डावरी


मला डाव्या लोकांबद्दल कमालीचं प्रेम आहे. आपले राजकारणी डावे पक्ष नाहीत हो.. डावे म्हणजे डावरे, डाव्या हाताने लिहीणारे, लेफ्टी!! का कुणास ठाउक पण मला लेफ्टी लोक खुप आवडतात. मग तो डाव्या हाताने सही करणारा ‘सचिन तेंडुलकर’ असो, डाव्या हाताने लिलया आणि ग्रेसफुल फटकेबाजी करणारे ‘सौरभ’, ‘जयसुर्या’ किंवा अगदी अत्ताचा ‘गौतम गंभीर’ असो. इश्टाईल ने समोरच्या खेळाडूची दांडी गुल करणारा ‘वासीम अक्रम’ असो की ‘बिग बी-अमिताभ’. एवढेच कशाला इतीहास घडवणारे अमेरीकेचे सध्याचे अध्यक्ष ‘बराक ओबामा’ सुध्दा डावरेच की.

योगा-योग असा की माझी बायको सुध्दा लेफ्टीच आहे म्हणल्यावर मला कोण आनंद झाला होता. पण संसारात पडल्यावर ह्या डावरेपणाचा इतका त्रास व्हायला लागलाय म्हणुन सांगतो. अगदी साधी गोष्ट घ्या. सकाळी दात घासुन झाल्यावर टुथ पेस्ट तुम्ही कशी ठेवता? बुच पुढे करुन बरोबर? म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त पेस्ट बाहेर काढायची, झाकण उघडुन ब्रश ला लावली की झाले नाही का? पण नाही!! आमच्याकडे उलटे आहे ना. बायको लवकर उठते त्यामुळे पेस्ट वापरणारी नेहमी पहीली तीच. आता ती डावरी म्हणल्यावर ती पेस्ट बरोब्बर उलटी ठेवते. म्हणजे मी आधीच झोपेत असतो, कपाट उघडावे तर पेस्ट उलटी. मग ती सुलटी करा, मग झाकण उघडा असा द्रवीडी प्राणायाम.

कंप्युटर वर बसावे तर माउसची जागा बदललेली, कॉफी घ्यायला हात पुढे करावा तर ती डाव्या हाताने कॉफीचा कप पुढे करते म्हणजे परत उलट सुलट. रस्त्याने जाताना कुणी पत्ता विचारला की ही रस्ता दाखवायला एकदम डावा हात पुढे करते. समोरचा दचकतो ना! तो एक्स्पेक्ट करत असतो उजवा हात, असं एकदम घाबरायला होतं. रस्त्याने, उद्यानातुन हातात हात घालुन चालावं तर परत उलटं, रस्त्याने उलट्याबाजुने चालणार.. काय करावं ह्या डाव्यापणाचं. स्वयंपाक घरात काही घ्यायला जाव तर सगळ्याच्या जागा बदललेल्या. म्हणजे इतक्या वर्षाची सवय मला, एखादी गोष्ट कपाटात उजव्या बाजुला असणार म्हणुन शोधाव तर ती बरोब्बर दुसऱ्या बाजुला सापडते.

पहिल्यांदा खुप त्रास व्हायचा पण नंतर विचार केला, जगातल्या जवळ जवळ सगळ्याच गोष्टी उजवा हात वापरणाऱ्यांच्या सोयीने बनवल्या आहेत म्हणल्यावर लेफ्टी लोकांना दैनंदिन जिवनात नकळत कित्ती अडथळे पार पाडावे लागत असतील. साध्यात साधी गोष्ट घ्या टेलीफोन बुथ. विचार करा आपल्याला उलटा फोन ठेवुन वापरायला दिला तर कित्ती त्रास होईल? मग महाजालावर बसुन शोधा-शोध केली डाव्यांना दैनंदिन जिवनात येणारे अडथळे आणि कित्तीतरी उदाहरण समोर आली.

अर्थात मी तिला किंवा कुठल्याही लेफ्टी ला दोष देत नाहीये, माझे डाव्यांबद्दलचे प्रेम अजुनही तितकेच आहे. माझी ही आपली अश्शीच एक लाडीक, प्रेमळ तक्रार 🙂

Advertisements

7 thoughts on “डावरी”

 1. मला आता निट लक्ष दयायला हवं कारण मला वाटतय की माझी मुलगी सुद्धा डावरी च होणार आहे 🙂 … कारण ती सगळ्या वस्तु डाव्या हातात धरते… अगदी पेंसील सुद्धा…

 2. मी सुद्धा डावरीच आहे. मला तर किती अडचणी येतात…पण विचार कोण करतो आमचा!
  बटाटा सोलायचं सोलाणं असो किंवा कात्री…चोचीचं चहा गाळायचं दांडीचं भांडं असो किंवा मायक्रोवेव्ह चं दार…..सगळं आपलं डिझाईंड फ़ॊर उजवे….
  आम्ही कपड्याचा पिळा अधिक घट्ट पिळायला दिला तर यांच्याने तो उघडणार, स्टिलच्या रॆक मध्ये ताटं उलटी लावायची प्रोव्हिजन, तेलाची किटली उलटी, पेनचे आटे उलटे……….

  मीच त्यातून काहीना काही मार्ग काढून जमवते कसंतरी……

 3. खरच डावखुर्या लोकांना खूप गोष्टीत त्रास होतो. अगदी साध्या साध्या सुद्धा.

  पुण्यात कर्वे रस्त्यावर डावखुर्या लोकांची संघटना आहे. तेथे फ़क्त डावखुर्यांनाच प्रवेश आहे.

 4. हे इतकं सखोल असतं याचा कधी विचारच केला नव्हता.
  बाकी पोस्ट खूप छान जमली आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s