.. त्याने वाटले घटस्फोटाचे पेढे


दैनिक सकाळ मधील या बातमीने आज माझे लक्ष वेधुन घेतले. विदर्भातील एका युवकाने बराच संघर्ष करुन घटस्फोट मिळवला आणि चक्क त्याचे पेढे वाटले. त्यांच्यातील नातेसंबंध कित्ती ताणले गेले असतील हे त्याच्या या वागण्यातुन स्पष्ट होते. दुसरी एक बातमी, नवऱ्याला भुतबाधा झाली म्हणुन एका मांत्रीकाच्या सांगण्यावरुन एका स्त्रीने तिच्या नवऱ्याला वटपोर्णीमेच्या रात्री जाळुन मारले.

महाशक्तीकडे वाटचाल करणारा भारतातील आपण जोडीदाराची निवड करताना अजुनही मागासलेलेच आहोत का? बऱ्याच वेळेस लग्न जमत नाही म्हणुन एखादे आलेले ‘स्थळ’ तितकेसे पसंद नसतानाही लग्न उरकली जातात आणि मग त्याचे भोग आयुष्यभर भोगावे लागतात.

डोळ्यासमोर घडलेला एक किस्सा सांगतो. माझी आणि पत्नीची एक कॉमन मैत्रिण आहे, कॉलेजच्या दिवसांपासुनची. कॉलेजमध्ये लय पोरं तिच्या मागे, आणि ती पण.. पण शेवटच्या क्षणी.. I am committed. तिचा लहानपासुनचा मित्र.. मनिष आणि तीचे जिव्हाळ्याचे संबंध. कॉलेज दिवसांत, ‘माझा मनिष असा, माझा मनिष तसा’ यावर प्रवचन चालु. पुढे हा मनिष शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला. वर्षभरातच घरातला विरोध न जुमानता दोघांनी लग्न केले. विरोधाचे कारण एकच.. मुलाला नोकरी तरी लागु देत, मग करा लग्न. पण नाही. बापाच्या पैश्यावर दोघंही ऑस्ट्रेलियाला स्थाईक झाले. पहिले वर्ष आनंदाचेच होते. दर आठवड्याला दोघांचे फोटो, मेल्स येत राहील्या. कधी मेलबर्न, कधी सिडने, तर कधी अजुन कुठले तरी ठिकाण.

मग हळु हळु संसाराची झळ जाणवायला लागली. मुलाने शिक्षणाबरोबरच एका बॅंकेत निचांकी जागेवर नोकरी पत्करली, तर संगणक अभीयंती असुनही मुलीला एका कॅफे मध्ये क्लेरीकल जागेवर नोकरी करावी लागली. अश्या परीस्थीतही दिवस गेले आणि बाळाच्या जन्मासाठी दोघंही परत भारतात (खरं तर जमीनीवर) आले. बाळाचे संगोपन करणे ऑस्ट्रेलियात एकाच्या पगारावर शक्य नव्हते म्हणुन काही दिवस भारतातच रहाण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मुलाला इथे नोकरी नाही. तुटपुंज्या पगारावर मार्केटींग ची नोकरी चालु आहे. दोघांमध्ये वारंवार खटके उडतात. मुलीची रडारड, आई-वडीलांची..’तुला सांगीतले होते, नको करु लग्न, ऐकले नाहीस’ म्हणुन तुणतुण, नविन बाळाची ‘पिर-पिर’ स्वर्गातुन नरकात येयला कित्ती कमी वेळ लागला?

पेपर मध्ये अनेक जाहीराती असतात. ‘मुलगा अमेरीकेवरुन २ आठवड्यांसाठी लग्नासाठी आला आहे, मुलगी हवी आहे..अशी..अशी’ आणि लग्न जमतात.. मी स्वतः डोळ्यासमोर उदाहरण बघीतले आहे. त्या मुलाचे आणि मुलीचे नशीब की दोघंही अनुरुप निघाले नाहीतर अजुन एक आयुष्य कोलमडले असते.

या विरुध्दचे दुसरे उदाहरण ‘लिव्ह-इन-रिलेशनशिपचे’ दोन वर्ष होऊन गेली. दोघंही प्रचंड सुखी आहेत. एकत्र राहुनही वेगवेगळे. कुणाचे कुणावर बंधन नाही. पटले तर पुढचेही वर्ष एकत्र नाहीतर रस्ते वेगवेगळे.

