डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

ह्रुदयी वसंत फुलताना (भाग २)

22 Comments


भाग १ पासुन पुढे चालु…

माझ्या मनात अजूनही विचारांचे काहूर उठले होते, तुम्हा सर्वांप्रमाणे मी पण तिचे नाव ऐकण्यासाठी बेचैन झालो होतो. मनातल्या मनात मला आवडणारी नावे, जशी ‘प्रिती’, ‘पायल’, ‘रिया’, ‘सोनाली’ वगैरे तिला लावून बघत होतो. पण काहीच नाव योग्य वाटत नव्हते. परत “K” चा भुंगा मनात भुणभुणत होताच.

…. “पल्लवी”.. तिच्या आवाजाने मी भानावर आलो. व्वा..किती छान नाव.. अगदी तिच्यासारखेच गोड..एकदम शोभतेय हे नाव.. पण.. तो “के”.. छे तो भुंगा काही मला शांत बसुन देत नव्हता. म्हणुन मी विचारलेच. तर म्हणाली.. “मला माझ्या आजोबांनी दिलीये”.. आजोबांनी…!! [आ.. जो… बा.. पण का?? हे म्हणजे अगदी “दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे” सिनेमातील राज चे “मुझे तुम्हारी आंखे मेरी दादीमा की याद दिलाती है” सारखे झाले”]

मी: ‘त्यांचे नाव “के” पासुन आहे का??’

तीः नाही.. [हि सारखी नाहीच म्हणते].. माझे आडनाव “के” पासुन आहे. नावाच्या अक्षराची अंगठी सगळेच घालतात. [मी चारी मुंड्या चित. पण एक समाधान “के” आडनावाचे अक्षर आहे.. सध्या तरी असे समजू की दुसरे कोणी नाही]

एवढे बोलून ती गेली सुद्धा. माझा नंतरचा पूर्णं दिवस वायाच गेला. मनामध्ये कसलीतरी एक हुरहुर लागुन राहिली होती. पोटात उगाचच गोळा आला होता. काहीतरी विचित्रच अनुभव होता तो.

दिवसभर मग हमाली कामेच केली. जसे वस्तु आणणे, खेळांसाठी मैदान आरक्षित करणे वगैरे. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी टेबल टाकुन हजर कारण तिचे वर्ग सकाळी असायचे. थोड्या वेळातच ती मला दिसणार या विचारांनीच मला कसेतरी होत होते. मी उगाचच फार कामात असल्याचा आव आणुन बसलो होतो. आणी ती आली. गडद मरून रंगाचा पंजाबी, केस मोकळे सोडलेले, आणी टिकली लावलेली..किती गोड दिसत होती म्हणुन सांगू.. पण चेहऱ्यावर कसली तरी चिंता होती.

बरोबर गौरी, माझी मैत्रिण पण होती. दोघी सरळ वाचनालयातच गेल्या. माझ्याकडे तिने पाहिले पण नाही. मला उगाचच राग आला.. खरं तर का पाहावे माझी तशी ओळख पण नाही आणी मी कोणी मदनाचा पुतळा, राजकुमार पण नाही. एखाद्या टायर मध्ये हवा भरावी आणी नंतर त्यातली हवा सोडुन द्यावी की तो टायर कसा मलूल होतो, तसा मी झालो होतो. बरं मी वाचनालयात जावे तर तो लोचटपणा वाटला असता. शेवटी विचार केला बघून तर येऊ काय करतीय ते.. म्हणुन गेलो आत. जसे काही मी सहज आलोय असे दाखवत मी सरळ वाचनालयाच्या कक्षापाशीच गेलो. अधुन-मधुन हळूच मी ओझरता कटाक्ष टाकत होतो पण ती सरांशी बोलण्यात मग्न होती, तेवढ्यात त्या सरांनी मला हाक मारली.. “अरे अनिकेत..इकडे ये जरा”. मी विजेच्या वेगाने तिकडे गेलो. सर तिला म्हणाले.. “अरे हा आहे ना.. याला विचारत जा. हुशार विद्यार्थी आहे. कुठलाही विषयावरचा प्रश्न विचार, तुला उत्तर मिळेल” एवढे बोलुन ते निघुन गेले.

