नरकासुराचा वध


नरकासुराचा वध- कथकल्ली
नरकासुराचा वध- कथकल्ली

केरळ ला गेलो होतो तेंव्हा ‘थेक्कडी’ या एका निसर्गरम्या गावी ‘मुद्रा डेली कथकल्ली सेंटर’ मध्ये कथकल्लीचा हा “नरकासुराचा वध’ ‘शो’ बघीतला होता. रोमांचक, अवाक्क करणारा, आपसुकच टाळ्या वाजवायला भाग पाडणारा हो शो पुर्ण ‘पैसा वसुल’ होता.

शो ची सुरुवात होते मेक-अप पासुन. त्यात काम करणारी पात्र तुमच्या समोर येउन बसतात. त्यांचा तो पुर्ण मेक-अप आपल्या समोरच केला जातो. त्यानंतर होस्ट थोडक्यात आपल्याला कथकल्ली बद्दल, पात्रांबद्दल, चेहऱ्यावरील हावभाव त्याचे अर्थ, सादर होणारी गोष्ट याबद्दल माहीती देतो आणि सुरु होतो १ तासाचा खुर्चीला खिळवुन ठेवणारा प्रवास. या नाटकामध्ये कोणीही कुणाशीही बोलत नाही सर्व सादरीकरण हे चेहऱ्यावरील हावभाव आणि हातांच्या खुणा यांचा प्रभावी वापर करुन केले जाते. नरकासुराच्या वधाची सादर केलेली गोष्ट थोडक्यात अशी:

भुमी देवीला ‘नरका’ नावाचा सैतानी प्रवृत्तीचा पुत्र असतो. ‘नरका’ ला तिन्ही ‘लोका’तील लोकांना त्रास देण्यात खुप मज्जा यायची. त्याच्या त्रासाला आणि विध्वंसाला देव आणि मानव कंटाळलेले असतात. एकदा नरकासुराला असे कळते की देवांचा राजा इंद्राकडे हजारो हत्ती आहेत. नरकासुराला लोभ सुटतो आणि तो स्वर्गावर हल्ला करतो. नरकासुर स्वर्गामध्ये हल्लकल्लोळ माजवतो. देवामध्ये भितीचे वातावरण पसरते आणि सगळे जण सैरावैरा पळायला लागता. नरकासुर त्यांच्या मागे लागतो. त्याचवेळेस त्याला काहीतरी चमकणारी तेजस्वी वस्तु नजरेस पडते. ती वस्तु देवांची माता ‘अदीती’ च्या कानातले रिंग्स असतात. नरकासुर देवी अदितीकडुन त्या रिंग्स हिसकावुन घेतो.

असहाय्य आणि बदला घेण्यासाठी अतुर असलेला इंद्र शेवटी कृष्णाकडे धाव घेतो. कृष्ण तेंव्हा आपली पत्नी सत्यभामा बरोबर असतो. इंद्राच्या विनंतीला मान देउन कृष्ण नरकासुराचा वध करायला तयार होतो. पण त्याच वेळी कृष्ण आपल्याला सोडुन जाणार म्हणुन त्याची पत्नी सत्यभामा नाराज होते. शेवटी कृष्ण सत्यभामालाही आपल्याबरोबर घेउन जायचे ठरवतो.

नरकासुर त्याच्या जादुच्या नगरीत लपुन बसलेला असतो. चारही बाजुंनी महाकाय पर्वत कृष्णाचा रस्ता आडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कृष्णा आपल्या सर्व शक्तींनी ते पर्वत उडवुन लावतो. त्याच्यावर अनेक शस्त्रांचा हल्ला होतो पण ते ही कृष्णा परतवुन लावतो. नरकाच्या गुहेवर ‘मुरा’ नावाच्या एका पाच तोंडी राक्षसाची गस्त असते त्याच्याशी परत कृष्णाचे युद्ध होते. शेवटी आपल्या चक्राने कृष्णा मुराचा वध करतो.

नंतर त्याचे नरकासुराशी युद्ध होते आणि शेवटी कृष्ण त्याचाही वध करतो.

अतीशय सुंदर अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव आणि मोजक्याच वाद्यांचे पण प्रभावी संगीत ह्या ‘शो’ ला अविस्मरणीय बनवतात. तुम्हाला या पात्रांबरोबर फोटो सुद्धा काढता येतात. पर व्यक्ती साधारण २५० रु. इतके तिकीट यासाठी आहे. कधी थेक्कडी, केरळला गेलात तर जरुर बघावीत अश्या अनेक ठिकाणांपैकी एक.

या पुर्ण ‘शो’ चे चित्रीकरण इथे बघायला मिळेल. यामध्ये पहीला मेक-अप भाग नाही आह परंतु हावभाव, संगीत आणी त्याचे अर्थ इथपासुन ते पुर्ण शो चे चित्रीकरण आहे. त्यामधील स्त्री पात्र हे सुद्धा एक पुरूषच आहे. त्याचे हावभाव लोभनीयच.

अर्थात हा शो ‘याची देही याची डोळी’ बघण्यातली मजा काही औरच.

Advertisements

One thought on “नरकासुराचा वध”

  1. अरे वा भुंग्या मी सुद्धा गेलो होतो. माझ्याकडे आहेत मेकप करतानाचे फोटो.छान होता अनुभव.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s