ह्रुदयी वसंत फुलताना (भाग १)


तसे अफेअर्स २-३ झाली होती, पण प्रेम ज्याला म्हणतात ते कधी झालेच नाही. मी माझी जीवन-साथी शोधत राहीलो, पण मनामध्ये जी कल्पना होती तशी प्रत्यक्षात कधी भेटलीच नव्हती. अशातच मी ‘सिंबायोसिस’ ला संगणक डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. हे कॉलेज अगदी जसे ऐकुन होतो तसेच होते. नेहमीच्या कॉलेज लाईफ पेक्षा थोडे हटके!. इथली तरुणाई थोडी वेगळीच भासते. सुंदर कपडे आणी काहीश्या वेगळ्याच फॅशन मधील क्राउड, इमारती, वर्ग, कॅन्टीन सर्व काही वेगवेगळा रंगामध्ये न्हाउन निघालेले. इथे टु-व्हीलर आणी वडापाव खाणाऱ्यांपेक्षा, फोर-व्हीलर आणी बर्गर खाणारे जास्ती. थोडक्यात सांगायचे तर “यहा जिंदगी, एक अलग जिंदगी है.”

तर अशा वातावरणात माझी कॉलेजची सेकंड इनिंग सुरु झाली. माझ्या वर्गात आपले वाटणारे थोडेच होते आणी आपल्या वाटणाऱ्या तर फारच कमी. त्यामुळे मग पुर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. मधे-आधे एक एक मित्रांना गर्ल-फ्रेंड मिळत गेल्या. मी मात्र एकटा जिव, सदाशिव. डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास झालो, कॉलेज मधे तर पहिला आलोच, पण पुणे युनीर्व्हसीटीत पण पाचवा नंबर लागला. त्यामुळे PG ला लगेच प्रवेश मिळाला. बाकीच्या मित्रांचे पण प्रेमभंग झाले होते त्याचा परीणाम त्यांच्या रीझल्टस झाला. मग PG मधे जाणारे २-३ जणच होते. आता परत नवीन ग्रुप, नवीन मित्र-मैत्रीणी सगळे काही नवीन.

यशाची चटक लागलेला मी, यावर्षी पण यश मिळवायचे या उद्देशाने झपाटलेला होतो. कॅन्टीन,
पार्कींग, कट्टे यापेक्षा मी लायब्ररी, लॅब इकडेच जाऊ लागलो. कधी लेक्चर बुडवणे नाही, वेळेवर
सबमिशंन्स वगैरे चालु होते आणी थोड्याच दिवसात हुशार विद्यार्थी [सरांच्या भाषेत] आणी पुस्तकी किडा [इतरांच्या भाषेत] बनुन गेलो.

आणी मग वेळ आली ऍन्युअल फेस्टीवल ची. जोरदार तयारी सुरु झाली. लेक्चर्स तसेही होत नव्हते मग मी पण अभ्यास थोडा बाजुला ठेवुन या आनंद-जत्रेत सहभागी व्हायचे ठरवले, पण ऑर्गनाझर म्हणुन.

मग काय फुल्ल धमाल.. रोज प्लॅनिंग, मिटींग्स, डेकोरेशन्स, हे आण, ते आण. बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या. ‘पर वो नही मिली जिसका इंतजार था’. रोज सकाळी मी आणी १-२ मित्र टेबल टाकुन बसायचो. गेम्स मधे भाग घेणाऱ्यांची नोंदणी करायला.

आणी…..एक दिवस ती आली, अगदी अनपेक्षीतपणे. डार्क निळ्या रंगाचा पंजाबी, केसांचा पोनी
बांधलेला, खांद्याला एक पर्स, हातात कुठलेसे संगणकाचे चे पुस्तक, चेहऱ्यावर केसांची एक बट.. टिकली… नाही??.. नाही!! नसु देत.. भिरभिरती नजर आणी डोळ्यांमधे कमालीची उत्सुकता.