‘लिव्ह-इन’ ला विरोध करणारे बहुतांश लोक मध्यम-वयाचे आहेत. याला अनेक कारण आहेत, पण त्यापैकीच बहुदा एक म्हणजे त्यांचे वार्धक्यातील काही स्वप्नांचे. घरामध्ये सुन, नातवंड नांदावीत, एकत्र कुटुंब असावे आणि वार्धक्य आनंददायी जावे असे असु शकते. पण मला सांगा आज एकत्र कुटुंब पध्दती खरंच तितकीच बळकट आहे का? एका घरात सोडा, एका गावात सुध्दा सोडा आजकाल मुल बाळ पर-राज्यात किंवा परदेशात स्थाईक झालेले असतात.. आई-वडीलांना सोडुन. पर-राज्यात मी एकवेळ समजु शकतो, पण मला आश्चर्य वाटते अशी कुठली नोकरी आहे जी भारतात मिळत नाही.. परदेशातच जाउन करावी लागते? अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे. त्याला दुमत असु शकते.. असणारच!! पण म्हणुन आई-वडीलांना सोडुन जायचे.. या बाबतीत गुजराती लोकांचे मला कौतुक वाटते.. जिथे पण जातील आजुबाजुला पुर्ण गोतावळा घेउन जातील.

एनिवेज.. मुद्दा वेगळा आहे. आज अमेरीकेसारख्या प्रगत देशात लिव्ह-इन खुपच कॉमन आहे. इतकी वर्ष झाली आणि ती संस्क्रृती तिथे रुजली आहे. आज आपण तिथल्या संस्क्रृतीला, तिथल्या मुल्यांना नाव ठेवतो, पण जरा डोळे उघडुन बघीतले तर आपल्या इथेही थोड्याफार प्रमाणात तोच प्रकार सुरु झाला आहे असे नाही का वाटत?

लिव्ह-इन ला खतपाणी घालु नये, पण निदान त्यावर शिंतोडे तरी उडवु नयेत असे मला वाटते. पिढी बदलत आहे त्यांच्या मतांचा आदर व्हायलाच हवा नाहीतर केवळ मोठ्यांच्या आग्रहाला बळी पडुन लग्न करुन त्यांच्या आयुष्याची हेळसांडच होत रहाणार आहे.

16 thoughts on “.. त्याने वाटले घटस्फोटाचे पेढे”

 1. >पर-राज्यात मी एकवेळ समजु शकतो, पण मला आश्चर्य वाटते अशी कुठली नोकरी आहे >जी भारतात मिळत नाही.. परदेशातच जाउन करावी लागते?

  हा बालिशपाणा म्हणावा की अद्न्यान?

  1. काही ही म्हणा! मला हा प्रश्न पडलेला आहे म्हणुन विचारला. स्पष्टीकरण दिले असतेत बरोबर तर बरं झाले असते. प्रश्न अनुत्तरीत राहीला नसता ना. एक-दोन महिन्यांसाठीचे पोस्टिंग समजु शकतो. परंतु वर्षानुवर्ष परदेशीच जाऊन नोकरी करावी लागते हे पटत नाही. तसे असते तर मुलं बाळ झाल्यावर त्यांच्या शिक्षणासाठी कसे हो परत भारतात यायला जमते? त्यांच्यावर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणुन, भारतातील संस्कृती चांगली आहे म्हणुन कसे हो लोकं सगळं सोडुन परत येतात? मग आई-वडीलांसाठी नाही का हो येउ शकत सगळं सोडुन?

   असतील काही लोकांच्या मजबुरी. सरसकट सगळ्यांनाच नाही लागु होतं, पण ज्यांना लागु होते, त्यांचे प्रमाण जास्तीच आहे.
   मित्राची आई वारली. भाऊ अमेरीकेत ६ वर्ष स्थाईक. अंत्यविधीसाठी पण आला नाही. का? तो येईपर्यंत सगळं उरकलेच असेल ना? मग येऊन करणार काय? आईला तर जाळला ना.. मग इतरांची दुखी तोंड बघायला नोकरीला सुट्टी टाकुन पर्यायाने तितक्या $$ चे नुकसान, विमान प्रवास सोसुन कशाला यायचं नाही का? भावाच्या शिक्षणासाठी, बाबांच्या जेवणाखाण्याच्या सोईसाठी काही $$ पाठवले की झालं ना काम!

