डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

दादा, काय चुकलं माझं?

25 Comments


मॅगी ला घरी आणलं तेंव्हा ती फक्त ७ महीन्यांची होती. गुबगुबीत अंग, अंगभर पांढरेशुभ्र केस, काळेभोर डोळे, छोटेसे काळे नाक, झुपकेदार शेपुटे, छोटेसे पाय आणि छानसी गुलाबी जीभ. पहाताच कुणालाही उचलुन घ्यावेसे वाटेल अशी मॅगी, पॉमेरीअन कुत्र्याच पिल्लु देशपांडे कुटुंबीयांनी घरी आणले होते.

६ महीने पुलाखाली रहाणाऱ्या ‘कुत्तेवाल्याकडे’ हाल-अपेष्टा, खाण्याची आबाळ सहन केल्यानंतर मॅगीचे नशीब आज उघडले होते. मऊ थंडगार गाडीमधल्या सिटवर बसुन, खिडकीतुन नाक बाहेर काढुन फेरफटका मारल्यावर मॅगी एका अलीशान बंगल्यात आली होती. आल्या आल्या तिला एका छानश्या भांड्यात दुध-पोळी, पाणी मिळाले होते. मॅगी खुप खुश होती. देशपांडे काकांनी मॅगीची सर्व कुटुंबाशी ओळख करुन दिली. हा तुझा दादा, ज्याच्या हट्टाला जागुन तुला घरी आणले, आणि ही तुझी आई, काही लागलं तर त्यांना सांगायचे. मॅगी खुश झाली आणि दादाच्या अंगाला अंग घासत त्याच्यापुढे उताणी पडली. दादानेही मग तिला अंजारले-गोंजारले, डोक्यावर थापटले. मॅगीला खुप छान वाटले. दादाने मग त्याच्या खेळण्यातला चेंडु काढला आणि तो आणि मॅगी पार दमेपर्यंत बंगल्याच्या बागेत मनसोक्त खेळले.

संध्याकाळी घरी परतल्यावर दादाने मॅगीला बाथरुम मध्ये घासुन पुसुन आंघोळ घातली. तिच्यासाठी स्पेशल साबण काय!, शॅम्पु काय!, वेगळा टॉवेल काय!, मॅगीला स्वर्ग ही ठेंगणा वाटु लागला होता. रात्री गुबगुबीत पांघरूणात शिरुन मॅगी झोपुन गेली.

हळ् हळु मॅगी देशपांडे कुटुंबाचाच एक भाग बनुन गेली. तिला बरोबर घेतल्याशिवाय ते बाहेर गावी जात नसत. ऑफीसमधुन, शाळा-कॉलेजमधुन घरी परतल्यावर मॅगीला गोंजारल्याशिवाय तिच्याशी गप्पा मारल्याशिवाय कुणाला चैन पडत नसे. दिवसामागुन दिवस गेले, वर्ष गेली. मॅगीला रस्त्यावरची कुत्री बघुन, स्वतःच्या सुखाचा हेवा वाटे आणि मग ती लाडात येउन बरोबरच्याचे पाय चाटे, अंग घासे.

मॅगी मोठी झाली होती, तिला दिवस राहीले होते आणि एके दिवशी तिने ४ गुबगुबीत पिल्लांना जन्म दिला. मोठी लोभस होती ती पिल्ल. मॅगीला कोण आनंद झाला होता. तेवढ्यात कॉलेजची क्रिकेटची मॅच संपवुन तिचा दादा चिखलाने माखलेल्या स्थितीत घरी परतला. त्याला बघताच मॅगीला आनंद झाला, तिने कसलाही विचार न करता आपल्या पिल्लांना त्याच्याकडे पाठवले.

