डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

प्रवास स्थुल बांधा ते मध्यम बांधा

12 Comments


आधी

आधी

नंतर

नंतर

देवाशप्पथ सांगतो हे फोटो दोन वेगळ्या व्यक्तींचे नसुन दोन्ही माझेच आहेत. फरक एवढाच आहे की एक ६ महीने ‘आधीचा’ आहे आणि एक ‘नंतरचा’.

लग्न झाल्यावर माणसं आणि बायका ही फुगतात हे ऐकुन होतो, पण माझ्या बाबतीत हे जरा जास्तीच झाले. लग्नानंतर इतका फुगलो, इतका फुगलो की विचारायची सोय नव्हती. माझ्या वाढत्या वजनाच्या बाबतीत मी सोडुन सगळेच ‘कर्न्सन्ड’ होते. पण आधी आडुन आडुन बोलणारे जेंव्हा उघड-उघडच बोलायला सुरुवात केली तेंव्हा मात्र माझ्या आरश्यानेही हात टेकले आणी तो सुध्दा ‘होय.. तु जाड झाला आहेस’ म्हणु लागला. त्यातच वयाच्या फक्त ३० व्या वर्षीच ब्लड-प्रेशर मागे लागले आणि मग मात्र मी खडबडुन जागा झालो. ठरवलं पेपर मध्ये जे आपण फोटो बघतो ‘आधीचा’ आणि ‘नंतरचा’ ते आपल्याही बाबतीत खरं करुन दाखवायचंच.

वजन कमी करण्यासाठी कोणतेही ‘जीम’ लावले नाही. आधीही कध्धीच लावले नव्हते आणि यापुढेही लावणार नाही. त्यासाठी मी केले:

 • सकाळी भल्या पहाटे ४५ मिनीटे पळणे आणि भराभर चालणे. पहीले काही दिवस खुपच कठीण गेले. अंथरूणातुन उठवायचे नाही. ४-४ गजर बंद करुन झोपायचो. पण हळु-हळु सवय होत गेली.
 • पळुन आल्यावर जरा विश्रांती घेउन, घरातील व्यायामाची सायकल चालवणे. चालवण्याचा वेग ताशी ३५ कि.मी. कॅलरी काऊंट ३०० जोपर्यंत होत नाही तो पर्यंत. वेळ साधारणपणे ३० मिनीटं.
 • ऑफिसचा चौथा मजला दररोज लिफ्ट शिवाय चढणे आणि उतरणे.
 • वरील प्रकारांनी वजन ४ महीन्यात खुप आटोक्यात आले पण कमी होण्यासाठी अजुअनही वाव होता. मग दुपारचे जेवण बंद करुन सॅलड्स चालु केले. रोज घरुन डब्यात मिळतील त्या उकडलेल्या भाज्या, काकड्या, गाजर, मुळा, लसुण, कोबी/पालकाची पानं, मश्रुम्स, फ्लॉवर, कच्या उसळी, फळ (डाळींब, मोसंब, चिक्कु, पपई पैकी काहीही) यांचे एकत्रीत मिश्रण चालु केले. पहिल्या पहिल्यांदा खुप भुक लागायची. पण आठवड्यात याची पण सवय झाली

मग मात्र वजन नियंत्रणात आले. पुर्वी न बसणारे कपडे व्यवस्थीत बसु लागले, तर नविन कपडे प्रचंड सैल. अक्षरशः मला बरीचशी नविन खरेदी करावी लागली. माझ्या वाढत्या वजनाचा इश्यु बनवणारे अनेक जण मग मात्र ‘वजन ड्रास्टिकली कमी करायला काय केलेस रे बाबा?’ म्हणुन सल्ला घेउ लागले तेव्हाचा आनंद काय वर्णावा.

वजन नियंत्रणात रहाण्यासाठी आता सायकलींग चालु आहे. घर-ते-ऑफीस-ते-घर यासाठी सायकलच वापरतो. (सध्या २-३ आठवडे अती-तप्त उन्हामुळे बंद आहे)

गरज असते एखाद्या मोटीव्हेशनची. कुठेतरी ऐकले होते. ‘Be a Motivating rather than मोटी (मोटा) वेटींग’

Advertisements

12 thoughts on “प्रवास स्थुल बांधा ते मध्यम बांधा

 1. Very very motivating again…. Tumachya ekek success stories mhanje ekek ‘case-study’ ahet 🙂 🙂
  BTW, u didnt reply my question on ‘visual scrap’ !!!!