   बालिशपणा म्हणा नाहीतर अज्ञान, प्रश्न पडला आहे खरा!!

   1. मला तुमच्या म्हणण्याचा रोख कळला आणि त्यातील भावनांशी मी सहमत आहे.
    तरीसुद्धा परदेशात (खासकरून अमेरिकेत)
    * प्रगतीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत. काही नोकर्‍या अशा आहेत की ज्या भारतात नाहीत किंवा खूप कमी आहेत. (जशा की संशोधन विषयक, किंवा चांगल्या कॉलेज मध्ये प्रोफेसर, किंवा नवीन उद्योग चालू करणे अमेरिकेत ज्यास्त सोपे आहे)
    भारतात जे काही आयटी च्या नावाखाली जॉब्स चालतात, त्यात क्रियेटिविटी ला फार कमी वाव असतो (बाकीच्या क्षेत्रांच मला फार माहीत नाही).
    तुम्ही ऑलमोस्ट गुलाम असता.
    * लोक ज्यास्त लुडबूद करत नाहीत. अर्थात हे चांगले किंवा वाईट दोन्ही असु शकते.
    * तुमच्या मुलांना शिकयच्या नवीन आणि चांगल्या संध्या उपलब्ध होतात. फक्त डॉक्टर, इंजिनियर या चोखळलेल्या वाटा सोडून, आपल्याला पटेल असा मार्ग निवडायचे स्वातंत्र्य राहते. (भारतात जे जवळपास नाहीच आहेत. नुसते स्पोर्ट्स मध्ये करियर करायचे, तर क्रिकेट सोडून किती ऑप्षन्स आहेत?आणि त्यातले किती पोटाचा प्रश्ना सोडवू शकतात?)

 2. फारच सडेतोड आणि खरं खरं लिहिलंय. सौ. चा भाउ पण परत येतोय या मन्थ एंड ला- ७ वर्षांच्या नंतर..!

 3. अगदी गंभीर विषयावर लेख आहे…यावर प्रत्तेकाचे वेगळे मत असे शकते..कारण प्रत्तेक निर्णयामागचे कारण्/परीस्थीती वेगळी असु शकते…पण हो एक मात्र सत्य आहे..तुमचे पालक तुमच्या लहानपणी जेव्हडी तुमची काळजी घेतात..तुम्हाला कशाचीच समज नसते तेव्हा ते सतत तुमच्या पाठीशी असतात्….आणि जेव्हा त्यांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही????…याचे उत्तर मी तुमच्या सगळ्यांवर सोडतो..

  1. नक्कीच. मी म्हणतच नाही की सगळ्यांच्या बाबतीत हे लागु पडते. मी सुध्दा एक महीना अमेरीकेत होतो. मला जावेच लागले अमेरीकेला एका महीन्यासाठी म्हणुन मी नोकरी नाही बदलली. पण जेंव्हा मला एका ठिकाणाहुन कॅनडामध्ये स्थाईक होण्याची संधी आली तेंव्हा ती क्षणाचाही विलंब न करता नाकारली.

   परत एकदा, हे माझे वैयक्तीक मत आहे, प्रत्येकाचे विचार, परीस्थीती वेगवेगळी असु शकतेच याबद्दल माझे दुमत नाही.

 4. I dont want to put my opinion here abt the issues, but I think u urself were not sure what u wanted to write about. Did u want to write your comment about Live-in relations or the people who are staying in different countries away from their home? The writing seems to be little vague and does not completely clarifies your views about either issue.
  -Vidya.

  1. मला लिव्ह-इन बद्दलच लिहायचे होते, परंतु कमेंट्स दुसऱ्या मुद्यावर आल्याने मला त्याबद्दल रिप्लाय करावे लागले त्यामुळे थोडे व्हेग झाले खरे.. माफ करा

 5. I personally 100% agree with what Aniket has stated about both the points – Live-in and staying abroad.

  However, both these answers are very much dependent on personal preferences. So, I don’t think people like us (who think alike) have any right to blame or say anything about other’s choices. It’s their life and they will handle it the way they want it. उगाच त्यांच्या आयुष्याचे निर्णय आपल्या मताने चुकीचे ठरवणे, अन्यायकारक आहे. उद्या तुम्ही कशाला भारतात राहता, असं म्हणून मला कुणी चुकीचे ठरवले तर ते जेवढं चुकीचं असेल, तेवढंच मी त्यांच्या निर्णयावर भाष्य करणं चुकीचं असेल, असं मला वाटतं.

