माकडाच्या नानाची टांग


हेच ते माकड सुट्टीनिमीत्त माथेरानला गेलो होतो तेंव्हाची गोष्ट. दस्तुर-नाक्यावर गाडी ठेवुन हॉटेलवर पोहोचलो. सगळीकडे माकडांचा सुळसुळाट होता. लाल तोंडाची, काळ्या तोंडाची, किडुक-मिडुक पिल्लांपासुन भल्यामोठ्या हुप्या पर्यंत सर्व थरातील माकड बघुन मज्जा वाटत होती. दिवसभर खुप फिरलो, भरपुर फोटो काढले शॉपींग झाले दिवस मज्जेत गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुल-साईड टेबलवर मस्त ब्रेकफास्ट करत होतो एवढ्यात तिथला एक नोकर धावत आला आणि म्हणाला, “अहो तुमच्या रुम मध्ये माकड शिरली आहेत! बाल्कनीचे तुमचे दार उघडे होते बहुदा, तेथुन ती माकडं आत घुसली!”. त्यातील गांभीर्य लक्षात यायला वेळ लागला आणि मग मात्र आम्ही लगेच पळत वर गेलो. दार उघडले आणि बघतो तर काय २-३ माकडांनी खोलीमध्ये धुडगुस घातला होता. सगळ्या सामानाची उसका-पासक केली होती. वस्तु इकडे तिकडे फेकल्या होत्या, फ्लॉवर पॉट तोडला होता, अथरुण फेकुन दिलि होती. आमच्या मागो-माग दोन-तिन वेटर-नोकर हातात काठ्या घेउन आले आणि त्या माकडांना हुसकावुन लावु लागले. तेवढ्यात मी जोरात ओरडलो- “थांबा..!!”

माझं लक्ष दोन माकडांकडे गेले. एका माकडाने माझा महागडा डिजीटल कॅमेरा धरला होता तर दुसऱ्याच्या हातात कारची किल्ली होती. जर का ही माकडं खोलीतुन बाहेर गेली तर ह्या वस्तु गेल्याच म्हणुन समजा. कॅमेरा तरी ठिक आहे, पण कारची किल्ली गेली तर काय करणार? घरी कसं जाणार? इथे दुर डोंगरावर कारचे दार उघडुन देणारा, डुप्लीकेट किल्ली करुन देणारा कुठुन भेटणार? म्हणजे इथुन परत पुण्याला जा, घरुन दुसरी किल्ली घ्या परत इकडे या आणि मग गाडी घेउन जा.. छे छे!! काहीतरी केलेच पाहीजे पण काय?

जुनी टोपीवाल्याची गोष्ट आठवली, आपण वस्तु फेकली की ते पण फेकतं, तसं करुन बघुयात म्हणुन मी जवळ ठेवलेली चप्पल हळुच माकडाच्या दिशेने फेकली, म्हणलं कदाचीत माकड पण किल्ली फेकेलं. पण झालं उलटच, चप्पल बघुन ते माकडं बिथरले, माझ्यावर दात विचकले आणि बाहेर बाल्कनीत जाउन बसले. तेथुन झाड एक फुटावर होते. माझी धडधड वाढली होती.

माकडाच्या पायाचे ठसे
तेवढ्यात मला पोराच बॅटरीवर चालणारे टेडी-बेअर पडलेले दिसले. हळुच ते चालु केले आणि कॉट वर ठेवले. ते चुक-चुक आवाज करणारे टेडी बघुन एक माकड खुश झालं हळुच ते टेडीच्या जवळ आलं त्याने हातातला कॅमेरा कडेला ठेवला, हळुच ते टेडी उचलले आणि झाडावर धुम ठोकली. मी लगेच पटकन पुढे जाउन तो कॅमेरा पकडला.

