पावसाळी संध्याकाळ


“Its raining men”.. Whether Girls चे गाडीमध्ये गाणं जोर-जोरात वाजत होत. आमचा आनंद गगनाला भिडला होता. आणि त्याला कारणही तसंच होतं. आज सगळ्यांचं प्रोजेक्ट सबमीशन पूर्णं झाले होते. इतके दिवस चाललेले अथक प्रयत्न, धावा-धाव, शोधा-शोध सगळे काही काळासाठी का होईना संपले होते.

गावाबाहेरच असलेल्या “टोनी-दा-धाबा” वर आम्ही सगळ्यांनी एक मस्त संध्याकाळ घालवली होती. तिथे विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रक-ड्रायव्हर्स बरोबर त्यांच्याच गाण्यावर भांगडा केला होता, भरपूर हादडले होते, आणि मदिरेमध्ये ज्याला “मूर्ती लहान पण कीर्ती महान” म्हणतात त्या टकीलाचा एक छोटासा पेग पण रिचवला होता.

घरी परतायला निघेपर्यंत ११ वाजून गेले होते आणि पावसाला मस्त सुरुवात झाली होती. ढाबा सोडून आम्ही हायवे ला लागलो. रस्त्यावर दिवे अजिबात नव्हते. “blistering barnacles”, “thundering typhoons” आणि असेच काही तरी बोंबलत आम्ही घरी परतत होतो. रस्ता पूर्णं पणे मोकळा होता.. त्यामुळे जास्त काळजी न घेताच मी गाडी पळवत होतो. मध्येच कोणीतरी झाडावर बसलेली हडळ दाखवत होते, तर मध्येच कोणालातरी, आकाशात उडती तबकडी दिसत होती. हास्य विनोद, गप्पांना उत आला होता.

इतक्यात……. रस्त्याच्या मध्ये कोणीतरी मला आलेले दिसले.. मी पूर्णं जोर लावून ब्रेक्स लावले.. पण पावसामुळे रस्ते जाम घसरडे झाले होते.. त्यामुळे गाडी घसरत पुढे गेली आणि कशालातरी आपटून पुढे गेली. कसलातरी.. थडाड..थड्ड.. आवाज झाला. मध्ये काय आले होते ते दिसले नाही पण काही तरी होते नक्की. गाडीत क्षणभर शांतता पसरली. काय होते ते?
कुण्या माणसाला वगैरे तर नाही ना उडवले?. नाही तर “I know what you did last summer” प्रमाणे नंतर तो आमच्या मानगुटीवर बसायचा. प्रिती आणी भावना तर जाsssम घाबरल्या होत्या. मागे वळून पाहिले पण काहीच दिसत नव्हते. सगळे म्हणायला लागले.. जाऊ देत.. चल जाऊ आपण.. पण मला कशाला धडकलो ते पाहायचेच होते. मी खाली उतरलो. गाडीचा एक फॉग लॅम्प फुटला होता. मी मागे चालत जाऊन शोधायचा प्रयत्न करत होतो. गाडीतले बाकीचे पण खाली उतरले. लांबवर काहीतरी पडले होते. मी परत गाडीत गेलो.. आणि गाडी वळवून उलट्या दिशेने आणली जेणे करून, दिव्याच्या प्रकाशात ते काय होते ते तरी दिसेल.

जवळ जाऊन पाहिले तर एक कुत्रं आडवं आलं होतं गाडीची जोरात धडक बसली होती. जबडा जवळ जवळ फाटलाच होता..पायातनं पण रक्त वाहत होतं. सगळ्यांच्या जीवात जीव आला.. हात्तिच्या कुत्रंच आहे होय.. हुश्श..! आपण उगाचच घाबरलो.. चला.. जाऊ या.. म्हणत सगळे मागे वळले.

माझी नजर अजूनही त्या कुत्र्यावर होती. ते वेदनेने तडफडत होते.. त्याला असंच सोडून जायचे?.. रस्त्याच्या मध्येच? म्हणजे अजून एखादी गाडी येईल आणि त्याच्या अंगावरून निघून जाईल. जोग्या म्हणाला.. अरे जाउ देना.. कुत्रं तर आहे.. जाईल मरून पण मला काही ते पटत नव्हते. . “ते काही नाही.. आपण याला दवाखान्यात घेऊन जायचे”, मी निर्धाराने म्हणालो. प्राणी प्रेमी असणारी, आणि स्वतःच्या घरीही कुत्रा पाळणाऱ्या प्रितीनेही याला दुजोरा दिला. मग बाकीच्यांचा विरोध पण मावळला.