  But yes. I agree with Vidya. Aniket, if each topic would have posted in 2 separate posts, it would have been great. (I am not talking about the comments, I am talking about the post itself.) Two different topics stated together makes the post vague.

  फिर भी, चलता हैं|

 6. Hi, I basically stay out of India with family in Kuwait since 10 years…agree that nowadays in India there is lot of scope & also that we miss not only our culture but also near & dear ones….but still its not so easy to shift back all of a suddenly just becaz v love India….But time has come now when new generation know the drawbacks of migrating better may be will succed to break this non ending chain in future….About “Live in’ its reall bullshit…not just for the old traditional ethics but becaz personal life cannt be compared as same with “business matter” …just one contract to renew every yr …leave if not happy or change if find somthing more better….it will spoil the minds & hearts of youths making them “mentally handicapped”…..

 7. hi
  Both the issues are really serious and there is no perfect right or wrong there. I dont think you have mixed them and even if you have its okay..blogs are for expressing oneself and not a essay writing competition that you would be marked on.

  I have always observed that people leaving abroad always try to compensate their presense with monetory help or exagerate the difficulties in coming back to India. Bt accept it or not, when one gets used to a better lifestyle and luxuries, s/he would always find reasons not to step back. I have also seen and met people who are brillient, thay have completed thier education abroad and now have come back to make use of their knowledge here in India.
  I completely agree to aniket on the statement ‘if for kids then why not for parents?’. One more point is, those who want to come back for kids, are really afraid (and confused) that they will not be able to accept the fact that their children will adapt foreign culture and values. here too they are more concerned about their mental state than their Kid’s…
  There was a lot of discussion in the past on this in mahendraji’s blog and subsequently on Nachket’s blog followed by mine.

  Live in…I think what smita said is correct. one cant mix emotional and professional concept. Even if you call it a live-in relationship, it still involves emotional attachment, expectations, sexual life, etc.etc. It is just minus the legal aspect. But have you ever thought where it all leads? if live in means staying as one wants without any sacrifice and adjustment, then what’s the purpose of staying together? just a company or sexual partnership? this may lead to more grave issues such as single mothers. frequent abortions or use of contraceptives that result in deteriorating health of a women, and a tendancy to just walk out of relationships without thinking about the other person, property issues, multiple partners and issues (both social and medical) related to that..the list goes on. Freedon without responsibility is dangerous. Instead, the parents and the education system both should educate the children right from the teenage about what the term ‘marriage’ means.

  Sonal

  1. i am newcomer on the blog, its just my first day, and happen to read Anikets lead story , and where it lead to, i fully agree. about the LIVE IN relationship notion, all fun with no strings attached, this things dont work in real life, who ever says it ITS THERE OWN LIFE AND PERSONAL CHOICE, its affect everyones life, it affects Society in whole, like rightly pointed out of unwed mother, frequent abortions or walking out of relations without caring for other person is really dangerous, and this system, i supposed should not be allowed or recognized in India, as there are lots of after affects of this systems, its like 5 minutes pleasure 9 months pain kind of thing.

   Our age old system of Marriage is full proof in any aspects. todays i generation may find it difficult, bt thts only thing to last …

   1. Its not a question of i believe in it or not. Its about what the current trend is. अनेक लोकं आहेत जे सारासार विचार नं करता लिव्ह-इन रिलेशन-शिप ला नावं ठेवतात. या लेखामध्ये दिलेले उदाहरण बघीतले तर लव्ह-मॅरेजेस किंवा ऍरेंज मॅरेजेस केलेली लोकं सुध्दा सुखी नाहीत. मगं लिव्ह-इन ला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर जबरदस्तीने आपलं मतं का नोंदवायची असा माझा एक प्रश्न होता.

 8. jitkya vyakti thitakech wichar….jag kitihi badludya pan bhartiyani ek lakshat thewayla hav “”bhartiy sanskruti”hi saglyat shresth sanskruti manli jate ya modern vicharamule aapli parmparene japat aalelya sanskruti la kuthe galboat lagu naye yachi kalgi sarvanich ghyala havi…
  …….” olg is gold”… wugich manat nahi

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s