मग ती मला म्हणाली, “अरे हा विषय मला काहीच कळत नाहीये.. तुला वेळ असेल तर सांगशील का?” मी काय म्हणालो हे सांगायला नकोच. पुढचे १-२ तास मी तिला अशा आवेशात समजावून सांगत होतो जसे काही तिला परीक्षेत पास करणे हि सर्वस्वी माझीच जबाबदारी आहे. मी एवढ्या गोड मुलीशी काय बोलतोय हे बघायला माझे वर्ग मित्र सारखे डोकावुन जात होते.. असो, नंतरचा माझा दिवस फारच चांगला गेला. त्या दिवसांपासून निदान “हाय-बाय” तरी चालु झाले.

काही दिवसातच ऍन्युअल कार्यक्रम सुरू झाले. पहिलाच दिवस “साडी डे” होता. मी खुप उत्सुक होतो तिला साडी मधे बघायला. सुंदर पऱ्यांमधे माझी नजर फक्त तिलाच शोधत होती. पण ति आलीच नाही, तिच्या मैत्रीणी कडुन कळले की ति २-३ दिवस गावाला गेलीये. झाले.. पहीलाच दिवस आणी माझा मुड ऑफ..!! नंतर पण कसले कसले “डे” होते.. पण काय उपयोग. ३-४ दिवसांपुर्वी आम्हीच नटवलेली ती जागा मलाच ओसाड वाटायला लागली. या दिवसात मला प्रकर्षाने जाणीव झाली की एका आठवड्यातच मी तिच्यात केवढा गुंतलो गेलोय. मला काय माहीती होते तिच्याबद्दल? तिचे नाव आणी आडनाव फक्त! आणी फार तर ती सध्या काय शिकते आहे. बाकी.. तिच्या घरी कोण कोण असते, तिचा जात-धर्म काय, तिचे वय काय.. आधीचे शिक्षण काय.. काहीही माहीत नव्हते.. तरी पण ती मला आवडु लागली होती. आणी यावेळेला मला पुर्ण खात्री होती की हे फक्त आकर्षण नाहीये, मी तिच्यावर प्रेम करू लागलोय.. होय.. हीच माझी जिवनसाथी आहे.

ते २-३ दिवस मी कसे घालवले ते मलाच माहीत. तडफडणे ज्याला म्हणतात ते मी अनुभवले.

आणी एके दिवशी ति परत आली. ‘हम आपके है कौन’ मधील तो शेर आठवतो? ‘दिदी तेरा देवर दिवाना’ गाण्याच्या आधीचा? जेंव्हा माधुरी निळ्या साडीमध्ये जिना उतरुन खाली येत असते तेंव्हा सतीश शहा आणि नंतर सलमान खान म्हणतो.. तो शेर??

“कांटे नही कटते है लम्हे इंतजार के
नजरे जमां के बैठे है रस्ते पे यार के
दिले ने कहां देखें जो हुस्न यार के
लाया है कौन इन्हे फलक से उतार के”

अगदी तस्सच..माझ्या उजाड जगात आनंदाचे रंग घेउन. मला हे झुरत रहाणे पसंत नाही आणी जमणार पण नव्हते. मला पुर्ण विश्वास होता कि मला नकारच मिळेल पण तरी मी तिला विचारायचेच ठरवले. त्याआधी फक्त तिच्या आयुष्यात कोणी आहे का हे जाणुन घेणे महत्वाचे होते.

म्हणुन गौरीशी आधी बोलायचे ठरवले. तिला बाजुला बोलावुन मी माझ्या मनातला विचार बोलुन दाखवला. पहिल्यांदा तिला धक्काच बसला, मग मला म्हणाली, “किती दिवस ओळखतोस तिला?”