तिन-चार दिवसांनी त्यांच्याकडे कोणीतरी पाहुणे-मंडळी आली. मोठ्या कौतुकाने ते मॅगीच्या पिल्लांकडे बघत होते. मॅगीला वाटले कोणीतरी नातेवाईक लोक आले आहेत. मग दादाने आणि काकांनी एक एक करत चारही पिल्ल त्या लोकांकडे दिली. नविन लोकं बघुन पिल्ल ‘कुई कुई’ करु लागली तशी मॅगी त्यांना म्हणाली, ‘घाबरु नका बाळांनो, माझा सगळ्यांवर पुर्ण विश्वास आहे, त्यांच्यामुळे आपले कुणाचेही वाईट होणार नाही, तुम्ही निर्धास्त रहा. पिल्लांना घेउन ते लोक निघुन गेले. मॅगी निर्धास्त होती. तिला दादावर पुर्ण विश्वास होता. आपल्याला जसा तो गाडीतुन चक्कर मारायचा तश्शीच चक्कर मारायला त्याने आपल्या पिल्लांना पाठवले असणार या विचाराने ती मनोमन सुखावली होती. बराच्च वेळ झाला पण पिल्ल आली नाहीत म्हणुन ती कासावीस होऊ लागली, पण तरीही तिचे मन तिला समजावत होते, अगं येतील पिल्ल कुठे जाणार आहेत. तुझा दादा त्यांना काही होऊ देणार नाही.

पण शेवटी तिची पिल्ल परत आलीच नाहीत. कशी येणार, तिच्या निर्दयी दादाने आणि काकांनी मिळुन तीची पिल्ल परस्पर विकुन टाकली होती. मॅगि खुप विव्हळली, पिल्लांच्या आठवणीने वेडीपिशी झाली, पण तिचं म्हणण कुणाला कळणार?

काही वर्ष गेली. मॅगी आता थकत चालली होती. पुर्वीचा उत्साह तिच्यात राहीला नव्हता. वाढत्या वयाने तिच्या एक प्रकारचा भित्रेपणा आला होता. एक दिवस त्यांच्या घरी एक अनोळखी ताई आली. तिला बघुन मॅगी जोरजोरात भुंकायला लागली. दादाने तिला समजावुन बघीतले, पण मॅगी भुंकतच राहीली. तिच्या भुंकण्याने ती ताई चांगलीच घाबरली होती. शेवटी दादाने खाडकन जोरात फटका मॅगीला मारला. इतक्या वर्षात दादाने पहिल्यांदाच तिच्यावर हात उगारला होता.

‘मॅगी.. कळत नाही तुला गप्प म्हणलेले, चल आत मध्ये हो .. मुर्ख कुठली’ तो जोरात मॅगी वर खेकसला.

मॅगीला स्वतःचीच लाज वाटली. ‘माझीच चुक होती, मी उगाचच ओरडत बसले, दादाचं ऐकुन गप्प बसायला हवे होते. या म्हातारपणामुळे कशाचेही भानच रहात नाही’. मॅगी मान खाली घालुन आत जावुन बसली. बाहेरुन हसण्याचे आवाज येत होते. दादा आणि ती ताई खुप गप्पा मारत होते. दादा खुप खुश होता, त्यामुळे मग आपले दुखः विसरुन मॅगी पण खुश झाली.

काही दिवसांनी ती ताई कायमची त्यांच्या घरी रहायला आली. दादाचे आणि तिचे लग्न झाले होते. गोरीपान, फुलासारख्या त्या ताईला बघुन मॅगी लाडात आली आणि तिने ताईचे पाय चाटायला सुरुवात केली. त्याबरोबर ती ताई ‘ईsss’ करुन खुर्चीवर उभी राहीली आणि जोरात ओरडली ‘इन्फेक्शन होईल ना’ मॅगीला अर्थात ते काही कळले नाही. पण तिचा हिरमोड झाला आणि ती आत निघुन गेली. त्यानंतर एक गोष्ट मात्र तिच्या लक्षात आली, त्या ताईला मॅगी फार आवडत नव्हती. दोन हात ठेवुनच ताई फिरायची. दादाही मॅगीपासुन थोडा दुर गेला होता. ताईच्या सहवासात त्याला मॅगीचा पुर्ण विसर पडला होता. मॅगी मात्र त्याला कध्धीच विसरली नव्हती. लांबुनच ती दादाकडे डोळे भरुन पहायची आणि आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमुन जायची.

