासाठी हा “फिल-गुड” सिनेमा बघणेच योग्य ठरेल.

आय.एम.डी.बी. रेटींग ६.१/१०
माझे मात्र ८/१०

उत्क्रुष्ट अभिनय, संगीत, छायाचित्रीकरण मांडणी सर्वच उत्तम. जे.लो. चा अभिनय ही नक्कीच जमेची बाजु आहे. ‘ऍनाकोंडा’, ‘मॉन्स्टर इन लॉ’, ‘मेड इन मॅनहॅटन’ प्रमाणेच तिचा वावर, अभिनय आणि तिचे रुप सर्व काही ए-वन

5 thoughts on “शाल वुई डान्स?”

  1. malahi prachand awdla to movie..
    spardhechya adhicha tya doghancha dance tar kevaL aahe !
    jlo tar chhan ahech.. pan richard gere aflatun ahe yaat ! awesome acting and dancing ! 🙂

    1. मला त्यातील छायाचित्रीकरण पण खुप आवडले. प्रकाश योजना अतीशय उत्तम. स्पर्धेच्या आधी जो दोघांचा डान्स दाखवला आहे त्या क्लास मध्ये त्यावेळी वापरलेला तो डिम-पिवळा प्रकाश त्या सिन ला काय सुंदर बनवतो आणि त्यात ते बॉल-रुम चे रोमॅन्टिक संगीत.. व्वा.. खरंच अफलातुन!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s