झुझु – पांढऱ्या आकृत्या


आय.पी.एल च्या दरम्यान प्रर्द्शीत होणाऱ्या व्होडाफोनच्या जाहीराती सगळ्यांच्या चर्चेच्या आणि पसंतीच्या ठरत आहेत. त्याबद्दल थोडी माहीती.

सगळ्यांत पहीले म्हणजे ह्या जाहीराती ‘ऍनीमेटेड’ नसुन खऱ्या खुऱ्या लोकांवर चित्रीत करण्यात आलेल्या आहेत. ह्या जाहिरातींसाठी शक्यतो लहान मुले आणि बायकांचा वापर करण्यात आला आहे जेणेकरुन हे कॅरेक्टर्स आकाराने छोटे दिसतील. ह्या कॅरेक्टर्स चे ‘झुझु‘ असे नामकरण केले आहे. अर्थात जाहीरातीमध्ये कोठेही याचा उल्लेख नाही.

या जाहीरातींमधील चॅलेंजींग आणि सक्सेस भाग म्हणजे झुझुंच्या चेहऱ्यावरील हाव-भाव. जाहीरातकार येथे जिंकले आणि या जाहीराती प्रचंड लोकप्रिय झाल्या. ‘फेसबुक’ नावाच्या ‘सोशल-नेटवर्कींग’ साईटवर याची कम्युनीटी आहे आणि साधारणपणे ५००० हुन जास्त ‘झुझु फॅन’ ही आहेत. एवढेच नव्हे तर ‘यु-ट्युब’ सारख्या साईटवर जास्तीत जास्त वेळा पाहील्या गेलेल्या व्हिडीओ-मध्ये ‘झुझु’ च्या व्होडाफोनच्या जाहीरातींचा नंबर लागतो.

झुझु१ झुझु मजेशीर वाटावेत यासाठी त्यांची वेषभुशा ही तशीच मजेशीर करण्यात आली आहे. हा वेष दोन भागांचा आहे. डोके आकाराने मोठे तर बाकीचे शरीर लहान. बाकीचा सेट हा पुर्ण पणे राखाडी रंगात स्प्रे-पेंट करण्यात आला आहे. खरे झुझु तरीही आकाराने खुपच मोठे आहेत. जाहीरातींमध्ये ते छोटे दिसावेत म्हणुन ‘हाय-स्पीड’ कॅमेरातुन या जाहीराती चित्रीत केल्या गेल्या आणि नंतर त्यावर संगणकाने थोड्या प्रक्रिया केल्या गेल्या.

झुझु२ या जाहीरातींचे चित्रीकरण ‘ओ ऍन्ड एम’ संस्थेने ‘केप टाऊन, साउथ अफ्रीका’ येथे केले आहे. आणि मजा म्हणजे यातील काही पात्र ही चक्क अफ्रिकन आहेत. मध्ये कुठल्यातरी एका चॅनलवर या जाहीरातींचे ‘मेकींग’ दाखवत होते. तेंव्हा एक कृष्णवर्णीय अफ्रीकन एका खुर्चीवर डोक्यावर ‘ते’ डोके हेल्मेटसारखे ठेवुन आराम करत बसला होता. काही झुझु इकडुन तिकडे फिरत होते. फार मजा वाटत होती बघायला.

सध्या साधारण पणे १० जाहीराती दुरचित्रवाणीवर येत आहेत, अजुन अश्याच २० नविन जाहीराती लवकरच दुरचित्रवाणीवर येणार आहेत.

सो.. ऍन्जॉय !!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s