ते जखमी कुत्रं आहे, चावणार तर नाही ना?, आपल्याला काही रोग तर होणार नाही ना..? असेल विचार मनात येत असूनही थरथरत्या हातांनी आम्ही त्याला उचलले. ते अजूनही विव्हळत होते. कुssई.. कुssई आवाज काढत होते. एव्हाना आम्ही पावसात पूर्णं भिजलो होतो. त्याला गाडीत आणून ठेवले. त्याच्या अंगातून अजूनही रक्त वाहतं होते.. २ मिनिटात सिट्स रक्ताने भरून गेले. आमच्या अंगालाही त्याचे रक्त लागले होते.

कसे बसे गावात आलो. एका ठिकाणी जनावरांचा दवाखाना सापडला.. तिथे त्याला भरती केले. डॉक्टरांनीही लगेच आवश्यक ते उपचार चालू केले. ३ दिवस ते कुत्रं दवाखान्यात होते. ज्या दिवशी त्याला सोडणार होते, त्या दिवशी आम्ही बिस्किट घेऊन त्याच्या स्वागताला गेलो. कुत्र्याला इमानदार का म्हणतात ते आत्ता कळले..आम्हाला पहाताच ते लगेच पळत-पळत येऊन अंगावर उड्या मारायला लागले. त्याचे ते डोळे.. ते डोळे.. एखाद्या उत्कृष्ट वक्त्यापेक्षाही जास्त काही बोलून गेले.

पुढे.. प्रिती त्या कुत्र्याला घेऊन आपल्या घरी गेली.. आता तीच्या घरी दोन कुत्री आहेत.. एक ऍना..पहिली पॉमेरीअन, आणि दुसरा हा आमचा…”I know what you did last summer!” वाला हिरो.

Advertisements

20 thoughts on “पावसाळी संध्याकाळ”

 1. Dude, Hats off !!!!
  I dont know what is so magnetic about your blog but I couldn’t resist reading it every now & then. Today I again surfed back ur old blogs on vox.com and went back till 2007. Thanks to thin workload oweing to slowdown in IT 😦 😦 I had time to read everything in detail.
  Amazing blogs….. and very straightdorward but captivating.
  I am also amazed to see your command on both langauges – Marathi & English. I also liked the variety of subjects you blogged on. Be it ur US trip or irritating M80 or ur routine updates of BP (u look very healthy mate !!! at least in recent pics;-)) or Sidney Sheldon…… everything looks interesting once it comes from you……
  Even the song “Ham Na Samaze the” or some forwards for that matter…..
  And no more need to praise beautiful scraps u put on…. u r simply fantabulous in that art……
  What I also want to appreciate is your honest efforts to regain health and very fluid but catchy commentory of the same….
  And above all, the fact that all this excellent stuff was created my Maharashtrian young person who is also an IT professional, made me feel very very proud.
  Good work, dude. I will eventually finish reading everything. But keep writing. I really enjoy your blog and your expressions.
  Cheers !!!!

  1. प्रतीक्रियेबद्दल धन्यवाद विक्रांत. या प्रतीक्रियाच अधीकाअधीक लिहीण्याचे बळ देतात बघ.
   बाकी आय.टी. स्लोडाऊन बद्दल न बोललेलेच बरे. कधि एकदा हे ग्रहण सुटणार आहे काही कळत नाही 🙂

 2. खूपचं छान लिहिल आहेस आमच्या घरी पण एक कुत्री आहे तिचं नाव आम्ही गुंता ठेवले आहे हे लिहिलेलं खरं आहे का?

  1. धन्यवाद.. वाचतो ना मित्रा.. प्रत्येक प्रतिक्रिया वाचतो… हातातले काम सोडुन वाचतो. फार म्हणजे फार मोलाच्या आहेत ह्या प्रतिक्रिया ज्यामुळेच तर मी अधीकाीक लिहु शकतो.. पण प्रत्युत्तर करायला जमतेच असे नाही रे.. आणि सध्या तर फार कामात मग्न आहे त्यामुळे खरंच वेळ नाही मिळत त्याबद्दल क्षमस्वः.