काही दिवसांनी त्या ताईने पण एका बाळाला जन्म दिला. नविन बाळ घरी आले तेंव्हा मॅगीला कोण आनंद झाला. ते बाळ पण मॅगीकडे बघुन खुश झाले होते. मॅगीला त्या बाळाचा वास खुप आवडला म्हणुन ती बाळाच्या दिशेने सरकु लागली, तशी ताई आणि दादा दोघंही जोरात तिच्यावर ओरडले. दादाने तिला उचलुन दुसऱ्या खोलीत न्हेउन ठेवले आणि दार लावुन टाकले. मॅगीला काय झाले तेच कळेना. जेंव्हा दादा चिखलात माखुन आला होता तेंव्हा कसलाही विचार नं करता मी माझ्या पिल्लांना त्याच्याकडे जाउ दिले होते, मग आता हा भेदभाव का?

बाळ काही महीन्यांनी रांगु लागले, दिसेल त्या वस्तु तोंडात घालु लागले. त्यावरुन ताई आणि दादाचे काहीतरी भांडण होत होते. ताई सारखी मॅगीकडे बोट दाखवुन ‘इन्फेश्कन’ बद्दल काहीतरी बोलत असे. मॅगीला तो प्रकार काय आहे हे अजुनही कळाले नव्हते. मी तर आता कुणाच्या जवळही जात नाही, कुणावर ओरडतही नाही, मग माझ्याबद्दल हे लोकं काय बोलतात?

शेवटी जे व्हायचे तेच झाले, बाळ आजारी पडले, खुप आजारी पडले. ताई-दादाची खुप धावपळ झाली. दादाच्या नजरते मॅगीबद्दल असलेले उरले-सुरले थोडेसे प्रेम निघुन गेले होते, त्याची जागा आता तिरस्काराने घेतली होती. मॅगी बिच्चारी कोपऱ्यात अंग चोरुन बसायची, जेणे करुन आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये!

एके दिवशी, दादा घरी आला, त्याने मॅगीला जवळ बोलावले, तिला पुर्वीसारखेच गोंजारले, तिला दुध-पोळी खाउ घातली. मॅगी खुप खुश झाली. मग दादाने तिच्या गळ्यातला पट्टाही काढुन टाकला. मॅगीला खरं तरं तो पट्टा अज्जिबात आवडला नव्हता, पण दादाने घातला म्हणुन तीने तो इतके वर्ष सांभाळला होता. तो काढल्यावर तर तिच्या आनंदाला पारावारच राहीला नाही. ती खुश होती, पण दादा मात्र उदास दिसत होता, कसल्यातरी दडपणाखाली असल्यासारखा.

मॅगीचे खाउन झाल्यावर त्याने तिला उचलुन घेतले आणि गाडित ठेवले, तिच्याबाजुच्या खिडकीची काचही खाली करुन दिली. कित्तेक दिवासांनी गाडीतुन फिरायला जायला मिळणार म्हणुन मॅगी खुश झाली. दादा गाडी पळवत होता.. दुर खुप दुर गाडी चालली होती. गाव मागे पडले होते. खिडकीतुन येणारा बेभान वारा मॅगीला सुखावत होता. खुपच दुर आल्यावर दादाने गाडी एका मैदानापाशी गाडी थांबवली. मग त्याने मॅगीला खाली उतरवले. एका झाडापाशी खुपसारे पोळीचे तुकडे आणि पाण्याचे भांडे ठेवले. मग त्याने बॉल काढला आणि मॅगीला म्हणाला, ‘चल मॅगे बॉल खेळु!’

मग त्याने तो बॉल उंच फेकला. मॅगी आनंदात होती. ती पळत पळत बॉलच्या मागे गेली आणि तोंडात बॉल पकडुन परत दादाकडे आली. दादाने परत बॉल लांब फेकला.

