ऍन्टी चेस


कधी ऐकला किंवा खेळला आहात हा खेळ? सध्या कंपनीमध्ये हा गेम शो मी आयोजीत करण्याच्या तयारीत आहे. साखळी सामने, उपांत्य फेऱ्या आणि अंतीम फेरी मध्ये हा गेम खेळला जाणार आहे. तुफान खेळ आहे हा. प्रचंड मज्जा येते खेळताना. या टाईम-पास खेळाबद्दल थोडेस;

 • नावाप्रमाणेच हा खेळ चेस अर्थात बुध्दीबळ खेळाच्या बरोब्बर उलटा आहे.
 • या खेळामध्ये ज्याचे प्यादे / सोंगट्या लवकर संपतील अर्थात लवकर मरतील तो जिंकला
 • या खेळामध्ये तुम्ही खेळताना प्रयत्न करायचा की तुमची सोंगटी मेली पाहीजे ना की दुसऱ्याची सोंगटी मारता आली पाहीजे.
 • तुमच्या कक्षेमध्ये दुसऱ्याची सोंगटी असेल जी मरु शकते, तर तुम्हाला ती मारावीच लागते. तुम्ही दुसरा कुठलाही डाव खेळु शकत नाही. उदा. तुमच्या हत्ती समोर एखाद्याने प्यादे आणुन ठेवले तर ते तुम्हाला मारावेच लागते.
 • राजा हा महत्वाचा ‘नसतो’. राजा मेला तरीही खेळ चालु रहातो
 • चेकमेट नावाचा प्रकार अस्तीवात नाही.
 • सर्व सोंगट्यांचे पुढे जाण्याचे नियम बुध्दिबळासारखेच
 • खुप वेळ होऊनही कुणाच्याच सोंगट्या संपत नसतील तर ज्याच्या सोंगट्या कमी तो जिंकला

ऍंन्टी चेस ला, ‘स्युसाईड चेस’, ‘लुझर्स चेस’, ‘झिरो चेस’, ‘टेक मी’ किंवा ‘किल मी’ अशी ही नावं आहेत. या खेळाला आंतररास्ट्रीय मान्यता आहे. महाजालावर सुध्दा अनेक साईटवर हा खेळ ऑनलाईन खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नेहमीच्या खेळांना कंटाळला असाल आणि घरात कुठेतरी कोपऱ्यात पडलेला बुध्दीबळाचा पट वापरात काढायचा असेल, तर हा खेळ खेळुन बघायला काहीच हरकत नाही. खुप ऍडीक्टिव्ह आहे हा खेळ!!

Advertisements

4 thoughts on “ऍन्टी चेस

 1. चांगला खेळ सुचविलत. हा खेळ खेळून पाहिन म्हणतो.
  बाकी तुमचा ब्लॉग एकदम मस्त आहे. काल रात्री बसून अनेक पोस्ट्स वाचल्या. मजा आली बुवा.

 2. अनिकेत,

  ‘दुसऱ्याची’
  ऐवजी ‘दुसर्‍याची’ किंवा शक्यतो ‘दुसर्‍याची सोंगटी’ (in the point no. 3) असे लिहा.

  1. हा हा हा.. खुप महत्वाचा मुद्दा निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s