मीः “फार तर ८-१० दिवस”

गौरीः “तरीही? तुला काय माहीती आहे तिच्या बद्दल?. हे बघ तु निट विचार कर!!. पल्लवी खुप साधी मुलगी आहे आणी खुप इमोशनल पण. तु खरंच सिरीयस आहेस का या बाबतीत? अर्थात मला माहित आहे तु तसा नाहीयेस, पण जरा काही दिवस जाउ देत, निट ओळख तरी होउ देत. आता परीक्षा आहे, अभ्यासावर परीणाम होइल..” आणी बरंच काही-बाही.. शेवटी असे ठरले की मी परीक्षा संपेपर्यंत थांबावे आणी तेव्हा सुद्धा मला ती तेवढीच आवडत असेल तरच बोलावे.

खरं तर मला हे मान्य नव्हते पण ऐकावे लागले. मी याबद्दल माझ्या मित्रांशी पण बोललो. तर सगळ्यांनी मला वेड्यात काढले. ती केवढी चांगली आहे, तिचा असेलच कोणीतरी, आणी तुला तर ती नक्कीच नकार देइल, चप्पलेने बडवेल वगैरे. हे सगळे मला मान्य होते.. मला हेही माहीत होते की ती मला नकार देइल, पण ती माझ्या मनातुन काही केल्या जातच नव्हती.

सगळे “डे” मी तिच्या बरोबरच साजरे केले. मधे एकदा एका नृत्य स्पर्धेमध्ये एकदमच तिने भाग घेतला आणी पारीतोषक पण मिळवले. काय छान नाचली!! तिच्या एक एक गोष्टी माझ्या मनात असलेल्या प्रेमात अधिकच भर घालत गेले. दिवसें-दिवस मला ती जास्तच आवडत गेली. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ होता. मला विद्यापीठात नंबर आल्या बद्दल बक्षीस होते. पण मला बक्षीस दिले गेले तेंव्हा पल्लवी आली नव्ह्ती, मला खुप वाईट वाटले, तिच्या समोर बक्षीस मिळाले असते तर..!! ती आणी तिच्या मैत्रीणी कार्यक्रमाला उशीराच आल्या. खुप छान ड्रेस होता.. लाल रंगाचा टॉप आणी, काळ्या रंगाचे रॅप-अराउंड. काय छान दिसत होती, सगळे जण तिच्याकडेच बघत होते.

आता मात्र मला रहावणे कठीण झाले होते. मी मनाशी पक्का निश्चय केला की काही झाले तरी आता मी बोलणारच. जे काय होइल ते व्हावे, पण मला आता अशक्य आहे असे जगणे. दिवस रात्र, घरात, वर्गात, सगळीकडे तिच होती. तास चालु असताना मी वही मधे तिचे नाव लिहीत बसायचो.. खरच सांगतो, कधी आयुष्यात कोणाच्या एवढा प्रेमात पडेन असे मला वाटलेच नव्हते. शेवटी, एक दिवस संध्याकाळी मी कोणाला न सांगता, तिला फोन केला आणी भेटायला बोलावले. ति ठीक आहे म्हणाली..

नंतर काय झाले, मी तिच्याशी काय बोललो, ती हो म्हणाली का? यासाठी तिसरा आणी शेवटचा भाग नक्की वाचा.. लवकरच पाठवत आहे :-). थोडीशी कल्पना देतो.. मला नकार मिळाला.. एकदा नाही तर, मी तिला दुसऱ्यांदा विचारले, काही महिन्यांनी तेंव्हापण.. दोन-दोनदा नकार? विसराच म्हणजे सगळं नाही का? मग ? मग काय घडले पुढे? प्रश्न, प्रश्न, प्रश्न!! थोडी वाट बघा तिसऱ्या आणी शेवटच्या भागाची..

[क्रमशः]
Next >>

Advertisements

22 thoughts on “ह्रुदयी वसंत फुलताना (भाग २)

 1. अरेरे खुपच ताणून धरले राव तुमी……
  दुसऱ्या भागात पण ह्रुदयी वसंत फुलला नाही.

