सात दिवस चार नोकऱ्या


ही गोष्ट ६ वर्षापुर्वीची जेंव्हा मी नुकतीच करीयरला सुरुवात केली होती. ‘तो’ आठवडा मला अजुनही लक्षात आहे जेंव्हा मी फक्त ७ दिवसात चक्क ४ नोकऱ्या बदलल्या होत्या. तो किस्सा इथे नमुद करत आहे, कंपन्यांची नावे तेवढी मी लिहीत नाही आहे बर का!!

दिवस १- सोमवार: शुक्रवारी पहिल्या कंपनीत राजीनामा देउन कल्याणीनगर मधील एका मोठ्या कंपनीत रुजु झालो. कामाचा पहिलाच दिवस होता. ‘वर्क क्युबीकल’ आजुबाजुचे वातावरण का कुणास ठाउक म्हणावे तसे पटले नाही. टिम मधील लोक फारच माजुर्डी होती. जॉईन होऊन काही तासच झाले असतील की हातात एक ४ पानी ‘वर्क कल्चर’ बद्दल मोठ्ठे पत्र पडले. त्यातील नियम फारच जाचक वाटले. म्हणजे उ.दा:
१. एक कागदाचे जरी प्रिंट काढायचे असेल तरी नेटवर्क ऍडमीन ची परवानगी आवश्यक
२. लवकर घरी जायचे असल्यास सर्व टिम ची संमती आवश्यक. आवश्यकता भासल्यास तुमचे काम संपवुन परत कामावर यावे लागेल
३. संगणकावर कोणताही ‘पर्सनल डेटा’ ठेवण्यास मनाई
४. कामवर असताना सेल-फोन शक्यतो बंदच ठेवावेत. अगदीच गरज असेल तर सायलंट मोड वापरावा
५. कामाव्यतीरीक्तच्या कोणत्याही इंटरनेट साईट्स बंद वगैरे वगैरे

काही वेळातच पहीली मिटींग ऍटेंड केली. ज्यामध्ये आपण प्रोजेक्ट मध्ये कसे मागे पडलो आहोत आणि त्यामुळे पुढचे काही महीने रोज आपल्याला कमीत कमी रात्री १०.३० पर्यंत थांबावे लागु शकेल ते सांगण्यात आले. टिम मध्ये कोणीच कुणाशी बोलत नव्हते. कसा बसा वेळ काढला, ६.३० वाजले आणि शेवटि हुश्श करुन मी बाहेर पडलो.

गाडी काढत असतानाच क्यु.ए. मॅनेजर भेटला त्याच्याशी झालेला संवाद असा:
‘हॅलो मि.अनिकेत, सो हाउ वॉज युअर फर्स्ट डे?’
‘इट वॉज गुड’
‘सो यु आर लिव्हींग नाऊ? इट्स जस्ट ६.३०’
‘!!???’
‘एनीवेज, इट्स युअर फर्स्ट डे, सो फाईन, आदरवाइज, धिस टाइम इज ऍज गुड ऍज अ हाल्फ़ डे’
‘!!!!#$%#%#%’

दिवस २: मंगळवार: अतीशय जड पावलांनी कामावर गेलो. नविन प्रोजेक्ट्बद्दलची ढिग-भर मेल्स आणि माहीतीची डॉक्युमेंटस येउन पडली होती. ३-४ तास घालवुनही मला त्यातील काहीच कळत नव्हते. टिम-मेंबर्स पैकी कुणालाच सांगायला आणि बोलायला वेळ नव्हता. जेवायलाही एकटाच बसलो होतो. जाम वैतागलो होतो तेवढ्यात मोबाइल वाजला. मी ज्या कॉलेज मधुन संगणकी शिक्षण पुर्ण केले होते तेथीलच फोन होता. तेथील एका उच्च गृहस्थाने मला सांगीतले की त्या संस्थेत ‘नेटवर्क ऍडमीन’ ची जागा रिकामी आहे. माझ्या एच.ओ.डी. ने माझे नाव सुचवले होते. तसेच तिनही वर्ष कॉलेज टॉप केल्यामुळे आणि युनिर्व्हसीटीमध्येही पाचवा नंबर असल्याने सगळ्यांची संमती मिळाली. त्यामुळे ती नोकरी मला ऑफर करण्यात आली होती. मी क्षणाचाही विलंब न करता ती नोकरी स्विकारली. त्यांनी लगेच मला उद्यापासुन कामावर रुजु व्हायला सांगीतले.

