ऐकावे जनाचे करावे मनाचे.. की डोक्याचे?


मराठीमध्ये “ऐकावे जनाचे करावे मनाचे” अशी म्हण फार पुर्वीपासुन प्रचलीत आहे. पण काळ बदलला, संदर्भ बदलले आणी व्याख्याही बदलल्या. आजकालच्या जमान्यात हीच म्हणं खरंच योग्य आहे का? ठिक आहे.. तुम्ही ‘जनाचे’ नका ऐकु.. पण मग आपल्या मनाचे ऐकायचे का डोक्याचे? मनाचे ऐकुन वागणारा हा बऱ्याच वेळा भावना-प्रधान, नातेसंबंध मानणारा, तत्व सांभाळणारा असतो. परंतु हे सर्व करताना आजच्या ‘रॅट-रेस’ मध्ये मागे पडलाय, कमकुवत पडलाय असेच दिसुन येते. याउलट डोक्याचे ऐकणारा हा या सर्व गोष्टी पायदळी तुडवणारा तरीही सर्व गोष्टींमध्ये आघाडीवर असणारा आढळुन येते आहे.

मग अश्या परीस्थीत वागायचे कसे? माझीही परीस्थीती अशीच संभ्रमावस्थेची झाली आहे. कुणाचे ऐकावे. आजकाल प्रत्येक गोष्टीची मला दोन उत्तर मिळतात. एक मनाचे जे मला भावणारे असते, पटणारे असते. परंतु डोक्याने सांगीतलेले उत्तर मनाच्या उत्तरातील खाच-खळगे दाखवते, त्यात होणारी पराजीतेची जाणीव करुन देते. मग माझी अवस्था एखाद्या लहान मुलासारखी होते. काय करावे काहीच कळत नाही. मनाचे म्हणणे पटत असुन सुध्दा परीस्थीतीनुरुप डोक्याचे ऐकुन मी निर्णय घेतो आणि त्यानंतर होणाऱ्या मानसीक कुचंबणेचा बळी ठरतो. मग सुरु होते ‘टग-ऑफ-वॉर’- रस्सीखेच. मनं म्हणते माझेच बरोबर होते, तु माझे ऐकायला पाहीजे होते, तर डोकं आपल्या निर्णयावर ठाम असते, काही नाही जे झाले ते चांगलंच झालं.. मीच बरोबर.

आणि मी?? मी असहाय्य पणे दोघांच्या या ओढाओढीचा खेळ मुक साक्षीदार होऊन पहात बसतो.

पुर्वीच्या काळची एक गोष्ट आठवते, एक राणी आरश्यासमोर उभी राहुन आरश्याला प्रश्न विचारायची, “सांग आरश्या, या जगात सर्वात सुंदर कोण??” आणी आरसा तिला खरं खरं उत्तर द्यायचा.

असंच खरं खरं उत्तर देणाऱ्या आरश्याची मला आज गरजं आहे!!!

Advertisements

2 thoughts on “ऐकावे जनाचे करावे मनाचे.. की डोक्याचे?

  1. नमस्कार
    पगडी पुराण वाचून आवर्जून प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद. आपला भुंगाही वाचनीय असून सर्व फोटोही एकदम झकास.
    शेखर

  2. Kharach asa mazhya hi babtit anekada hota, pan bhavna pradhan nirnay ghen jamat nahi, aani mag honare tras hi khupach kadu asatat, pan bhudhi matra kadhi aapan chuk ahot asa sangat nahi ulat ti aapalya nirnaya var tham asate
    manache tas nasat te kadhihi aapal mat badalte pan dar veli tech mala samjun get thanks ek god anubhav share kelyabadal

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s