मॅगी मनात म्हणाली, ‘नको ना दादा बॉल लांब फेकुस, पळवत नाही रे मला आत्ता, वय झालं बघ’, पण तरीही दादाला वाईट नको वाटायला म्हणुन तितक्याच जोशात ती पळत जाउन बॉल घेउन आली.

दादाने यावेळेस बॉल खुपच लांब फेकला. मॅगी, बॉलच्या मागे मागे बऱयाच वेळे पळत गेली. तिने बॉल पकडला आणि माघारी वळाली. बघते तर काय, दादा गाडीत बसुन निघाला होता. मॅगीला वाटले हा पण काहीतरी खेळच आहे म्हणुन ति परत बॉल घेउन गाडीच्या मागे पळत सुटली. दादाने गाडीचा वेग वाढवला. मॅगिला धाप लागली होती. तिने बॉल टाकुन दिला आणि ‘दादा थांब, दादा थांब करत ओरडत गाडीच्या मागे पळत सुटली’. पण तिचा दादा थांबलाच नाही. धुरळा उडवत त्याची गाडी दुरवर निघुन गेली.

डोळे भरुन मॅगी त्या धुरळ्याकडे बघत बसली. “काय झालं? काय केले मी की मला ही शिक्षा दिली? खरंच दादा मी काही नाही केले, माझा त्रास होत असेल तर तसे सांग समजावुन मी बंगल्याच्या मागे झोपुन राहीन, तुला, तुझ्या बाळाला, ताईला कुणालाही माझा त्रास होणार नाही, पण अशी शिक्षा नको देउस रे, असा मला एकटीला टाकुन नको ना सोडुन जाउस.. खरं सांग दादा, काय चुकलं माझं?”

वाहत्या रहदारीच्या रस्त्यावर मॅगीचा पळण्याअचा वेग कमी कमी होत गेला आणि शेवटी अशक्य झाले म्हणुन ती एका जागी थांबली. पळल्यामुळे खुपच दम लागला होता, तोंड सताड उघडुन जिभ बाहेर काढुनही श्वास पुरत नव्हता. दादाची गाडी दिसेनाशी झाली होती. समोरुन एक अवजड वाहन वेगाने मॅगीच्या दिशेने येत होते. पण मॅगीला बाजुला व्हायला त्राणच नव्हते, शारीरीक आणी मानसीकही. मॅगीने घट्ट डोळे मिटुन घेतले, लहानपणापासुन दादाबरोबर घालवलेले क्षण मनात एकामागोमाग एक पलटत गेले. मॅगी त्या अतीव सुखात आकंठ बुडुन गेली, इतकी की अवजड वाहन अंगावरुन गेल्यावरही तिला कसल्याच वेदना जाणवल्या नाहीत.

Advertisements

25 thoughts on “दादा, काय चुकलं माझं?

 1. अनिकेत काय हृदयस्पर्शी लिहील आहेस रे!!
  मला स्वत:ला खर तर कुत्रा पाळणे अजिबात आवडत नाही ………..पण मॅगीचे दु:ख मनाला भिडले अगदी………..

  बाकी तुझे लिखाण मस्त……….पुर्ण लेखात एकदाही पकड सुटली नाही….

 2. मस्तचं. अंगावर काटा आला वाचुन. खुप्पच छान लिहीले आहेस

 3. शब्द नाहीत रे मित्रा माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी … 🙂 असाच लिहित रहा आणि भुंगा सोडत जा … 🙂 शुभेच्छा … !

 4. मस्त जमलाय..

 5. भावना विव्हळ व्हायला आलं मला.

