आज ३/६/९


काय करु? कसं करु? सकाळ पासुन जिव नुसता कासाविस होत आहे. काल रात्रीपासुन डोळ्याला डोळा नाही. काय होणार? कार्यालयात तर आलो आहे, पण कामात लक्षच लागत नाहीये. सारखं आपलं महाजालावर शोधाशोध करतो आहे, कुठे काही ‘ब्रेकींग न्युज’ दिसते का ते? पण काहीच सापडत नाहीये. गुगल चा परफॉर्मंन्स कमी झालाय, का त्याच्यावर ही काही कुणी चेटुक, काळी जादु केली आहे कळेनासे झाले आहे.

कशाबद्दल बोलत आहे? बास्स का राव, ‘क्वेस्ट ऑफ मिलेनीयम’ आहे आज, आजची तारीख विसरलात? ३/६/९, आज ९ वाजता काहीतरी घडणार आहे? शास्त्रींच्या घरी. क्षीप्राचे बाबा पण त्यांना कसलीतरी चाहुल लागली म्हणुन वाड्यावर पोहोचले आहेत. बरोब्बर ९ वाजता आज तुळशी वृंदावनाची सावली जिथे पडते तिथे काहीतरी सापडणार, अगदी ‘मॅकेनाझ गोल्ड’ सिनेमासारखे. मी पण आज सकाळी ९ वाजता घरापाशीच्या तुळशी वृंदावनापाशी खोदकाम करुन पाहीले, काहीच सापडले नाही हो. अशी उडती खबर ऐकली की मुळशी-ताम्हीणी परीसरातही बऱ्याच लोकांनी घराच्या मागे खणुन बघीतले, पण नशीब कुणाच्याच पथ्यावर नाही असे दिसत आहे.

असो, एअरटेल-भारती, आयडीया, व्होडाफोन या मोबाईल सर्व्हीस प्रोव्हायडर्स ने त्यांच्या स.म.स. (SMS) देवाणघेवणात ४०% ने वाढ झाल्याचे सांगीतले तर बि.एस.एन.एल चे नेटवर्क जॅम झाल्याचे ऐकले. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा काय होणार आज ९ वाजता?

विशेष खबरदारी म्हणुन महाराष्ट्र राज्याने केंद्राकडुन राखीव दलाची एक कुमक मागवली आहे. महावितरणाने संध्याकाळी ८.३० ते ९.०० वेळात 0% लोडशेडींग डिक्लेअर केले आहे. रात्रीच्या सर्व शिफ्ट्स आज एक तास उशीराने सुरु होतील असे एम.आय.डी.सी ने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले. रिक्षा, बसेस चे कामकाज काहीकाळासाठी बंद राहील. टि.व्ही. च्या शोरुम्स ने आज सर्व टिव्ही चालु ठेवुन त्यावर ‘असंभव’ मालीका चालु ठेवावी अशी मागणी कागद, काच, कचरा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे, जेणेकरुन या लोकांना रस्त्यावरुनच या दशकातील थरारक घटनेचा साक्षीदार होता येईल.

चला तर मंडळी, पहायला विसरु नका आज ८.३० वाजता झी.टी.व्ही. मराठीवर असंभवचा सनसनाटी भाग. ३/६/९- बरोब्बर ९ वाजता काहीतरी घडणारssssss

Advertisements

5 thoughts on “आज ३/६/९”

 1. अनिकेत हे जे उद्योग आपण चालवलेत ना ते सुलेखाला(ईंदूमती) कळतात बरं का….माझ्या कुचकट पोस्ट्मुळे ती अशी काही रागावली की मला गेल्या आठवड्यात असंभव पहाताच आले नाही…..गेले दोन वर्षे हा उपद्रव सहन केला आणि धिंडीचे काय झाले तेच पहाता न आल्याचा दोष तुझाच असे नवरा म्हणाला……
  आता आज काय घडणार आहे ते पाहून ठेव म्हणजे मला तुझ्याकडून अपडेट घेता येइल…आणी जरा जपुन रे बाबा….ती त्या मुर्तीसमोर बसून बंद डोळे फिरवत फिरवत ब्लॉग्स पण वाचते म्हणे……….

  1. १००% कळतात. मागे माझा असंभव बद्दल एक लेख पेपरमध्ये प्रकाशीत झाला होता. पुण्यातील एका महीला मंडळाच्या सदस्यांना तो फारच आवडला आणि त्यांच्या प्रमुखांनी मला आवर्जुन फोन करुन कळवले होते. पुढे एकदा त्यांच्या एका कार्यक्रमाला सुलेखा पुण्याला आली होती तेंव्हा त्यांनी तो लेख तिला दाखवला होता. मला पण त्या कार्यक्रमाला बोलावले होते. म्हणलो नको बाबा सुलेखा तिथे असताना मी नाही येत.

   दुसरी गोष्ट म्हणजे ती शुभ्रा (उर्मीला कानेटकर) बायकोची लांबची नातलग. माझा लेख प्रसिध्द झाल्यावर उर्मीलाच्या मामीने मला फोन केला होता, “का रे म्हणे असे उलट-सुलट छापतोस, आपली उर्मीला काम करते ना त्याच्या मध्ये :-)” म्हणलं सॉरी काकु, मला माहीत नव्हते 🙂

 2. तुम्ही दोघं मिळून मला अपडेट द्या ना फ़ायनली तिला पकडून गुन्हा कबूल करुन घेतला की. मी मंदीमुळे ऑनलाईन झी मराठीची मेंबरशीप बंद केलीय त्यामुळे इथे शांतता आहे. तुमच्यासाठी एक अपडेट आहे…आता ती सुलेखा इथे जुलैमध्ये मराठी मंडळाच्या अधिवेशनाला येईल ना तेव्हा ती तिथे गायब होईल आणि कदाचित हरवलेला विक्रांत प्रगट होईल. 😀

 3. काही झालं का मग 03/06/09 ला? meeting साठी बाहेर असल्याने माझा तो भाग बुडवला आणि repeat telecast कन्येनी घालवला 🙂

  1. हो झालं ना. एक मोठ्ठी किल्ली सापडली. आता कुलुप शोधायचे आहे खजीन्याचे त्याचा भाग दिनांक ४/८/२०१२ ला प्रक्षेपीत होणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s