आता या कामावरचा मुड गेला होता. लगेच एक मेल टाकली की ‘पासपोर्ट व्हेरीफिकेशन साठी पोलीस चौकीतुन बोलावणे आले आहे, त्यामुळे लवकर जात आहे.’ कुणाच्याही परवानगीची वाट न बघता तडक बाहेर पडलो आणि घरी आलो.

संध्याकाळी एच.आर. ला एक मेल लिहीली: ‘कोर्टाच्या काही कामासाठी मला माझ्या गावी जावे लागणार आहे. ही केस साधारण एक महीना चालेल. मला माहीती आहे की मी नुकताच रुजु झालो असल्याने इतकी रजा मला मिळणार नाही, तसेच माझ्यामुळे प्रोजेक्ट ही डीले होऊ नये असे मला वाटते, म्हणुन माझा हा राजीनामा. मी उद्यापासुन कामावर येउ शकत नाही.’

दिवस ३- बुधवार: त्यांच्याकडुन काहीच मेल नव्हती. सो गुड फॉर मी. चला नोकरी क्रमांक दोन सुरु. नेटवर्क ऍडमीन मीच असल्याने सगळ्याचा कंट्रोल माझ्याकडे होता. मी म्हणीन ती पुर्व दिशा. पहिला अर्धा दिवस तर फारच छान गेला. मी खुपच खुश होतो, पण माशी शिंकलीच. पगार खुप म्हणजे खुपच कमी ऑफर झाला आणि मग मी ही सॉफ्टवेअर कंपनी नसुन एक एज्युकेशनल संस्था आहे हे समजुन चुकलो. म्हणेज भविष्यातील पगारवाढ काय असणार आणि काय भविष्य असणार ह्याची खाडकन जाणीव झाली. मी स्वतःला २-४ वर्ष पुढे एका ‘सर’ च्या वेषात पाहु लागलो.. नाही नाही.. हे शक्य नाही.. काहीतरी केलेच पाहीजे.. पण काय?
सुचले, लगेच पहिल्या एम्प्लॉयर ला मेल लिहीली. खरं तर तो मला सोडायलाच तयार नव्हता पण मग मीच त्याला कारण सांगीतले होते की माझी बायको जॅपनीज ट्रांन्स्लेशन मध्ये आहे ना.. तर तिला जपान मधुन एक चांगली ऑफर आली आहे म्हणुन मी पण रिलोकेट होत आहे.
तर त्याला मेल टाकली की ‘इट डिडंन्ट वर्क आऊट, सो आय एम नॉट शिफ्टींग ऍन्ड करंटली लुकींग फॉर जॉब’

मोजुन १० मिनीटात त्याचा रिप्लाय आला, ‘वुई विल बी व्हेरी हॅप्पी टु हॅव यु बॅक. प्लिज जॉइन बॅक फ्रॉम टुमारो’ मग काय विचारता लगेच ऍक्सेप्ट केले. आता प्रश्न होता, ह्या जॉबचा. तेथीलच एका कलीग ला सांगीतले की ‘प्रिव्हियस एम्प्लॉयरने’ चांगली ऑफर दिली आहे सो मी तिकडे जात आहे, उद्यापासुन कामावर येणार नाही. आणि घरी निघुन गेलो.

रात्री कॉलेजच्या एच.ओ.डी. चा फोन, ‘विश्वासघातकी, मला खोट्यात पाडले, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तु असे केलेस.. आता कुठे तोंड दाखवु. त्यांनी तुझ्याभरवश्यावर बाकीचे आलेले रेझ्युमे रिजेक्ट केले होते.. आता त्यांनी काय करायचे वगैरे.’
मग दुसरा फोन, कॉलेजच्या रजिस्टारचा, पहिल्यांदा गोड बोलुन समजावुन बघीतले, पण नाहीच ऐकत म्हणल्यावर धमक्याच द्यायला लागला, ‘माझी खुप ओळख आहे, बघतोच तुला कोण नोकरी देतो, असे आणि तसे….’

दिवस ४ – गुरुवार: पहिल्याच कामावर परत रुजु झालो. यावेळेस त्यांनी न मागता मला भरमसाठ पगारवाढ पण दिली आणि एका मोठ्या कंपनीत ऑनसाईट पाठवले. त्या मोठ्या कंपनीत मी खुपच बुजुन गेलो. फारच मोठ्ठा गोंधळ होता तो. हजारो कागदपत्र, सेक्युरीटी चेक, मेडीकल हे आणि ते.. त्यानंतरची घटना मला एवढ्या न मागता दिलेल्या पगारवाढीचे कारण स्पष्ट करणारी होती.

