मला चंद्र होऊन रहायचे आहे


काही दिवसांपुर्वी एका मित्राशी बोलत होतो. तो त्याच्या कार्यालयाबद्दल सांगत होता. त्यांच्या कार्यालयात म्हणे दर महिन्याला किंवा दर तिन महीन्यांनी एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो ज्याने त्या कालावधीमध्ये सर्वोत्तम काम केले आहे. तो किंवा ती त्या कालावधी साठीचा ‘चमचता तारा’ असतो. संदर्भ होता की यावेळेसही त्याची गणना ‘चमचमत्या ताऱ्यां’ मध्ये केली गेली नव्हती. अर्थात जेंव्हा हा पुरस्कार सुरु झाला तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यालाच हा पुरस्कार मिळाला होता, पण त्यानंतर दर वेळेस त्याला डावलले गेले होते.

कधी नकळत, कधी स्पष्टपणे तर कधी आडुन स्पष्टीकरण देताना, ‘सगळ्यात पहिल्यांदा मिळालं ना तुला??’ असा सुर होता. जाम चिडला होता माझा मित्र.. “मग काय झालं?, मी तर असं नाही म्हणत ना कि तेंव्हा केले आहे मी काम आता परत नाही करणार! दर वेळेसे तितकेच चांगले काम करत आलो आहे ना मी? मग पुरस्कार देताना हा भेदभाव का?”

त्याला तक्रार आहे ती मॅनेजमेंट बद्दल, ज्याला पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल नाही. रात्री उशीरापर्यंत थांबुन काम केले म्हणजे एखादा ग्रेट झाला का? स्वतःच्या जॉब प्रोफाईलमध्ये जे काम लिहीले आहे ते केले म्हणजे तो किंवा ती महान का? एखाद्या गुणी कर्मचाऱ्याकडुनच्या अपेक्षा नेहमी उंचावतच जातात. त्याने किंवा तिने कितीही चांगले काम केले तरी ते ‘एक्सपेक्टेडच’ असते, किंबहुना ते गृहीतच धरलेले असते. असे का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते. ‘दिसतं तसं नसतं’ पेक्षा ‘जे नसतं तेच का दिसतं?’

तो गेला, पण त्याचे प्रश्न माझ्याही मनात उत्तर शोधत होते. प्रत्येक कामसु आणी हुशार कामगाराची हीच शोकांतीका आहे. मग करायचे काय? हे सर्व सहन करायचे? पण का? मनाला समजवायचे ते तरी कसे? आणि सहजच माझे लक्ष आकाशात गेले. आकाशात दुरवर ‘ध्रुव’ तेजस्वीपणे चमकत होता, तर जवळचा चंद्र मात्र शितल चांदण्याची बरसात करत होता.

‘ध्रुवा’ची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहीती आहे. पण हे अढळस्थान मिळवुन ‘ध्रुवाचा’ आपल्याला काय उपयोग झाला? काहीच नाही! नाही त्याच्या प्रकाशाचा उपयोग, नाही त्याचा असण्याचा फायदा आणि नसण्याचा तोटा. सर्वांच्या नजरेस दिसतो तो शीतल चांदणे देणारा चंद्रच. अढळ स्थानी नसला तरीही, ओबड-धोबड असला तरीही, त्याच्यावर अनेक डाग असले तरीही. त्याचे असणे आपण पोर्णीमेला साजरे करतो तर नसण्याने अमावस्येच्या अंधकारात हरवुन जातो. हाच चंद्र मोठ्या मोठ्या महासागरांना आपल्या शक्तीच्या जोरावर भरती / ओहोटीच्या तालावर नाचवतो… अढळस्थानी नसुनही.. लखलखता, चमचमता तारा नसुनही..

माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले.. मला ध्रुव नाही व्हायचे आहे. मला अढळस्थानी नाही रहायचे आहे, मला नाही एकाच गोष्टींत वर्षानुवर्ष अडकुन पडायचे. मला अनेक गोष्टींचा स्वाद घ्यायचा आहे, मला अनेक जबाबदाऱ्या पार पाडुन बघायच्या आहेत. मला माझ्या गुणवत्तेचा ‘कस’ लावायचा आहे, अनेक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे, मला माझ्या असण्याची आणि नसण्याची जाणीव करुन द्यायची आहे.. ‘हो मला चंद्र होऊन रहायचे आहे..

Advertisements

11 thoughts on “मला चंद्र होऊन रहायचे आहे”

 1. Good. No first, No last in Betweeen is ok.

  ना सूर्य ना चांदनी,त्यापेक्ष्या चंद्र बरा.

 2. Aniket,
  Mastach …….. Taking inspiration from you & Mahendra, I also started writing some blogs in Marathi !!!!
  Visit my blog to read my latest one ते मंतरलेले दिवस….

  Reg

 3. Hi Aniket,

  Gele kahi divas tumacha blog wachtey. Khoop chaan!! Sahaj sopi bhasha ani vegvegale vishay. ‘Mala chandra hovun rahayche aahe’ ekdam masta jamlay ani vichar agadi patanyasarkha aahe.

  Pudhachya lekhanbaddal utsukata aahe. Lihit raha.

  Shreya
  Bahrain

 4. मंजु, श्रेया, विक्रांत, सचीन.

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद – अनिकेत

 5. माझा अंदाज जर चुकिचा नसेल तर मी “चमकता तारा” पुरस्कार देणा-या आस्थापनेत काम करतो… अगदी मी सुदधा दोन वेळा “तारा” झालो होतो…

  पण आता मागे वळून पाहताना त्यातला फोलपणा जाणवतो…

  बाकी तू लिहिलेलं अगदी पटलं मनाला…

 6. Hi Aniket,

  First of all, I am sorry for writing this comment in English. However, I have absolutely no idea about what it takes to post something in Marathi. In fact, I have never ever written any kind of e-material in Marathi. Anyways.

  Saw your blog for the first time. Had seen it’s reference on some facebook posts before, but, never got a chance to visit.

  This is just amazing piece of work and I am highly impressed! Congratulations!

  It will take a me a while before I finish reading all the material on the blog but I am sure I am going to visit your blog regularly!

  Keep up doing this amazing piece of work!

  Thanks.
  -Prasad

  1. Hi Prasad,

   Thanks a lot for visiting and commenting on my blog. It feels good when people praise and appreciate. I am sure you will like the writing here. If you like reading marathi stories, i will definitely recommend you to go through “Marathi Katha” section.

   Welcome to blog, keep reading and keep commenting

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s