झिपऱ्या कुत्र्याला सोडा गं बाई


भोंडल्यामध्ये म्हणले जाणारे हे गाणे कित्ती छान वाटते ऐकायला, पण प्रत्येक झिपरं कुत्र गोंडस असतेच असे नाही ना, अश्या कुत्र्याला सोडलं तर काय होईल?

कंपनीच्या आवारात एक काळं झिपरं कुत्र गेली कित्तेक वर्ष मी पहातोय. इतकं आळशी कुत्र मी आयुष्यात कधी पाहीले नाही. सदांकदा ते झोपलेलेच असते. शेजारुन जोरात गाडी गेली किंवा कोणी ओरडा-आरडा करत पळत गेले तरी ते डोळे उघडुन बघतही नाही. पण शुक्रवारचा दिवस त्याच्या ह्या व्यक्तीमत्वाला छेद देणारा ठरला.

ह्याच काळ्या झिपऱ्या कुत्र्याने आमच्या कार्यालयामधील एकाचा चावा घेतला. इतकेच नाही तर काही लोकं घरी जात असताना त्यांच्या अंगावर, गाडीच्या मागे धावुन गेला असं ऐकण्यात आले. मग दिवसभर अफवांना पिकच आले होते. कोणी म्हणलं ‘त्याने चावलेला एक माणुस मेला’, तर कोणी सांगीतले ‘एकाच्या पायाचा लचकाच निघाला’. ज्याला ते कुत्र चावलं होतं त्याच्यावर उपदेशांचा भडीमार चालला होता. ‘त्या कुत्र्यावर लक्ष ठेव’, ‘ते मेलं तर तुझ काही खरं नाही रे बाबा’ एकुण सुर ऐकुन प्रोजेक्ट मॅनेजरने लगेच त्याचे एक KT अर्थात नॉलेज ट्रान्स्फर चे एक सेशन ठेवले. हो.. उद्या उगाच काही झाले तर दुसरा रिसोर्स तयार हवा.

कार्यालयामध्ये दिवसभर भीतीचे वातावरण होते. लोकं खाली जायला का-कु करत होते. एक-दोन लोक गेली होती खाली. लिफ्ट चे दार उघडल्यावर त्यांना ते काळं कुत्र समोरच बसलेलं दिसलं लगोलग त्यांनी लगेच दार लावुन घेतलं आणि परत वर आले.

कंपनीमध्ये त्यादिवशी मॅक्सीमम मॅन हॉवर्स चे काम झाले, कारण घरी कोणी लवकर जातच नव्हते बऱ्याच वेळ सगळे कार्यालयात होते. ज्यांना अगदीच गरज होती ते दोघ-तिघं चा घोळका करुन बाहेर पडत होते. जे सुटले त्यांचे लगेच फोन येउन गेले, तर ज्यांना परत यावे लागले त्यांनी ते कुत्र कसं अजुन पिसाळलेले दिसते आहे याचे वर्णन करुन सगळ्यांना घाबरवुन सोडले होते.

या कुत्र्यापासुन वाचण्यासाठी काय करता येइल याबद्दल ऍनालिस्ट लोकांनी ‘गुगल’ वर धाव घेतली परंतु योग्य मार्ग सापडला नाही. शेवटी बालपणीचीच एक युक्ती वापरायची ठरवले. लहानपणी लपाछपी खेळताना ‘धप्पा’ देताना एकदम १०-१५ जणांचा गुच्छ गेला की ज्याच्यावर राज्य त्याला काहीच करता येत नाही आणि मग ‘धप्पा’ देता येतो त्याप्रमाणे मग आम्ही सगळे जण एकत्र जमलो. कंपनीच्या वॉचमनला पुढे केले (कारण त्याच्याकडे काठी होती ना!!) आणी सगळे एकदम ‘होssss होssss’ असा ओरडा आरडा करत जिन्यामधुन लिफ्टमधुन ओरडत खाली गेलो. एवढ्या सगळ्या लोकांचा ओरडणारा ‘कळप’ पाहुन ते कुत्र बावचळले आणि शेपुट घालुन पळुन गेले. मग आम्ही पण पटापट गाड्या काढल्या आणि घरचा रस्ता धरला.

पण मला माहीती आहे, ते कुत्र गेले नाही, इथेच कुठेतरी आहे. लपुन बसले आहे, बदल्याची वाट बघत. आज परत कुणाचा तरी बळी जाणार.. ‘बली मांगती काली मॉ.. शक्ती दे काली मॉ’

सो.. झिपऱ्या कुत्र्याला सोडा.. पण निट विचार करुन !!!

4 thoughts on “झिपऱ्या कुत्र्याला सोडा गं बाई

  1. मजा आली वाचून. कुत्र्यांना मी पण फारच टरकते. दहा फूट लांब असले तरी पळून जाते, पण दबकत. नाहितर लागायचे मागे.

  2. सुंदर लेख. मजा वाटली वाचुन. तुमच्या ओफ़िस मधले टिमवर्क मस्त आहे. सोलिड मजा आली असेल ना गोंधळ घालतांना.

    अश्विन शेंडे

    • अश्विन? अरे आपण ओळखतो बहुतेक एक मेकांना. आठवतो ‘मित्र-मैत्रिणी’ याहु-ग्रुप मी मॉडरेटर त्या ग्रुपचा! आठवले?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s