 6. Touching. hach to farak manas aani janawaramadhala. dolyat paani aal.

 7. BEST mitra……छान eakdam छान aavadle mala ..

 8. Aniket,
  ekdam chan lihale ahes. aangawar kata yeto vachatana.
  keep it up.

 9. माझ्या कडे एक देशी कुत्रा पाळलेला होता.मी ९ वर्षाचा असतांना त्याला रस्त्यावरुन उचलुन आणलं होतं. अगदी म्हातारा होईपर्यंत होता घरी. आमच्या हॉलमधे एक पाळणा होता (६- ३ फुट साइझचा) . दिवसभर त्या पाळण्याखाली बसुन रहायचा. शेवटी त्याला कॅटरॅक्ट झाला, आणि एक दिवस काय दुर्बुध्दी सुचली तर रस्त्यावर गेला आणि गाडीचा धक्का लागुन गेला. माझ्या घरी २४ वर्ष होता मोती.. आणि तितकेच दिवस एक पोपट पण होता. दोघंही एका पाठोपाठंच गेले.
  पोपटाला तर पिंजऱ्याची इतकी सवय झालेली होती की अगदी दार जरी उघडं टाकलं तरी तो बाहेर येत नसे. पण नंतर मात्र एकही प्राणी पाळला नाही..

 10. Sundar lihile ahes

 11. अप्रतीम…
  आमच्या “चींटू” ची आठवण झाली एकदम..पाळीव प्राणी म्हणजे घरात् एक् सदस्य आणल्या सारखेच् असते..

 12. Very touching indeed…

 13. मी ही अत्यंत आवडीनं दोन दोन कुत्रे पाळले होते..

  त्यांचं अत्यंत निरपेक्ष प्रेम, चाटणं, वाट पाहून रडणं, बाळंतपणं, आजार, मृत्यु सगळं पार्ट ऑफ़ द पार्सल..

  एक डॉबरमॅन कुत्री तर कैंसर ने झिजून झिजून मेली..दोन तीन वर्षं..मर्सी किलिंग चं ही धाडस होत नाही..

  मुळात “दादा” त्यांना घेऊन येतो फ़क्त..

  आणि बहुतेक वेळेला एक दोन वर्षांतच त्यांचं सर्व खाणं पिणं, शी शू, फ़िरवणं हे “दादाच्या आई” वर येऊन पडतं..

  दादा बहुधा शिकायला बिकायला दूर निघून जातो..

  ..आणि घरातल्या कुत्र्यामुळे आई मात्र एक दिवसही ब्रेक घेऊ शकत नाही..

  फ्लैट मधे तर कुत्र्याचे हाल कुत्रं खात नाही..

  खूप प्रेम आणि आनंद देतात कुत्री..पण एकून बेरीज दु:ख आणि त्रासाचीच होते..

  प्राणी पाळणं हेच मुळातून चुकीचं आहे..

 14. sahi re. asach lihit ja…

 15. mala kutra palane prakar avadat nahi pan he pharch touchy ahe

 16. Chaan lihiles mitra. Mala pan kutryanchi far avad pan bhiti vatate mhanun kadhi palale nahi.

  Majhya eka mitrane ek kutri anali hoti. Survatila sarva kahi thik hota. kahi kalane ti durlakshit zhali. shi shu sathi ordat rahayachi pan konakade vel nasayacha tichyakade baghayala. mazhi mulgi sarkhi tila baghanyasathi jayachi.

  Atta kahi diwasa purvi bhetla hota tevha muline vicharle bhu bhu kuthe aahe. Sahebani uttar dile “geli dhagat”. Tondat ek shivi ali hoti pan mulgi barobar aslyane deta ali nahi.

 17. khup chatka lagala vachun. amacha jacky 14 varshancha houn gela, mi dho dho radle hote…jivala ghor lavun jatat he prani

 18. jst osm!
  wachun kharach khup chhan watale

 19. emotional.. khup heart touching.. amhala pan asech vatate manjaranchya pilla dusarya kunala detana…

 20. सहीच…..एकदम मस्त जमलाय लेख…अप्रतिम ..मॅगीचे दुख मनावर खोलवर आघात करून गेले. जिंकलास मित्रा..

  🙂 🙂 🙂

 21. 😦 heart touching story..!! I am so glad I got to know great writer..!! All the best n keep writing..!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s