नविन खरेदी- चित्रपटवेडा साठी


मी अतीशय चित्रपट वेडा आहे. शक्यतो कुठल्याही प्रकारचा चित्रपट मला चालतो. फक्त फरक एवढाच की एखादा प्रकार सुरु केला की एक म्हणजे एकच प्रकारचे चित्रपट मी बघत बसतो. उदाहरणार्थ ऍनीमेटेड की मग आठवडा, दोन आठवडे मी त्याच पठडीतले चित्रपट बघत बसतो. कौटुंबीक, हाणामारी, भावनीक, जादु-टोणे, नाग देवतेचे, मजेशीर, भुताचे, भितीचे कसल्याही प्रकारचे सिनेमे मी आवडीने बघतो.

माझे हे चित्रपट वेड जपण्यासाठीच मी एक नविन खरेदी केली. एक “प्रोजेक्टर” आणि एक “४ x ६ ची मुव्ही प्रोजेक्शन स्क्रिन”. यातील स्क्रिन ही हॉल मधील एका मोठ्या भिंतीला टांगली तर प्रोजेक्टर दुसऱ्या भिंतीला लागुन. त्यानंतर होम-थिएटर (ज्यामध्ये एक डी.व्ही.डी. प्लेअर आणि ८ मोठ्ठे सराऊंड साऊंड स्पिकर्स येतात) त्याचे आउटपुट जोडले. आता जेंव्हा मी एखादा सिनेमा प्ले करतो तेंव्हा त्याचे आऊटपुट समोरच्या मोठ्या पडद्यावर पडते. जोडीला जबरदस्त आवाजाचे स्पिकर्स आहेतच. अगदी घराचे एक-पडदा चित्रपट्गृह झाले आहे बघा!! सोबत चित्र जोडले आहेच.

सांगण्याचे कारण हे की तुम्हीही माझ्यासारखेच चित्रपट वेडे असाल आणि थोडे फार पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर घरच्याघरी उत्तम चित्रपटगृह बनवता येते. खर्चाचे बोलायचे झाल्यास प्रोजेक्टर साधारणपणे ३८,०००, ४ x ६ स्क्रिन ५,५००, वायर आणी जोडणी ३,००० बऱ्यापैकी चांगली (फिलिप्स किंवा सोनी) होम थिएटर सिस्टीम साधारणपणे १५,००० असा खर्च येतो. पण खरंच सांगतो प्रत्येक पैसा वर्थ आहे. सहकुटुंब बाहेर सिनेमाला जायचे म्हणले तर ६००-८०० रु खर्च नक्की अधीक खाणे, पार्कींग आणि जाणे येणे आहेच. यापेक्षा ही ‘वन टाईम इन्व्हेस्टमेंट’ बेस्ट आहे. हे सर्व खरेदी करण्यासाठी जवळजवळ वर्षभर मी पैसे साठवत होतो तो आत्ता योग आला.

तुमचे हे चित्रपट वेड अधीक ‘पॅम्पर’ करण्यासाठी तुम्ही एखादी चित्रपट- डिव्हीडी घरपोच पुरवणारी लायब्ररी लावु शकता. उदा. बिग-फ्लिक्स. मी महीना २०० रु या दराने दररोज एक या प्रमाणे जास्तीत जास्त ३० डिव्हीडी मागवु शकतो. त्यात अजुनही अनेक प्लॅन उपलब्ध आहेत. फक्त घरपोच डिलिव्हरी घेताना जरा बघुन घ्या. मला फार वाईट अनुभव आलाय. एकदा न बघताच एक डि.व्हि.डी घेतली आणि ती तुटकी निघाली, ज्याचे खापर माझ्यावरच फोडले गेले आणि त्याचे पैसे मला भरावे लागले.

असो, तर यासाठी अधीक माहीती हवी असल्यास जरुर कळवा. तुम्ही पुण्यात रहाणारे असाल तर प्रोजेक्टर आणि मुव्ही-स्क्रिन त्याची जोडणी हे सर्व नळस्टॉप वरील ‘सुजाता कंप्युटर’ कडे मिळु शकेल.

Movie Screen
Movie Screen

Projector
Projector

Advertisements

5 thoughts on “नविन खरेदी- चित्रपटवेडा साठी”

 1. शेवटी घेतलासच का तु?

  काही कळत नाही बघ, एकदा इन्क्रिमेंट नाही म्हणतो आणि दुसरीकडे अश्या जोरदार खरेद्या करतोस?

  बाकी काही म्हण, एकदा यायलाच पाहीजे तुझ्या घरी हा भन्नाट प्रकार एन्जॉय करायला.

 2. बराच दिसतोय हा प्रकार. कालच पाहिला एका मित्राकडे.आमच्या इथे दोन बिएचके मधे एक्स्टॉ बेडरुम नाही ना, नाहितर लावला असता हा प्रोजेक्टर. प्रोजेकटर अगदी २५ हजारापासुन मिळतो. मी स्वतः पण बघुन आलो होतो , पण जागा नाही म्हणुन राहिलं… भन्नाट आय्डीया आहे ही.

 3. Hi Aniket,
  Accidently came to your blog through Mahendra Kulkarni’s blog. But it was a real feast to read all your blogs.
  I was so engrossed while reading your blogs (at the company’s expense, I must confess !!!!) that I reached your old blog and kept on reading till July 07. Wonderful, wonderful blogs….
  I too have my own blog, not as good as yours, and we both definitely belong to different strata of society. But I dont know why, i could felt very much AAPLEPANA while reading your articles. Me too work for IT company, in Oracle Apps. After reading most of your write-ups, I am drawn in deep vortex of emotions. I cant tell you exactly, how I am feeling but I am completly floored by the kind of subjects you chose to write blogs on.
  In you, I could see a very sensitive, family person hidden inside successfull, pragmatic IT professional. Bravo !!
  Its awe-inspiring, its ultra-motivating, I feel very fortunate that I stumble upon your page. Kep writing more. Good Luck.
  Lots of love to Chi. Ojas !!!!

  P.S. – How you have created so many beautiful ‘visual scraps’ (name as u hv mentioned somewhere) ? I just missed the whole thing? Cud u just educate me on that??

  1. Thank you so much. Really gr8 comment. You made my day 🙂

   This thing is called as ‘Digital Scraps’. I will reply to your email in detail

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s