मी, मानसीक रुग्ण!!?


काही दिवसांपुर्वीच ‘हेल्थ चेक-अप’ करुन घेतले. बाकी सर्व गोष्टी ठिक-ठाक आल्या, म्हणजे तश्या बॉर्डरच्या बाहेरच आहेत, पण ठिक होत्या. डॉक्टरशी बोलताना मी मला होत असलेल्या काही विचीत्र त्रासाबद्दल बोललो. अर्थात महाजालावर याबद्दल मी शोधाशोध करुन याचे ‘कारण’ शोधले होतेच पण तरी म्हणलं एकदा बोलुन घ्यावे.

डॉक म्हणाला, “काय काय होतेय तुला?”

मी: “म्हणजे बघा, असं नक्की नाही सांगता येणार, पण सारखी कसली तरी भीती वाटत रहाते, जरा कुठे जोरात खुट्ट आवाज आला की दचकायला होते, ह्रुदय खुप जोरात धडधडत आहे किंवा मध्येच एखादा हार्ट-बिट मिस्स झाला असे वाटते. सारखे मला काहीतरी भयानक झाले आहे आणी लवकरच मी गचकणार ही भावना मनात बसली आहे. छातीत बारीक बारीक दुखणे, सतत गोड खायची इच्छा होणे, दिवसभर कधी अती उत्साह किंवा अती कंटाळा येतो. खुप गर्दीच्या ठिकाणी, सिग्नलला गुदमरल्यासारखे होते. एखादी गोष्ट करताना ती अशीच नाही केली तर वेगळे काही तरी होईल म्हणुन तीच गोष्ट तश्शीच करत रहायची, ‘डेजा वु’ अर्थात एखादी गोष्ट घडत असताना ‘हे आपण कधीतरी पाहीले आहे’ असे वाटते, एकटेपणा ही नको वाटतो आणी गर्दीही, लॅक ऑफ कॉन्फीडन्स, नैराश्य, डिप्रेशन सगळे काही एकत्र आहे बघा.

कधी कधी तर असं वाटते की आपल्या भोवतालचे जग हळु हळु फिरत आहे, किंवा उभे राहील्यावर समोरची जमीन वर खाली होतं आहे.”

डॉक: “खरं सांगु का? तुम्हाला काहीही झालेले नाहीये, तुमचे सगळे रिपोर्ट्स ठिक आहेत”

मी: “पण मग मला हे सगळे होते आहे ते..?”

डॉक: “त्याला ऍन्क्झ्यायटी (Anxiety) म्हणतात. हा एक मानसीक आजार आहे!”

मी: “मानसीक आजार??, म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की मी एक मानसीक रुग्ण आहे?”

डॉक: “म्हणले तर हो, म्हणले तर नाही :-)”

मी: “पण कारण काय? कशामुळे जडला मला हा आजार, कित्ती त्रास होतो याचा! लोकांना सांगीतले तर सगळे हसतात, असे कधी काय होते का म्हणे, २-४ दिवस बाहेर जाउन ये, बरं वाटेल म्हणतात!”

डॉक: “..एक सांगा, तुम्ही आय.टी. मध्ये काम करता का?”

मी: “हो ss..पण…..”

डॉक: “काही गोळ्या लिहुन देतो त्या घ्या.. अधुनमधुन घ्या, पण त्याच्या आहारी जाउ नका. गोळ्या घेतल्यावर ‘फारच’ छान वाटेल तुम्हाला. पण त्याचा अती वापर धोकादायक आहे. तिन महिन्यांनी भेटु आपण..या आता…!!”

15 thoughts on “मी, मानसीक रुग्ण!!?”

 1. Aniket

  I read all your posts… Your writing is light and crisp. Liked your blog and now I am a daily visitor to see if theres anything new :-)… keep up the good work…besties!!

  1. धन्यवाद रोहीणी, खुप छान वाटते अश्या कमेंट्स वाचायला

 2. या रोगावर एकच उपाय.. पोलिस ऍकेडमी चे सगळे सातही भाग पहा. किंवा सोबतंच क्लिंट इस्टवुडचे सगळे चित्रपट पहा. एकदम फ्रेश होऊन जाल ..! .

