इमोशनल अत्याचार


लहान मुलांचे तिसरे वय ‘वेडे’ असते असे म्हणतात. आमच्याकडे पहिल्या-दिवसापासुनचे वय ‘वेडेच’ आहे. आता तिसरे चालु आहे म्हणल्यावर तर पोराने वेडेपणाचा कळसच गाठला आहे. ‘रामदास स्वामी’, तुम्ही चुकला नाहीत, तुम्ही बरोबर होतात जे लग्नाच्या मंडपातुन पळुन गेलात.

सध्या मी काहीतरी केले आणि त्याचा इतका त्रास झाला आहे त्या घटनेबद्दल थोडेसे. “पायावर कुऱ्हाड नाही”, कुऱ्हाडीवर पाय मारुन घेतला आहे. मला कळत नाही हे असले सगळे प्रकार माझ्याच बाबतीत का होतात?

तर.. पोराने सध्या इतक्या वाईट सवयी लावुन घेतल्या आहेत. शाळेत काय जायला लागला, सगळ्या वाईट सवयी घरी आल्या आहेत. नाकात बोट घालणे, चिमटे काढणे, जोर-जोरात ओरडणे, बोचकारणे हे तर कॉमन झाले आहे. बर जरा कुठे खुट्ट झाले, मनाविरुध्द झाले की साहेब बसलेच खाली भोंगा पसरुन. मग मी काय केले, तो असले काही वाईट प्रकार करायला लागला की मी लगेच मोबाईलच्या कॅमेरातुन त्याचा फोटो टिपु लागलो. लगेच त्याला म्हणलो ‘हा बघ तुझा फोटो काढला आहे.. आता हा फोटो मी तुझ्या टिचरना आणि तुझ्या फ्रेंड्स ना दाखवणार, मग सगळे तुला हसणार, कुठल्याच गर्ल्स तुझ्याशी बोलणार नाहीत” वगैरे. त्याचा परीणाम चांगला झाला. बाबा फोटो काढतील या भीतीने तो ज्या गोष्टी सरेआम करत होता ते निदान माझ्यापासुन लपुन लपुन करु लागला.

काही दिवस ठिक गेले पण दुर्दैव आड आले. हळु हळु त्याला याची सवय झाली आणि त्याला मजाच वाटु लागली. काल तर कमालच झाली. आम्ही किराणा खरेदीसाठी ‘बिग-बाझार’ मध्ये गेलो होतो. कार्ट्याच्या आले ना अंगात हे हवेय, ते हवेय चालु झाले. मी सवयीने म्हणालो, “फोटो काढीन हा!”, तर म्हणाला..”काढा फोटो” मग मी फोटो काढत नाही म्हणल्यावर परत बोंबाबोंब चालु. इतके ऑकवर्ड झाले होते ना, सगळे बघत होते. शेवटी काढला एक फोटो. थोडा वेळ गेला आणि परत बोंबाबोंब चालु, परत फोटो. आमची फॅमीली काल नक्कीच चर्चेचा विषय झाली असणार आहे. पोरगं रडतेय आणि बाबा फोटो काढत आहेत. किराणा खरेदी होइपर्यंत ही मिरवणुक चालु होती.

बर सौ. ने पटापट खरेदी उरकावी ना. पण कसलं काय. देवळात जसे आपण जाउन घंटा वाजवतो आणि नमस्कार करुन पुढे जातो अगदि तस्सेच. कुठेतरी जायचे ती वस्तु हातात घेउन बघायची की वरात पुढच्या काऊंटरला. अधुन मधुन माझे फोटो चालुच. पोरगं रडलं की फोटो, रडलं की फोटो. फोटो नाही काढला की हे अवलादी कार्ट अजुन बोंबलत होतं. अंगाचा इतका तिळपापड झाला होता ना.