मला असे सांगण्यात आले की ऑफीसची वेळ पक्की नाही. सोमवार/मंगळवार दुपारी २ ते रात्री ११. बुधवारी सकाळी ५ वाजता एक मिटींग असेल क्लायंटबरोबर. ती करुन परत घरी जाउ शकता आणि मग संध्याकाळी ६ ते रात्री ४. गुरुवार,शुक्रवार वेळ नेहमीप्रमाणे ९.३०-६.३० मी आवाकच झालो. कसे शक्य आहे असल्या भयानक वेळा पाळुन काम करणे. सोशल लाईफ काही आहे की नाही. आणि परत हे टाईमींग बदलु शकते थोडक्यात काय तर त्यांचा फोन आला की कामावर जायचे. हा महिना होता ऑक्टोबर आणि माझे डिसेंबर मध्ये लग्न होते. एकुण परीस्थीती बघुन मी लगेच रजेचा अर्ज टाकला जो नामंजुर करण्यात आला. म्हणे लग्नासाठी एक दिवस रजा मिळेल, बाकीची नंतर घ्या. झालं, म्हणजे अजुन एक नोकरी शोधण आलं.

दिवस ५ – शुक्रवार:काही म्हणा पण नशीब माझे बलवत्तर होते. सकाळीच एका जुन्या क्लायंटचा फोन आला, त्याने मला त्याच्या इथे असणाऱ्या रिकाम्या जागे बद्दल माहीती दिली. मागे मी केलेले काम त्याला खुप आवडले होते आणि मी तिथे जॉइन करावं अशी त्याची इच्छा होती. खरं सांगायचं तर मलाही ती कंपनी, तिथले कल्चर, तिथले लोक फारच आवडले होते. सो मी खुप खुश झालो, लगेच त्याच्या ऑफीसमध्ये धाव घेतली. जुजबी बोलणे झाले आणि काहीही मुलाखत न घेता त्याने लगेच मला ऑफर लेटर दिलेही.

इकडे हा क्लायंट मी अजुन ऑफिसला का नाही आलो म्हणुन चिंतीत होता, त्याचा लगेच फोन आलाच.
मी म्हणलं, ‘तब्येत थोडी बरी नाहीये, उशीरा येइन’
‘का? काय झालं तब्येतीला?’
‘थोडा ताप आहे’
‘अरे तापच आहे ना? मग त्यात काय एवढं एक गोळी घेतली की झालं. हे असे चालणार नाही. आणि आपल्या इथे डॉक्टर असतात, ते तपासुन औषध देतील, या लवकर कामावर’

जिथे असली फडतुस वागणुक मिळत असेल तिथे कोण काम करणार नाही का? मग मी सरळच त्याला सांगीतले की मी येउ शकत नाही, गुड बाय! त्याने लगेच माझ्या एम्प्लॉयरला फोन केला असावा. त्याचा मला फोन. खुप शिव्या घातल्या त्याने. पहिल्यांदा मी घेतले ऐकुन पण शेवटी माझी चुक नव्हती. त्यानेच जर आधी मला स्पस्ष्ट सांगीतले असते असे रात्री अपरात्रीचे जावे लागेल, लग्नाला सुट्टी मिळणार नाही, तर मी पोझीशन ऍक्सेप्टच नसती केली ना! मग सरळ फोनवरुनच तुमची नोकरी सोडतोय, राजीनामा पाठवुन देईन सांगुन फोन बंद करुन टाकला.

दिवस ६ – शनीवार:सकाळीच त्याच क्लायंटचा फोन, सुट्टीचे आपण बघु, तु काम सुरु कर, वेळ सध्यातरी अशीच ठेवु. मी सांगीतले मी नाही येउ शकत आणि मी नोकरीपण सोडली आहे.

मग क्लायंटकडुन एका एच.आर.चा फोन. त्यांनी मला त्यांच्याच कंपनीत नोकरी ऑफर केली झालं असं होतं की माझ्या पहील्या दिवशी माझा लॉगीन आय.डी. तयार झाला होता. माझी माहीती त्या प्रोजेक्टच्या अमेरीकेतील क्लायंटला पाठवलेली होती. आता जर का मी काम सोडले तर त्यांना दुसरे कुणालातरी घ्यावे लागले असते तसेच ते क्लायंटला ही कळवावे लागले असते. पहिल्याच दिवसांपासुन लोक नोकरी सोडत आहेत म्हणल्यावर परत ‘बॅड-इंप्रेशन’ मग कदाचीत त्यांचा प्रोजेक्ट गेला पण असताना म्हणुन सगळे मस्का मलई. मला त्या दिवशी विवीध लोकांचे ७-८ फोन आले.