   पण तु काय..किंवा अजुन कोणी हा विचार सुध्दा मनात आणु नका.. तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया मी वाचतो.. एकदा नव्हे तर दोन-दोनदा… जरुर प्रतिक्रिया देत रहा.. धन्यवाद…

 3. मित्रा तू एखादी भन्नाट भयकथा पण जरूर लिही मी आवडीने वाचेन
  दिनू.,

 4. मित्रा अवनी कथा आधीच वाचली आहे खूप छान आहे आणि भयानक पण मला पण कथा पोस्ट करायची आहे कुठे करू मदत कर

 5. माझी भयकथा रानवाड्याची अंधारी रात्र *
  सदानंद काकांची बदली वारकांठ गावी झाली होती.तसे माझे काका फाँरेस्ट मध्ये कामाला होते .म्हणूनच या खेडेगावात दूरवर त्यांची ईच्छा नसूनही त्यांना यावे लागले .जंगलतोड वाढल्यामुळे त्यांना जंगलातील च एका जून्या वाड्यात राहायची सोय करण्यात आली होती काकांची पत्नी निरजा काकू पण काकांच्या सोबत होत्याच सकाळीच काका काकूने दोघांचे सामान जीपमध्ये भरले व दोघेही आम्हा सर्वांचा निरोप घेऊन वारकांठ गावी निघाले,जाण्याअगोदर निरजा काकूने मला पण म्हटले की दिनू तू पण चलं माझ्या सोबतीला तूला सूट्या लागल्या तर आहेतचं पण मी दोन तिन दिवसांनी येतो असे मी तिला आश्वासन दिले तेव्हा ति गेली.
  इकडे काका व काकू दूपारपर्यंत वारकांठ गावी जाऊन पोहोचले .असे फोन करून त्यांनी आम्हाला कळविले काकाने गावातील लोकांना विचारून तो वाडा कुठे आहे याची माहीती घेतली व कच्च्या रस्त्याने त्यांची जीप वाड्याच्या जवळ येउन थांबली.समोरील भलामोठा वाडा पाहून काकूला कसेसेच झाले पण तिने आपल्या मनातील काकांना काहिच सांगितले नाही.जीप कंपाऊंड मधून आत येताच दोघेही खाली उतरले सोबत आणलेले साहित्य वाड्याच्या पायरिवर आणून ठेवले आजूबाजूला घनदाट झाडांची रांग होती .वाड्याचा दरवाजा बघितला तर त्याला कूलूप लावले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे
  क्रमशः लिहू कि नको मित्रा तृच सांग
  दिनू

  1. जरुर लिही मित्रा.. स्वतःचा एक ब्लॉग तयार कर वर्डप्रेस किंवा ब्लॉगस्पॉट वर

 6. रानवाड्याची अंधारी रात्र ** आता पूढे.. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या कूलपालाच चावी होती.दोघेही वाड्याच्या पाय~या चढून ओट्यावर आले ,बाजूलाच जुन्या काळातला पाळणा हवेच्या झूळक्याने हलत होता . काकांनी कुलूप उघडण्यासाठी हात पूढे केला क्षणभर कुलूप हलल्याचे त्यांना जाणवले पण आपल्याला भास झाला असावा म्हणून काका गालातच मिस्किलपणे हसले कूलूप उघ- डून सदानंद काकांनी दरवाजा
  लोटला दरवाजा उघडतांना करकर असा भयंकर आवाज झाला. अचानक वाड्याच्या आतून थंडगार हवेचा झोत आला .त्याचबरोबर कूबट वास पण होता निरजा काकू

  1. अरे मित्रा.. इथे नको कथा लिहीत बसुस.. तुझा स्वतःचा ब्लॉग सुरु कर म्हणजे अधीक लोकांपर्यंत तुझं लिखाण पोहोचेल..

 7. मित्रा मी ब्लाँग कसा बनवू काही तरी मदत कर कसा बनवावा वैगेरे हे लिहून पाठव माझ्या मी लिहीलेल्या अनेक कथा आहेत पण ब्लाँग बनविता येत नसल्यामळे अडचण येते.help me

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s