५००० बी.सी.


नाही नाही, मी बी.सी. म्हणजे ‘बिफ़ोर ख्रिस्ट’ बद्दल बोलत नसुन माझ्या ‘ब्लॉग काउंट’ बद्दल बोलतोय. माझा मराठी ब्लॉगींग चा हा पहीलाच प्रयत्न. ब्लॉग सुरु करुन जेमतेम १ महीना ९ दिवस होत आहेत आणि ब्लॉग काऊंट चक्क ५००० च्या वर पोहोचला आहे. खुप मजा वाटली आणि आनंद ही झाला.

त्याचबरोबर हा एका छोटासा ‘माईलस्टोन’ गाठताना अनेक गोष्टींचे आभार मानावेसे वाटतात:

 • महेंद्रजी, अभिजीत, समवेद, वाय.डी, श्रध्दा, किर्ती, नितीन, अजीत, शेखर, श्वेता, सहजच, मृदुला, भानसा या आणि अजुनही अनेक लोकांनी वेळोवेळी प्रतिक्रिया देउन माझा लेखनाचा उत्साह द्विगुणीत केला त्याबद्दल त्यांचे आभार.
 • मराठीब्लॉग्स.नेट ज्यांनी माझा ब्लॉग त्यांच्या श्रुंखलेत समाविष्ट करुन अनेक वाचकांपर्यंत पोहोचवला.
 • माझे आई-बाबा ज्यांनी मला मराठी माध्यमात घालुन मला मराठी भाषेचे शिक्षण दिले.
 • माझे शाळा शिक्षक (रत्नागिरी आणि पुणे दोन्ही ठिकाणातील) ज्यांनी वेळोवेळी मला व्याकरण सुधारावे म्हणुन अनेक उपाय केले. त्यांची आठवण रहावी म्हणुन माझ्या व्याकरणाच्या चुका अजुनही चालुच ठेवल्या आहेत.
 • पत्नी आणि छळवादी कार्ट ज्यांनी मला लिखाणासाठी (वेळोवेळी नापसंती दाखवुन का होईना) वेळ दिला
 • मराठी लिखाणासाठी वापरत असलेली ‘बराहा’ संगणक प्रणाली आणि ती बनवण्यासाठी जिवाचा आटा-पिटा केलेले संगणक अभीयंते. त्यांच्या परीश्रमाने आज मी मराठीत लिहु शकतोय.
 • संगणक, तो बनवण्यात गुंतलेले असंख्य अभियंते
 • माझा मेंदु (छोटा आणि मोठा)

लिस्ट खुप मोठी आहे, पण १०००० झाले की बाकीचे 🙂 सध्या पुरते या सर्वांचे अतीशय आभार. असाच लोभ कायम रहावा

8 thoughts on “५००० बी.सी.”

 1. 5000, जोरदार आहे भाउ, अभिनंदन !

  आभारप्रदर्शनपण भारी – दोन्ही मेंदूंचा विचार केला, आजकाल कुठे लोकं असा सगळ्यांचा विचार करतात 🙂

 2. अभिनंदन.. ५००० काउंट खरंच क्रेडिटेबल आहे. म्हणजे साधारणपणे रोजचा काउंट साधारणपणे १५० च्या आसपास जातो. अभिनंदन….

  1. धन्यवाद. आणि तुमची ही कमेंट नं १०० एक शुन्य शुन्य 🙂

 3. अनिकेत,
  नमस्कार
  सर्वप्रथम आपले हार्दीक अभिनंदन. एका महिन्यात ब्लॉगला पाच हजार वाचकांनी भेट दिली ही बाब निश्चीतच कौतुकास्पद आहे. आपले लेखन हे लोकप्रिय आणि वाचकप्रिय असल्याचे ते द्योतक आहे. असेच लिहित राहा. पुढच्या महिन्यात दहा हजार आणि लवकरच अर्धा लाख संख्या होवो, यासाठी शुभेच्छा
  शेखर जोशी

  1. धन्यवाद तन्वी 🙂 माफ करा मला नाव माहीत नव्हते.

 4. lai bhari rao, tumche likhan asech chalu thewa. tumcha patta sanga mahanje pune yethe aalo ki bhetach gheyen aapali. mail pe add post kar do. mumbai meain aanese pehale kalvo parkat pher phatka maru.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s