डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

उंचच उंच मानेच्या स्त्रिया

3 Comments


उंचच उंच मानेच्या स्त्रिया

उंचच उंच मानेच्या स्त्रिया

बर्मा मध्ये ‘कयान’ नावाची लोकांची एक जात आहे. लष्कराच्या त्रासाला कंटाळुन पुढे यातील काही लोक थायलंड मध्ये निघुन गेले. या जमातीमधील स्रिया त्यांच्या उंच मानेसाठी प्रसिद्ध आहेत. वयाच्या पाचव्याच वर्षी मुलींच्या गळ्यात पहीली रींग अडकवली जाते. त्यानंतर जसजशी मुलगी मोठी होत जाते तस-तसे एक-एक रिंग गळ्यामध्ये अडकवल्या जातात. या किंमती रिंग्स जसे घराण्याची श्रीमंती दिसुन येते तसेच जितक्या जास्ती रिंग्स तीतकी ती स्त्रि वयस्कर आणि मानास पात्र ठरते. पुर्ण वाढलेली मान साधारणपणे १०” ते १५” इतकी लांब असते तर त्याचे वजन साधारणपणे ३-५ कि.ग्रॅ. इतके असते. यामुळेच की या या बायकांना चहा पाणि पिण्यासाठी स्ट्रॉ वापराव्या लागतात कारण मान वाकवुन पिणे हे केवळ अशक्यच.

या रिंग्स घालण्यामागे अनेक कारण आहेत. जसे वाघापासुन संरक्षण. या पितळ्याच्या रिंग्स मुळे वाघ त्यांच्या मानेचा चावा घेउ शकत नाही. दुसरे कारण म्हणजे या रिंग्स वापरल्यामुळे स्त्रियांचा आकर्षकपणा कमी होतो ज्यामुळे काय होते हे सांगायची आवशक्यताच नाही.

या जमातीबद्दल पहीले मी कधीच काहीच ऐकले नव्हते. काही दिवसांपुर्वी ‘नॅशनल जिओग्राफिक’ वर याबद्दक एक डॉक्युमेंटरी पाहीली आणि त्यानंतर उत्सुकतेपोटी इंटरनेट वर अधीक माहीती शोधायला बसलो तेंव्हा या बाबतीत ज्ञानाचे आणी माहीतीचे एक मोठे भांडारच सापडले. वाचु तितकी कमी माहिती इंटरनेटवर आणि काही व्हिडिओस यु-ट्युब वर उपलब्ध आहेत.

Advertisements

3 thoughts on “उंचच उंच मानेच्या स्त्रिया

  1. Aikave te navalach !

  2. ya videios copy karu shakto ka? jar ho asel tar kase te sang na plz

    • हे व्हिडीओ यु-ट्युब वर आहेत. ते डाउनलोड करण्यासाठी काही सॉफ्टवेअर लागतात. ’यु-ट्युबवरील व्हिडीओ’ डाउनलोड करणारे सॉफ्टवेअर आपल्याला गुगलवर शोधुन मिळेल, ते वापरुन आपण हे व्हिडीओ डाउनलोड करु शकता.

      धन्यवाद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s