मुर्ती लहान पण किर्ती महान


ऱ्युकांजी जेलीफिशस्ट्रेलियामधील सगळ्यात भयानक आणि जिवीतहानी पोहोचवणारा जलचर कुठला या प्रश्नाचे उत्तर एक २.५ से.मी छोटासा आणी अती नाजुक (इतका नाजुक की जर त्याला काचेच्या भांड्यात ठेवले तर तो काचे वर आपटुन चक्क मरतो) असा हा जेली-फिश हे आहे.

आश्चर्य वाटले ना? काल ‘ऍनीमल प्लॅनेट’ वर एक खास कार्यक्रम या माश्यावर आयोजला होता. तो बघत बसलो आणि आश्चर्याचे एकावर एक धक्के बसत गेले. इतका छोटा तरीही इतका घातक? या माश्याबद्दलची बहुतेक सगळी माहीती मला कार्यक्रमातुन मिळालीच तरीही अधीक माहीती मिळावी म्हणुन नंतरचा एक तास महाजाल पिंजुन काढण्यात घालवला.

जेलीफीश या वर्गातील ‘एह-रु-कांजी’ हे या प्राण्याचे शास्त्रीय नाव. ऑस्ट्रेलीया मध्ये ऑक्टोबर ते मे या कालावधीमध्ये समुद्रात हे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. हे इतके घातक आहेत की काही समुद्रकिनारे या कालावधीमध्ये पोहोण्यासाठी चक्क बंद ठेवले जातात. याचा डंख बसलेला माणुस वेळीच आणि योग्य उपचार मिळाले नाहीत तर आपला जीव गमावु शकतो. याच्या शरीराची रचना इतर जेलीफीश प्रमाणेच आहे. त्याच्या डोक्याच्या भागावर एकुण ६ छोटी भोक असतात त्यातील ४ सुक्ष्म प्रकाश किरण बाहेर सोडुन समोरची आकृती तयार करतात तर २ हे बघण्याचे काम करतात. हे ‘डोळे’ एका जागेवर फिक्स बसवलेले नसतात. त्यामुळे जेलीफीश कसाही उलटापुलटा झाला तरी हे डोळे त्याप्रमाणे उलटे होतात, त्यामुळे ह्या जेलीफिशला कुठल्याही अवस्थेत समोरचे सरळच दिसते. रात्रीच्यावेळी शांत पाणी (कमी वेगाचा प्रवाह असलेला भाग) बघुन हे मासे विश्रांती घेउन उर्जा साठवतात.

याचा डंख झाल्यास अतीशय वेदना होतात. रक्तदाब कमीतकमी दुप्पटीने तर ह्रुदयाचे ठोके तिपटिने वाढतात. अंगाला खाज सुटते, सर्व शरीरभर अतीशय वेदना होतात खासकरुन पोट, पाठ, हात आणि पाय, अस्वस्थपणा, उलट्या, डोकेदुखी, सर्वांगाला घाम फुटेणे अशी लक्षणे दिसुन येतात. हा त्रास साधारण २० तास तरी रहातो.

हे फिश नक्की कधी येतात कधी जातात?, त्यांची जिवनशैली काय आहे?, ते प्रजनन कधी, कुठे करतात?, त्यांच्या एवढे विषारी असण्याचे कारण काय? त्यांच्या डंखावर प्रभावी उपचार काय? या सर्वावर सध्या शोध चालु आहे.

3 thoughts on “मुर्ती लहान पण किर्ती महान”

  1. chitravarun aase watate ki ya prakarche jeev samudrakhali 30 te 40 kilometer madhe aastat, tya divashi discoveryvar dakhavat hote.

    1. बरोबर, जास्ती खोलात नसतात. आणि इतके लहान असतात की डोळ्यांनी पटकन दिसुनही येत नाहीत/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s