  1. 🙂 खरं आहे, तेच करत असतो आधुन मधुन, पण ते तात्पुरते cure होते

 3. खुप गंभीर विषयाला हात घातलात तुम्ही मान्यवर !!
  या वयात असे त्रास होणे हे थोडे चिंताजनक वाटते मला. तुझेच नाही तर मी माझे पण सांगतो. आपल्या पीढीचा हा एक मोठ धोका मला जाणवू लागलाय. हे आय. टि. मधलं करीअर, हा ताण, हा बिघडलेला समतोल वगैरे गोष्टी खुप हानी करत आहेत असे मला वाटू लागले आहे. आणि आताच्या रिसेशनच्या काळात तर चांगले निरोगी लोकही मानसिक आजारांचे शिकार होऊ लागले आहेत.
  एकदा पुर्ण lifestyle चेच परखड परिक्षण करण्याची वेळ मला वाटते येवून ठेपलेली आहे.
  तु खुपच प्रांजळ आणि निर्मळ मनाचा असल्याने तू मोकळेपणाने हे कबूल केलेस व इथे लिहिलेसही. माझ्यासारखे हजारो असे आहेत की ज्यांना याची जाणिवही नाही आणि ते proactively medication ही घेत नाहीत.
  एखादा मोठा झटका बसला कि मग आमचे डॊळे उघडतील. प्रश्न असा की तोपर्यंत आम्ही वाट बघत बसणार का?
  त्या ’Theory of Constraint’ नुसार प्रत्येकाची काहीतरी मजबूरी असावी की तो इतका जीवाला त्रास करून घेऊन ऊर फाटेस्तोवर धावतो आहे.
  आणि या ruthless professional life मध्ये आपल्यासारख्या sensitive लोकांना जास्त त्रास होतो. तुझे मला माहीत नाही पण मी माझे पाहिलेय की MNC politics ला तोंड देऊ शकलॊ नाही कि मी खुप frustation मध्ये जातो. संस्कार असतील किंवा स्वभाव असेल तो की ज्यामुळे एक ठरवीक लेवेलच्या खाली जाउन मी confront करू शकत नाहि. My dignified nature & stature becomes my weakness 😦
  However हे आत जमा होत असलेले आणि साचून राहीलेले भले-बुरे अनुभव ’मानसिक आजारांना’ कारणीभूत ठरत असावेत.

  1. खरं सांगायचे तर माझ्याबाबतीत कामाच्या ताणापेक्षा अपेक्षांचे ओझे जास्ती झाले आहे आणि आता मीच दर वेळेस मागच्यापेक्षा जास्ती चांगले करावे म्हणुन झपाटुन जातो. मीच माझ्याशी तुलना करु लागतो, and i guess this is hearting me more.

 4. वीक्रांत्..तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण आपण जर अजुन खोलात जाउन विचार केला तर आपल्याला जाणवेल की या सगळ्याला आपणच जवाबदार आहोत. मला सांगा आय.टी. ले असे किती लोक दररोज व्यायामावर भार देतात? रोज आपण त्या कॉपूटर रुपी राक्षसा समोर नुसते बसुन असतो..शारिरीक हालचाल शुन्य..मग आपणच हे सगळे रोग आपल्यावर ओढउन घेत आहोत ना?..

  1. दुसरा पर्याय आहे का? व्यायाम करा ठिक आहे, पण वेळ खरंच नाही मिळत तेवढा. संध्याकाळ घरी जायला किती वाजतील कुणाला ठाउक असते का?. रात्रीचा सिनेमा, क्रिकेट मॅच, फॅमीली टाईम मुळे झोपायला उशीर, मग सकाळि उठायला उशीर. मग लवकर झोपणे हा पर्याय, पण मग स्वतःसाठी काहीच एंटरटेंमेंट नको का? दिवस भर बैलाला जुंपल्यासारखे काम केल्यानंतर रिलॅक्सेशन हवेच की. आणि हाच कंम्य्पुटर्रुपी राक्षस आमच्या पोटाची आग विझवतो, घरदार चालवतो त्याला मुर्ख कसे म्हणता येइल. हौस म्हणुन आपण त्याच्यासमोर तर बसत नाही ना?

 5. well, I think recession is partly to blame. I am software programmer too. 30 mins of cardio and meeting new people(not from same profession:) at the gym helps me get over anxiety or depression. It might not be the case with everone but I guess it could be a good start…certainly better than getting hooked to medication!!

  1. Exercise is solution for everything, and i also do that, but yes i guess meeting new people especially other than the same field sounds interesting. i am really desperate to chat / talk with people other than IT, that is the very idea i started with the blog as well, but seeing them personally will seems to do good, i will try it out, thanks

 6. @प्रसाद – Well Said. व्यायाम हा हवाच. पण मनाला जी मरगळ येते ना आणि त्यामुळे जे problems ते दूर करायला special efforts हवेत.

  @All – ध्यान, प्राणायम हा उपाय ठरू शकेल का??

 7. Nice article… should be read and understood by IT walas… 🙂
  This sounds like “dabbaWalas” isnt it?

  Well but one works with peace of mind and other one keep searching for 😀

 8. yoga best option aahe diwasbhar tensfree & helthy rahayla…thoda wel tari swatahasathi dyayalach hawa tarach apan fresh mind ne work karu sakto….aarogya hich sampada manun health japa.

  thumi aajari padlat tar roj roj thumchi chan chan artical kasi wachayala kasi bhettil mala…thymule tabbetila japa

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s