आता उरले दुसरे माकड. मगाशी मी चप्पल फेकल्या मुळे ते माझ्यावर चिडुन होते, फुल्ल खुन्नस! मग तो वेटर म्हणाला, “या माकडांना कपडे आवडतात, असेल काही तर फेका. मग माझी कॅप होती ती हळुच पुढे टाकली. रंगीत टोपी बघुन हे माकड पण हळु हळु बिचकत पुढे आले, किल्ली कडे एकदा बघुन ती कडेला फेकुन दिली, टोपी उचलली आणि पळुन गेलं. मी पटकन झडप घालुन किल्लीही पकडली. मग बाकीचे सामान, पैश्याचे पाकीट, पर्स वगैरे सगळे तपासले, नशीबाने सगळे जागेवर होते. अश्या रीतीने त्या काही थरारक क्षणांचा शेवट झाला, पण शेवटी तोंडातुन वाक्य निघालेच, ‘त्या माकडाच्या नानाची टांग’

सोबत खोलीत शिरलेल्या माकडांपैकी एकाचा फोटो (कसलं चिडलयं बघा, स्माईल प्लिज म्हणलं तरी कॅमेराकडे बघत्तच नाहीये), आणि अंथरूणावर उमटलेल्या त्याच्या पंजाचे फोटो जोडत आहे 🙂

12 thoughts on “माकडाच्या नानाची टांग

 1. Mast re…..aata maja vatate pan kharach te makad tujhya gadichi killi gheun palala asata tar kay kele asates????

  • तन्वी,

   खरंच अगं. खुप बिकट प्रसंग होता तो. जर का ते माकड गेलं असतं ना किल्ली घेउन तर मोठ्ठा प्रश्न होता तो. बर बाकी कुठल्या ठिकाणी गॅरेज तरी असतात. माथेरान सारख्या ठिकाणी जिथे वाहनांनाच शहरात प्रवेश नाही तेथे गॅरेज कुठे मिळणार?

 2. भन्नाट ऽऽऽ

  लै भारी किस्सा आहे, एकदम मजेशीर.
  बाकी आपला पेशन्स आवडला, आम्ही असतो तर तिच्यामारी आधीच शिव्यागाळी करुन माकडाच्या तोंडाल फेस आणला असता व माकडे पळुन गेली असती की डोक्याला हात लाऊन बसलो असतो …

  हलकेफुलके, खुसखुषीत लेखन आवडले.

 3. खरेच बिकट प्रसंग होता. पण तुमची भरपूर करमणूकही झालेली दिसतेय आणि आता आमचीही झाली. 🙂

 4. tumcha pations la dad dili paahije. etkya bikat veli time sense dakhavinehi imp aahe, tumhi tase dakhavle. script aawadle. chhan.

 5. sahi aahe..mi college madhe astana ekada ladies room madhe makad aale hote baherchya dombaraykadun palun bahutek…mala watale te bathroom madhe jain ani mi palen pan kasle te majhyacha mage uuiiiiii solid waat lagli hoti…tumhi tyachi aathwan karun dili…pan tumchya itaki mi makad kai kuthlyach pranyapudhe doka chalawu shakat nahi fakt kinchalu shakate….Bravo…

 6. kharach lai bhari aheya rao, kharokhar tya prannisamoor kase vagave, hya sathi doke ladvale lagte, aplech ancestors (purwaj) te 🙂

  kharech jar gaadi chi killi gheyun gela asta to makad tar tuji fajjiti zali asti ani

  lihelay pramane topiwalla ani makadachi ghosta atavali.

 7. halki fulki katha khup aavdli…lahanpanchi atvani tazya zalya zali….mi kathmadula(nepal) gele astana ek makdane mazya hatatil popcorn palwun nele te makad popcorn khanyat itk dang zal ki mi thyacha sidla ubha rahun photo kadhale tari bichara shant khatach hota…thumchya ya post mule mala maza prasang aathwala

 8. Tyamdhe je photos add kelet na makdache te disatch nahi te ch ky mi kup sarya post wachtey jewapasun blog pahilay tar mla attached photo pahayla hi milat nahi please sangu shakta ka ky problm asel …..mla pics pahun ajun anad ghyacha ahe na Blog cha 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s