बरं पोरगं इतक गोड आहे ना की हात उचलवत नाही त्याच्यावर. फुल्ल इमोशनल अत्याचार चालु आहे सध्या. त्यामुळे कुठे बाहेर गेलो की शक्यतो त्याच्या मनाविरुध्द काही करायला मी घाबरतोच. २८ नोव्हेंबर, तिसरं वय संपायला अजुन जमाना आहे.. देवा.. सहनशक्ती दे रे बाबा!!

रडण्याची सुरुवाती ही अशी हळुच ओठ वाकडे करुन होते
रडण्याची सुरुवाती ही अशी हळुच ओठ वाकडे करुन होते

तौबा तेरा जलवा,
तौबा तेरा प्यार..
तेरा इमोशनल
अत्याचार.

11 thoughts on “इमोशनल अत्याचार”

  1. हेच हेच मी ऐकतो सगळ्यांकडुन. जिथे जातो तेथे.. कसलं गोड आहे. अहो पण घरी आम्ही काय भोगतोय ते आम्हालाच माहीत. बरेच किस्से आहेत त्याच्याबद्दलचे, एकदा सवडीने ऐकवीन 🙂

 1. तोंडाचा असा चंबु करुन रडणं.. त्याला हुंडू काढणं म्हणतात. माझी मोठी पण लहान असताना असेच प्रकार करायची.

  लहान असतांना ,तिला आई आणी बाबांखेरिज कोणिहि घेतलेलं चालत नव्हतं. तिला माझे काका, दुरदर्शन म्हणायचे.. आणि घरी कोणी आलं की त्याला ’व्यत्यय’!
  बाकी मुलगा मोठा गोड आहे हं..

  1. याचे पण तस्सेच, सकाळी उठल्यावर आईचं पाहीजे. दुसऱ्या कुणी अंगाला हातही लावायचा नाही. आई दिसे पर्यंत घरभर “आई-आई” करत बोंबलत फिरत असतं

 2. khup god pillu ahe tumach. maz dhakat pilluhi asach ahe. pan tich radayach karan vegal ahe. tila ola hat lavlela ajibat avdat nahi. ol bot jari lagal ki tichi bombalayala survat hote.

 3. एकंदरीत देणारा एका हाताने गोंडस पिल्लू देतो आणि तेव्हाच दुसऱ्या हाताने त्याचे ‘side-effects’. 😛
  ओजस मोठा झाल्यावर जेव्हा काहीच त्रास देणार नाही, तेव्हा तू कसा लहानपणी गोड होता, याची पोस्ट लिहिशील.
  बाकी, ‘फोटो काढू का’ ची भीती निर्माण करण्याची कल्पना अफलातून होती. नाहीतर बाकिच्यांना बागुलबुवा सोडून दुसरी भीती सुचतही नाही.

 4. अनिकेत अरे आता तो लहान आहे तोवर जे मिळेल ते क्षण वेचून ठेव. बघता बघता सोळा-सतराव्या वर्षी जाईल भूर्रररकन उडून दूर शिकायला. माझे पिलू असेच होते, घरातल्या सहा माणसांशिवाय बाहेरचे कोणी नुसते डोकावले तरिही दोन तास भोंगा चालू. फार गोड होता, अजुनही आहे पण गेला ना लांब. कॊलेज संपले की नोकरी की छोकरी की …हा हा हा.
  तुझे पोर गोड आहे नको रडवू त्याला. 🙂

 5. खरचं खुप गोड आहे तुमचा मुलगा…आमचं नंबर दोन पात्र पण असच आहे..नंबर एकनी कधीही चार लोकात ईज्जत काढली नाही पण ही कार्टी असलेच उद्योग करत असते…..नाव मस्त आहे पोस्टचे ईमोशनल अत्याचार…..सही!!

 6. माझा एक दोन वर्षाचा मुलगा असलेला मित्र मला विचारतो की प्रवीण बेटा कितना बडा होने के बाद उसको मारना शुरू कर सकते है?? नोट: अजुन आम्ही DINK (Double income no kids) आहोत 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s