रेड वाईन ची फजितीअमेरीकेतील वास्तवात ‘रेड वाईन’ आणि ‘शॅम्पेन’ चा स्वाद चाखल्यानंतर त्याचा आनंद घरच्यांना सुध्दा द्यावा म्हणुन एकदा ‘चेंताली’ नामक एका नावाजलेल्या रेड वाईनची खरेदी केली.

दुकानात बायकोने ती बाटली उलटी-पालटी करुन ‘ही उघडायची कशी?’ असा एक स्वतःचे अज्ञान दाखवणारा प्रश्न केला.
मी ही लगेच चेहऱ्यावर कुत्सीत भाव आणुन: ‘त्याला वेगळा ओपनर लागतो हा, वेगळा स्क्रु-ड्रायवर सारखा प्रकार असतो तो’
बायको: “हो काss!! पण कुठे मिळतो तो? आपल्याकडे तर नाहीये ना!”

अर्थात तो कुठे मिळेल याची मला पण खात्री नव्हती पण तेवढ्यात त्या दुकानदारानेच सांगीतले, “समोरच कस्टमचे दुकान आहे तिथे मिळेल!”

मग समोरच्या दुकानात जाउन १०० रुपये मोजुन रितसर ओपनरची खरेदी केली.घरी आल्यानंतर सगळ्यांनी बाटली पुढुन मागुन बघीतली. आईने ..”ईsss, वाईन म्हणजे दारुच की.. मला नको बाई म्हणुन अंग झटकण्याचा प्रयत्न केला” तर मी लगेच “ह्यात अल्कोहोल नसते, पिली तरी चालते, उलट रेड वाईन आरोग्याला चांगली असते असं म्हणतात.. मी ‘नापा व्हॅली मध्ये ना..'”

बायकोने..”बास.. नको तुझं अमेरीका पुराण म्हणुन मला गप्प बसवलं”

मग आम्ही ठेवणीतले, गिफ्ट मिळालेले वाईनचे ग्लास काढले आणि बाटली उघडायला बसलो. पण नक्की कशी उघडायची याची कुणालाच कल्पना नव्हती त्यामुळे थोडाफार प्रयत्न करुन काही जमले नाही. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली, लगेच महाजालावर बसलो आणि यु-ट्युब साईटवर वाईनची बाटली कशी उघडावी याचे काही व्हिडीओ पाहीले. तस्सेच काही लोकांचे याविषयावरचे ब्लॉग वाचले आणि परत तयारीला लागलो.

पण छे.. जसे दाखवले होते तसे काहीच होत नव्हते. प्रयत्न करुन एक तास झाला तरी ओपनरचे टोक त्या बुचामध्ये थोडेफार सोडले तर काहीच घुसले नव्हते. माझ्यानंतर बायकोनेही प्रयत्न करुन पाहीला पण नाहीच. मग परत महाजाल, यु-ट्युब.. यावेळी जरा सावधानतेने व्हिडीओ पाहीले मागे पुढे करुन नीट समजावुन घेतले आणि परत प्रयत्न चालु केले.

बायकोने मध्येच विचारले, “आपण त्या दुकान दाराकडुनच आणायची का उघडुन? त्यांना येत असेल की!”
मी: “काही तरी काय? अशी बाहेरुन उघडुन आणायची का गाडीवरुन? आणि तु काय त्यावर ओढणी टाकुन ठेवणार का घरी येईपर्यंत धुळ जाउ नये म्हणुन. आपण प्रयत्न करु, काहीतरी थोडेसेच चुकत असेल उघडेल”

आता मला खरं तर राग यायला लागला होता, घरातले बाकीचे पण कंटाळले होते, आईने तर जाउ देत, उद्या बघुयात, मी जेवायला घेते म्हणुन उठण्याची तयारी केली होती. शेवटी एकदाच प्रयत्न करु नाही तर बघु उद्या म्हणुन मी परत ताबा माझ्याकडे घेतला आणि जोरात तो स्क्रु-ड्रायव्हर आत खुपसला आणि चक्क तो बराचसा त्या बुचाच्या आत मध्ये गेला. माझ्या चेहऱ्यावर एक विजयी लकेर उमटली. चला अर्धे काम फत्ते. आता फक्त, हळु हळु तो ओपनर गोल फिरवत बाहेर ओढायचा आणि बुच निघालेच म्हणुन समजा. पण माझ्या बाबतीत कुठली ही गोष्ट सहजा सहजी होईल तर शप्पथ.

बाहेर ओढताना तो स्क्रु-ड्रायव्हरच तुटला. त्याचे मेटलचे अर्थे टोक त्या बुचात आणि बाकीचा बाहेर. “आता झाली का पंचाईत?”म्हणजे दुसरा स्क्रु-ड्रायवरही आत जाणार नाही. उघडायचे कसे? मग दुसरा उपाय म्हणुन ते बुच थोडे थोडे कुरतडुन काढायचे, तुटलेले टोक दिसले की ते बाहेर काढायचे आणि मग दुसरा ओपनर आणुन बुच उघडायचे असे ठरले. पण ते बुच कुरतडणे अपेक्षेपेक्षा त्रासाचे ठरले. त्याला फारच वेळ लागायला लागला. एव्हाना बुच-उघडणे या प्रक्रीयेला दोन तासाहुन जास्ती कालावधी उलटुन गेला होता.

