शुक्रवार माझ्या नावडीचा


काय म्हणता..तुम्हाला शुक्रवार आवडतो?.. आणि तुम्हाला..?? तुम्हालाही.. हम्म.. का नाही विकेंड असतो ना!!. माझ्या नशीबी मात्र शुक्रवार रुपी दुखःच वाट्याला आलं आहे.

सांगतो… निट सांगतो. सध्या ज्या प्रोजेक्ट वर मी काम करतो आहे ते ‘विकली रिलीज’ या तत्वावर काम करणारं आहे. म्हणजे ‘डेव्हलपर्स’ आठवडाभर गुगल वर सर्च मारुन, इकडुन तिकडुन ढापुन, स्वतःचे अशक्य कोटीतले लॉजीक वापरुन काहीतरी फिचर्स तयार करणार आणि मी ‘Being a QA’ शुक्रवारी ते सगळे टेस्ट करणार.. म्हणजे जे काही बनवले आहे ते सगळे बरोबर आहे ना?, निट चालते आहे ना? त्यात काही बग्ज तर नाहीत ना? याची पडताळणी करणार. तसेच आठवडाभर जे काही बग्ज टाकले असतील त्याची फेरतपासणी करणार आणि शुक्रवार संपता संपता याचा ऍश्युअरंन्स देणार की सगळे काही ठिक-ठाक आहे, जाउ देत मार्केट मध्ये!!

तर हे सगळे करायचे म्हणजे आधीच एक तर टेन्शन चे काम, त्यात शेवटच्या क्षणी केलेल्या बदलांमुळे परत सगळे तपासत बसावे लागते. हे एक दिवसाचे टेस्टींग जीव घेते माझा. वेळेत संपवता संपवता नाकी नऊ येतात.

आमच्या कंपनीत बहुतेक शुक्रवार ‘सेलेब्रेशन’ चे असतात. काहीतरी पार्टीज, नाहीतर मजेदार गेम्स, नाहीतर कसले कसले ‘डेज’ सारखं चालु असते. जनता शुक्रवार मुड मध्येच. उशीरा येणे, लवकर जाणे, दिवसभरातील बहुतेक वेळ पॅन्ट्रीमध्ये. अशक्य प्रकार चालतात. आणि मी?? बसलेला असतो..’खाड-खुड’ करत.

सारखं आपलं कुणीतरी डेस्क पाशी येउन..”अन्या चल ना कॉफी. अन्या चल ना आईस-क्रिम खाउ.. अन्या.. पिझ्झा… भेळ”.. मी आपला.. ‘नको रे.. जा तुम्ही.. रिलीज आहे आज माझे!!!’

माझ्या आनंदाला लागलेले हे शुक्रवारचे ग्रहण कधी सुटणार आहे कुणास ठाउक 😦

Advertisements

4 thoughts on “शुक्रवार माझ्या नावडीचा

  1. Hmmmm…. खरे आहे… कोणे एके काळी म्हणजे आयटीत यायच्या आधी मी एका इंजीनियरिंग कंपनीत QAC चे काम बघायचो तेंव्हा मलाही हाच अनुभव यायचा…. बाकि सगळे जण आपले काम कसेनसे पूर्ण करून ढकलायचे & मी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बारकाईने चेक करत बसायचो कारण माझ्या ओके नंतर जॉब बाहेर कस्टमर कड़े जाणार असायचा….. फार वाईट फीलिंग येते तेंव्हा 😦 😦

    1. डेव्ह, क्युए कितीही भांडण असली तरी शेवट तुझ्याबरोबर जमेना तुझ्यावाचुन करमेना हेच खरं. डेव्ह नसेल तर क्युए चा काय उपयोग आणि क्युए नसेल तर…..
      जाउदेत हे शितयुद्ध जगाच्या किंवा निदान आय.टी. च्या शेवटापर्यंत चालणार. अर्थात आय.टी.चा शेवट येउ नये हीच इच्छा 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s