पुतळ्याचे वस्त्रहरण


‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये’ असे म्हणतात तसेच ‘शहाण्याने बायकोबरोबर तिच्या शॉपींगसाठीही जाऊ नये’ असे म्हणायला खरंतर काही हरकत नसावी. नुकताच घडलेला एक ऑकवर्ड किस्सा सांगतोय. अर्थात हा लेख लिहीताना आचरटपणा, आंबट-शौकीनपणाचा भाव नसुन केवळ एक अनुभव नमुद करणे हाच आहे. कुणाला यात काही गैर वाटत असल्यास मी ‘तहे दिल से’ क्षमा मागतो.

तर, एकदा बायकोच्या शॉपींगसाठी तिच्याबरोबर मी आणि आमचं व्रात्य कार्ट बाहेर पडलो. दुकानामागुन दुकान पालथी घातली, पण एकाठीकाणी पसंद पडेल तर नवलं!!. देवळात माणुस काय करतो? आत जातो, घंटा वाजवतो, नमस्कार करतो आणि बाहेर पडतो. अगद्दी तस्संच. दुकानात जायचे, बाहेर लावलेल्या कपड्यांना हात लावुन बघायचा, जो पर्यंत आतला दुकानदार बाहेर ‘काय हवंय?’ विचारायला येतोय, तोपर्यंत मोर्चा नेक्स्ट दुकान. पुण्यातले दुकानदार तर मेले लवकर बाहेरही येत नाहीत.

तर असं मजल दर मजल करत शेवटी एका दुकानाचे भाग्य उजळले आणि आम्ही आत गेलो. कपड्याच्या राशीवर राशी निघाल्या पण पसंद काही पडेना. शेवटी बाहेर पडणार तेवढ्यात बाहेरच्या एका पुतळ्यावर घातलेला एक टॉप भावला. दुकानाच्या स्टॉक मध्ये तस्साच, त्याच रंगाचा दुसरा नसल्याने, त्या सेल्स-गर्ल ने तो पुतळा आत आणला, त्याचा टॉप काढला आणि बायको तो टॉप घेउन ट्रायल-रुम मध्ये गेली.

बाहेर राहीलो मी, माझं पोरगं आणि ती सेल्स गर्ल. थोड्यावेळाने पोरगं हसायला लागलं. म्हणलं ‘काय झाले रे?’, तर म्हणे, ‘बाबा, ते बघ नंगु!!’ मी मागे बघीतलं तर तिथे टॉपलेस पुतळा. म्हणजे इतक्यावेळ तो समोरच होता, पण मी काही एवढे लक्ष दिले नव्हते. आता तो म्हणाल्यावर माझी आणि त्या सेल्सगर्ल ची नजर एकदम त्या पुतळ्यावर पडली. तिने माझ्याकडे आणि मी तिच्याकडे बघीतले. फार ऑकवर्ड क्षण होता तो. मला हसु आवरले नाही म्हणुन मी दुसरीकडे बघीतले. तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणुन मी मागे बघीतले, तर त्या सेल्स-गर्ल ने एक फडके त्या पुतळ्यावर फेकण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता. यावेळेला मात्र मी हसु आवरु शकलो नाही. शेवटी मी मुलाला घेउन बाहेर पडलो.

मग परत काही माझा आत जाण्याचा धिर झाला नाही, बाहेरुनच बायकोकडे पैसे दिले आणि तिथुन सटकलो. पुतळ्याच्या विटंबना झाल्याच्या अनेक बातम्या वाचतो, पुतळ्याचे वस्त्रहरण झाल्याची ही बातमी पहीलीच असेल नाही?

13 thoughts on “पुतळ्याचे वस्त्रहरण

 1. प्रिती

  हा हा हा..हि ही ही.. हु हु हु
  ओजसला असल्या गोष्टी शिकवणारा तुच असणार! बर.. कधी भेटतो आहेस सांग

 2. त्या अक्षयकुमारसारखं कुणीतरी केस करेल बर का असला अश्लील मजकूर सार्वजनीक जागेत दिल्याबद्द्ल 😛 😛

  1. अनिकेत

   काय रे.. अश्लील काय आहे त्यात? मी कुठलाही शब्द वापरला नाही, कुठलेही चित्र टाकले नाही काहीच नाही मग? आणि मी पुतळा स्त्री का पुरुषाचा असाही उल्लेख केलेला नाही. अश्लीलता तुझ्याच डोक्यात आहे बहुतेक 🙂

   तसा मी हुशार आहे थोडा :-p

 3. अरे पण तुज़्या बायकोने तर स्त्री पुतळ्याचेच कपडे ट्राय केली असतील ना…

  1. अनिकेत

   हे बघ, असं असु शकतं ना की तिथे एक पुरुष पुतळा होता, ज्याचा शर्ट माझ्यासाठी आवडला म्हणुन काढुन घेतला नंतर ती तिचा ड्रेस घेउन ट्रायल रुम मध्ये गेली. मी असं कुठे म्हणले आहे की तोच पुतळ्यावरचा ड्रेस घेउन घालुन बघायला गेली. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s