माझ्या सहनशक्तीचा हा अंत होता. शेवटी मी आपला नेहमीचा स्क्रु-ड्रायव्हर घेतला, तो त्या बुचात खुपसला आणि देला एक दणका आणि काय सांगावं, गच्चकन ते बुच निघाले आणि बाटलीतल्या वाईन मध्ये जाउन पडले. त्या प्रेशरने काठोकाठ भरलेली वाईन उंच उडाली, आजुबाजुच्या भिंतीवर सगळीकडे त्या महागड्या वाईनचे शिंतोडे उडाले. पण त्याची चिंता मला नव्हती. मला चिंता होती ती आत मध्ये पडलेल्या बुचाची. तसेच ते बुच अर्धवट कुरतडलेले असल्याने त्याचे लाकडाचे तुकडे वाईनमध्ये तरंगत होते, ते काढणं महत्वाचे होते.

मी जोरात ओरडलो..”ओता वाइन ओता कशात तरी पटकन!”
“अरे पण कश्यात?, ग्लास लहान आहेत केवढे, सगळी वाईन त्यात थोडीना बसणार”, इती बायको
“आण काही तरी पटकन”.. मी
बायकोने स्वयंपाकघरातुन एक पातेले आणुन माझ्या हातात दिले.. “घे ओत याच्यात!”
“याच्यात? एवढी महागडी वाईन.. पातेल्यात? काही स्टाईल वगैरे नको का? पातेल्यात काय?” मी.
“मग बस.. लाकडाचे तुकडे खात, दुसरे काही नाहीये वाईन ओतायला”, बायको

माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने मी ती वाईन एका साध्या फडतुस स्टेनलेस स्टिलच्या पातेल्यात ओतली. मग त्यातुन ते बुचाचे कुरतडलेले तुकडे बाहेर काढले आणि शेवटी अगदी आपण दुध ओततो त्याप्रमाणे पातेल्यातुन ग्लासमध्ये ओतुन वाइन प्यायलो. विचार केला होता, मस्त टेरेस मध्ये बसुन बाटलीमध्युन ओतत हळु हळु वाईन प्यावी.. काय विचार केला होता आणि काय घडले.

Advertisements

18 thoughts on “रेड वाईन ची फजिती

 1. Damn !

  you just messed that wine dude !

  Better luck next time !

  By da way da wine in that pot looks like KOKAM Juce !!!

  hahahaha !!! Just Kidding !

  1. I know yaar..आणि ती मनाला लागलेली टोचणी कध्धीच जाणार नाही बघ.. कोकम ज्युस ची उपमा मस्त आहे 🙂

 2. अनिकेत मजा आली वाचतांना…शेवटचा तो फोटो म्हणजे आहाहा…..खरच कोकम सरबत दिसतय ते……

 3. haha heheeheee bichara….Jau de, pan tyana wine tari avadali ki nahi? photo pahun agadi plan cha kachra jhala he kalatay..better luck next time.

  Btw, lihinyachi style mast aahe, avadali.

  -Vidya.

 4. arre aamachi pan ashi gammat jhali hoti wine chi batali ughadatana. ani height mhanaje ti nusati show chi batali hoti .. aatamashye chocolates bharaleli … tarihi sagali milun ardha taas batali ughadat hoto !!!

 5. मस्त आहे. पण ते बुचाचे तुकडे गाळायला चहाची गाळणी वापरली कां? की कपड्याने ( रुमालाने) गाळली? म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही चक्क दारु ’गाळुन’ मग प्यायली ! शब्दशः अर्थ घेतला तरिही चालेल. 🙂

 6. mhanoon deshantargat utpadit mady uttam…Mu.po. Baramati yethil..

  Kutir udyogaas chalana.. Rojgaarnirmiti..

  Glycodene saarakhe partyaache firkiche jhakan…no opener required. User friendly..

  Turn this way to open…

  Ani fulpaatratoon pyalat tari quality tee ch..

 7. Better luck next time…
  One suggestion, ask wine seller to open the bottle (I always do as I don’t have opener), they open half cork so u can open it by hands at home.

 8. हा हा हा… काय मजेशीर किस्सा आहे रे! ह. ह. पु. वा.
  सह्ही आहे अनुभव… आमच्याकडेही ओपनर नव्हता तेव्हा असेच ते बुच आत ढकलले आणि नंतर ते तुकडे ग्लासात जावू नये म्हणून गाळनीने वाईन ग्लासात ओतली… अगदी चहा ओततो तशी!

  -अनामिक
  http://anaamik.blogspot.com

 9. photo mast kadhala ahe. ewadhe karun bayako la aawadali ki nahi he tu lihalech nahis. sgala plan flop zala he kalatach ahe. lihanyachi style khup aawadali

  1. हो आवडली ना!, पण घरी आई-बाबांसमोर कसे म्हणणार म्हणुन तोंड वेडी-वाकडी करत घेतली होती 🙂

 10. ardha bhag goshtti cha mahit hota, dusra ardha bhag iktana jevhadhi maja ali nasti tevhadhi ti patelyatli wine baghun ali, ani dusra hatyar tya buchat khupasnyachya kalpane mage amhi hoto, pan zakan baher kadhnya sathi aat ghalayla nahi…………..

 11. same same kissa mazya babat zaala hota….maaza mehuna PHD Saathi Germanila gela hota… tyne maazya karita shhapian anali hoti………ti kholatana same kissa….. i can’t explain……but…..same this…mustuch…

 12. photo baghun khup hasu aal…wine asishi pili jawu sakte he tumchi post wachalyas samazl..hup mast post aahe khup aavdal…….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s