छातीमध्ये कळ येणे काय असते, ते त्यादिवशी अनुभवले. ती आली आणी आमच्या टेबलपाशी येउन उभी राहीली. तिच्याबरोबर तीची मैत्रीण होती, आणी काय आर्श्चय मी तीला ओळखत होतो. मी माझा मोर्चा पहिल्यांदा तिकडेच वळवला. इव्हेंटची माहिती सांगितली,मग
इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या.. पण आमच्या बाईसाहेब काही बोलायचे नाव घेइनात. मग मीच तिला विचारले..एकदम फाड-फाड कोकाटे इंग्लीश मधे “You are also interested in some kind of game to participate?”, तर सरळ नाही म्हणाली. झाले पुढे काय बोलणार. हो म्हणली असती तर नाव तरी कळले असते. तेवढ्यात माझे लक्ष तिच्या हाताकडे गेले. तिने बोटामधे “K” लेटर ची अंगठी घातली होती.. लगेच मनात विचार सुरु झाले.. अं..केतकी… कविता.. किरण.. नको.. कोमल.. काहीचच कळत नव्हते.

मग परत मी- “तुझे नाव केतकी आहे का.?”
ती- “नाही” ..
[मीः मनातच मग..बोल कि काय ते..] मग.. कविता..
ती- “नाही”..
[ च्यायला ] बरं पण तुझे नाव “K” पासुन सुरु होते.. राइट??
ती- “नाही”..

[अरेच्या- मग हिला कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे काय “K”पासुन नाव असलेला.. ] पण ही काही पत्ता लागु देईना. वाक्य तोडुनच टाकायचे म्हणल्यावर काय करणार..!! मग मात्र मला राहावले नाही..

शेवटी विचारलेच काय नाव तुझे??.

तीः “..

[क्रमशः]
Next >>

23 thoughts on “ह्रुदयी वसंत फुलताना (भाग १)

 1. sahajach

  ’क्रमश:’ म्हणजे काय? अशी उत्सुकता का ताणता हो????
  लवकर लिहा पुढचा भाग……दिलात ना भुंगा सोडुन…काय असेल बरं त्या K पासुन…………..

  Reply
  1. अनिकेत Post author

   अस्सचं मज्जा म्हणुन 🙂 भुंगा तर आपल्या ब्लॉगचे वैशिष्ट आहे, नावातच भुंगा आहे ना!!
   प्रतीक्रियेबद्दल धन्यवाद, उद्या सकाळीच दुसरा भाग पोस्ट करीन.

   Reply
    1. अनिकेत Post author

     All the parts are published, please check “Marathi Katha” page for the links to other parts

     Reply
 2. Mahendra Kulkarni

  अनिकेत
  टीव्ही वरच्या सिरियल्स सारखं लिहिताय..
  शेवटी एकदम असं ढॅं टॅ डॅं म्युझिक.. आणि मग देखेंगे अगले एपिसोडमे.
  किंवा रिऍलीटी शो मधे एखाद्या जाणाऱ्या पार्टिसिपंटचे नांव डिक्लिअर करतांना असंच काहिसं करतात.. खुप उत्सुकता चाळवली आहे..

  Reply
 3. mipunekar

  लयी भारी. उत्सुकता शिगेला पोचली आहे.

  नशीब अजून ताणायला मध्येच असा नाही लिहिलास की या पाराग्राफ चे प्रायोजक आहेत डाबर लाल दंत मंजन…..

  मस्त चालू असताना क्रमशः………. 😦

  Reply
 4. sam

  उत्सुकता aahe far phude naaki lehe re .. aani porgi kon aaahe te pan sang.. ghari mahet aahe ka tu zya he sagle .. 😀 nasel ter sangun taak manje nanter prob nahe yeenar .. vaaat pahat aahe bhag 2 che ..

  Reply
 5. snehal

  kramasha?!!!!!!!!!!??????????!!!!!!!!!!!!!????????????????!!!!!!!!!!!!!?????????????????!!!!!!!!!!!!!!????????
  jast vicharala taan deun ase vatle ki tichya magiil janmatle urlele surlele shwaaas te tine tya kramashat umatle asa ve!!!!! pan in all laybhariii!!

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s