 2. अनिकेत
  तुमच्या पोस्टवरुन आता मी मोटीव्हेट होतोय.. माझं वजन सध्या ९७ किलो झालंय..कंबरेचा व्यास आधी ३४ मग ३६ आणि आता ३८ ची पॅंट पण घट्टं होते आहे . म्हणजे आता व्यायाम सुरु करायलाच हवा! हल्ली ऑफिस ला पण कारने जाणं बंद केलंय. मुद्दाम लोकलने जातो, तेवढाच जिने उतरण्या- चढण्याचा व्यायाम.. तरिही कांहीच फरक पडलेला नाही.. एक महिन्या नंतर!
  आज मी अहमदाबादला आहे. उद्या पासुन सुरु करतो सकाळ संध्याकाळ चालणं..
  बाय द वे अभिनंदन…

  • ब्रेव्हो. चला माझा हा पोस्ट टाकण्यामागचा उद्देश साध्य झाला. सकाळी फिरायला जायचे म्हणजे खरं सांगायचं तर त्या एक मिनीटावर मात करण महत्वाचे असते. त्यावेळेला आपण म्हणलं जरा वेळ पडु अजुन की झालं. पण त्याच वेळेला फक्त उथुन बसले की काम फत्ते.

   माझे सकाळच्या फिरण्यात बरेच मित्र / मैत्रीणी जमले आहेत. बहुतेक सगळेच निवृत्त, ६० च्या पुढचेच आहेत. 🙂 सगळे आजोबा कॅटेगरीतले आहेत. पण मजा येते दोन मिनीट थांबुन हाय हॅलो करताना.

   बाकी तुम्हाला मॉर्नींग वॉक साठी शुभेच्छा.

 3. अभिनंदन!

 4. ८-९ महिन्यानंतर तुला पाहिल्यावर माझी जी प्रतिक्रया होती, ती आठवली.
  आम्ही आपले रस्त्यात कुठे आपला “टुणटुणीत” अनिकेत दिसतोय का म्हणुन बघत होतो, तर चक्क “एकदम नॉर्मल प्रकृती + हसरा” अनिकेत पाहिला होता…
  “का रे? केवढा बारीक झालायेस?”- हा प्रश्न सोडून काहीच आलं नव्हतं डोक्यात.

  Keep it up Boss… It’s really commendable to maintain weight without any professional help.

  • हा हा हा.. तुम्ही चक्क मला दुर्लक्षीत करुन दुसरीकडे गेला होतात. मज्जा आली होती. अमेरीका ट्रीप मधील अनेक मजेदार घटनांपैकी ही पण एक.

 5. sahich ki!! jabri inspiring ahe he!

 6. खरंच इंस्पायरिंग आहे. मला हे सांगा की गोड किती प्रमाणात बंद केले होते? विशेषतः आता आंबे आणि आईस्क्रीम्स न खाणे ही फारच मोठी शिक्षा वाटते.
  आणि दूध?
  आणि सकाळी सॅलडस फक्त खाल्ल्यावर रात्री खूप भूक लागते त्याचे काय?

  • गोड अज्जीबात नाही बंद केले. मी प्रचंड गोड खाणारा आहे. त्यामुळे ते अशक्यच. सकाळी ब्रेकफास्ट ज्यामध्ये बहुतेक वेळा मी केलॉग्स+दुध घेतो. दुपारी जेवायच्या एक तासभर आधी कॉफी. मग जेवणा ऐवजी भरपुर सॅलेड.
   संध्याकाळी नाष्टा, चहा,बिक्सीट आणि रात्री भात. मला माहीत आहे की रात्री भात खाउ नये जाडी वाढते पण माझा नाईलाज आहे भात खाल्याशिवाय मला झोपच येत नाही.
   सो तसे पाहीले तर मी खाण्यावर फार कंट्रोल नाही केला पण रेग्युलर व्यायाम मात्र चालु ठेवला. तसेही मी कधी कुणाकडुन ऐकले नाही की खाणे कमी करुन कोणी बारीक झाल्याचे.

 7. अनिकेत…जाहि्रातीत ज्या माणसांन आपण पाहातो…त्यांच अतापता नस्तो. पण तू सप्रमाण सिध्द केलंस हे कौतुकास्पद आहे. तुझं अभिनंदन…आणि न होणा-या पॅंट व्हायला लागतात तो आनंद गगनात मावत नाही…मी अनुभवलाय तो….
  पण

  आता लोकांचे अभिनंदनाचे पोस्ट वाचून relax अजिबात होऊ नकोस…स्तुति ऎकली की अंगावर “मांस” चढल्यासारखं वाटतं!! – मिलिंद

 8. well done very much inspiring i ll try for me and my husband to maintain our weight

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s