 2. एखाद्या टायर मध्ये हवा भरावी आणी नंतर त्यातली हवा सोडुन द्यावी की तो टायर कसा मलूल होतो, तसा मी झालो होतो…

  हा हा .. बेस्ट उपमा आहे .. (खायचा नाही बर का)..

  वाट बघतोय राव … लवकर .. आता आमचा भुंगा शांत बासु देत नाही आम्हाला … हा हा .. [;)]

 3. एवढं छान लिहु नकोस अरे लॅपटॉप आणि मझ्यातून धूर निघेल. पूर्ण वाचवत नाही रे. टू कीप दे एक्साट्मेंट अलाईव्ह !

 4. तिसरा भाग लवकर पोस्ट करा.
  भुंगा डोक्यात भुणभुणतोय.
  बाकी पोस्ट मस्त.

 5. अनिकेत राव…….
  Hard to believe you are an IT professional. कसले भारी लिहिले आहे……. एखाद्या कसलेल्या लेखकाच्या तोडीस तोड़…. एकदम सही……. जबरदस्त…… मला हे वाचून एकदम भूतकाळात गेल्यासारखे झाले… All these years, serving for mad-paced industry, I have completely forgotten my college life. तुम्ही त्या फार जुन्या आठवणींना चालना दिली…….
  लवकर लिहा तिसरा भाग….. Eagerly waiting for this…….

  P.S. – पल्लवी वहिनी तुमचा ब्लॉग वाचतात का? त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल फार उत्सुकता आहे मनात 🙂 🙂

  • काय राव, आय.टी. मध्ये असलो म्हणुन काय झालं, आय.टी. वाले काय कमी असतात काय? अरे आपणच आपलं मार्केटींग करायचे असते, असं घालुन पाडुन नाही बोलु 🙂

   असो, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद असे काही चांगले वाचले की लिहायला हुरुप येतो 🙂

 6. ते मी विचारलेल्या दुसर्या प्रश्नाचं काय ? 😛 😛

  • 🙂 नाही. तिला माझ्या ब्लॉगचा पत्ताही कदाचीत माहीत नसेल. अर्थात मी ब्लॉग सुरु केला तेंव्हा सांगीतले होते. पण “बहुदा” नाही वाचत ती.

   जॅपनीज मधुन लिहीत असतो ब्लॉग, तर जरुर वाचला असता 🙂

 7. Tumcha blog kharach khup chaan ahe. Vachtana khup chaan vatat. Waiting for third post. 🙂

 8. अनिकेत,
  हे आणि याच्या आधीचंही पोस्ट भारीच रोमांचक आणि उत्कंठावर्धक. मला अगदी ते college चे,प्रेमात पडण्याचे,gathering चे दिवस अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. 🙂 पुढचा भाग येण्याची वाट पहात आहेच.
  पण…शेवट्ची चार वाक्ये खटकली. उगाच एकता कपूरच्या सिरियला सारखा भास झाला आणि त्रास झाला. 🙂 तिच्या सिरियलचा आम्ही धसका घेतला आहे त्याचा हा परिणाम.असो.
  -विद्या.

 9. एकदम् सही यार्…तुझ्या लिखाणात् एक् गोष्ट फार् छान् आहे आणी ती म्हणजे तु प्रसंग डोळ्यापुठे उभा करतोस्..फारच् छान्..waiting for next part..:-)

 10. उद्या गावाला जाणारे. पण तिकडून पण उर्वरित पोस्ट साठी काहीही करून वाचायला येणारे.
  खूपच सही. तोड नाही.

  • बापरे, नका हो एवढे अपेक्षांचे ओझे टाकु.. खरंच टेंशन येते 🙂

 11. Sir
  lae bhari lihita ho
  tumhi amchya dokyat be vachanacha bhunga sodla baga tumhi

 12. lay bhari mitra

 13. hey aniket hi tuji story ahe ka

 14. wow…..finally u replied my comment

 15. its ok…….sir no prob

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s