आमच्या भु भु चा आज हॅप्पी बर्थडे


स्विटी
जेंव्हा कोणी मला विचारतं, “तुझ्या घरी कोण कोणं असतं?”, तेंव्हा मी म्हणतो ६ जणं, ज्यामध्ये आमच्या या भु-भु चा सुध्दा नंबर लागतो. गेली १० वर्ष (कुत्र्यांच्या दृष्टीने वय वर्ष ९०), “स्विटी” आमच्या घरी आहे. आणली होती तेंव्हा एक छोटेसे पिल्लु होते. ती आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारात आमच्या बरोबर आहे. केवळ तिच्याच भरवश्यावर आम्ही निश्चींत असतो. जरा कुठे खुट्ट झाले की ही ओरडुन-ओरडुन घर डोक्यावर घेते. कधी कधी वैतागही येतो, पण १-२दा शेजारच्या सोसायटीमधील गेले पण आमच्या गच्चीवर टाकण्यात आलेले कपडे, वाळवण केवळ हिच्यामुळेच चोरीला जाता जाता वाचले.

कधीही बाहेरुन घरी आलो की स्विटी नेहमीच दारात हजर असते. आल्या आल्या अंगाशी घुसळण, उड्या मारणे, उलटे-पुलटे पडणे असले प्रकार पाहुन बाहेरुन आलेला शीण घराबाहेरच रहातो. बहुतेक वेळेला कुठे बाहेरगावी जाताना सुध्दा आम्ही तिला घेउनच जातो. मध्ये एकदा ती खुप आजारी होती तर आम्ही घरातील सगळे बैचैन झालो होतो.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिला दुध पोळी वगैरे प्रकार आवडत नाही. तिला काय आवडते सांगु?? ‘पोहे, भेळ, कॅडबरी, कैरी घातलेली ओली डाळ, बटाटे वडे…” मज्जा वाटली ना ऐकुन?? हो पण हे खरं आहे.

खरंच कित्ती लळा लावला आहे तिने आम्हाला. तिला उदंड आयुष्य मिळो हीच प्रार्थना.

2 thoughts on “आमच्या भु भु चा आज हॅप्पी बर्थडे”

 1. It’s great to have such family member in your life. I am missing our family like you and named as Jigi. She is very cute and loving. 2 month back she has passed away with a association of 12 years to myself and our family. I am really missing her and everyday we remember her.

  If you want to see her then mail me on

  sgsagar@gmail.com

  I will send you.

  bye

  Regards

  Sagar S. Gholap

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s