कोणी मला ‘शुन्य टक्के कार लोन’ देउ करत होते तर कोण घर-लोन. कोणी मला ‘ऍब्रोड व्हिजीट’ देउ केली, तर कोणी ‘पगारवाढ आणि चांगले डेसीग्नेशन देउन त्यांच्याच कंपनीत ऑफर’ एकीने तर कहरच केला. रात्री २ वाजता फोन करुन मला बरेच काही काही समजावले, ऐकवले, ऑफर केले, आणि शेवटचे वाक्य, ‘मग मी उद्या फोन करते, मला तुझा डीसीजन सांग, ऍन्ड बाय द वे, आय डोन्ट लाईक टु हियर नो’

दिवस ७ – रविवार:खुप टेंप्टींग होतं सगळ. माझा निर्णय पक्का होता, हे सगळे मी धुडकावुन लावले. मला पैसे आणि सुख सुवीधांपेक्षा जॉब सॅटिफेक्शन महत्वाचे वाटते. म्हणुनच ५०% कमी पगाराची ऑफर मी स्विकारली, जी होती त्या आठवड्यातली नोकरी क्रमांक ४.

या घटनेला वर म्हणले तसे ६ वर्ष होऊन गेली. तेव्हा शेवटची जी कंपनी जॉईन केली, अजुनही मी तिथेच आहे आणि अत्यंत खुष आहे!!

Advertisements

10 thoughts on “सात दिवस चार नोकऱ्या”

  1. ए नाही बर का! मी जॉब हॉपर नाहीये, एकदाच झाले तेंव्हा आणि ते सुध्दा मी परिस्थीतीचा गुलाम होतो. आता बघ ना, त्यानंतर ६ वर्ष झाली मी अजुनही एकाच जागी खिळुन आहे आणि ते सुध्दा आनंदात 🙂

 1. अनिकेत
  सध्या काम करतोय ती माझी दुसरी कंपनी.
  गेली २५ वर्षं इथेच काम करतोय..
  तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, जॉब सॅटीसफॅक्शन महत्वाचं.
  मला पण बरेचदा हेड हंटर्सचे कॉल्स येतात.
  पण एक्झिस्टींग कंपनित जॉब सॅटीसफॅक्शन आहे म्हणुन जॉब चेंज केलेला नाही.
  पण एकदा कम्फर्ट लेव्हलं आहे ना इथे.. आणि ते वाक्य तुम्हाला माहिती असेलंच..
  ’इफ यु आर पॉवरफुल, डझ नॉट मिन दॅट यु कॅन मुव्ह एनी थिंग, बट इट मिन्स, नथिंग कॅन मुव्ह यु’
  🙂

 2. अनिकेत,
  नमस्कार
  आपली प्रतिक्रिया मिळाली. धन्यवाद. महाराष्ट्रातून धुळे व नंदुरबार येथून हे ग्रहण खग्रास स्वरुपात तर अन्य ठिकाणांहून खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे. २१ जुलैच्या सूर्यास्तापासून ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत.
  शेखर

 3. आयला आजच्या काळात ४ नोक-या मिळणे केवळ अशक्य आहे. एका नोकरीचेच वांदे झाले आहेत. माझा मित्र केव्हाचा शोधतो आहे. मार्केट रेझ्युमेनी भरुन वहात आहे.

  त्यामुळे असला युनिक अनुभव असणं खूपच विरळ आहे.

 4. very interesting…..
  My first job with reputed Indian MNC in pune lasted for 9 years, my second job with another MNC lasted for 9 months, i was sceptical about lasting of my third job ….. By God’s grace, I have completed 4 months…..
  But yes, what u say is correct. Job satisfaction is important. Especially in IT, u r constantly under scanner and subjected to tremendous pressure by own company, third party vendors & client. If u r not game for it, better switch and look for some steady but sound job 🙂 🙂 This is the ultimate remedy !!!

  1. मिळेल, लवकरच मिळेल, कालच बातम्यांमध्ये ऐकले की ‘Jobs are coming back, Keep your CV Updated”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s