‘ते’ तीन तास


गोष्ट फार पुर्वीची, १० एक वर्षांपुर्वीची, जेंव्हा मी काही कामासाठी मध्य-प्रदेशातील एका छोट्याश्या खेडेगावात गेलो होतो. तेथीलच एका हॉटेलमध्ये ३ दिवस मुक्काम होता. माझ्या बरोबर माझा एक मित्र पण होता जो याआधी १-२ दा येउन गेला होता. हॉटेलचा मॅनेजर ही चांगला ओळखीचा होता. आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेंव्हा तो ‘कामा’त बिझी होता. नंतर त्याने एका बाईशी ओळख करुन दिली आणि म्हणाला ‘काही’ हवे असेल तर सांगा, ही संध्याकाळी पाठवुन देइल. आम्ही नम्रपणे नकार दिला.

उकाडा ‘मी’ म्हणत होता. तापमान नाही म्हणलं तरी ४६ च्या आसपास होते. घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यात खोलीला असलेले पत्रे खोलीमधील उष्णता अजुनच वाढवत होते. म्हणुन मग रात्री जेवणं वगैरे उरकुन झाल्यावर आम्ही वऱ्हांड्यात गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात हॉटलचा मॅनेजर आला आणि नाकाला बोट लावत म्हणाला, ‘कुछ भेज दु रुम मै?’ म्हणलं.. “नही भैय्या कुछ नही चाहीये..”

‘अरे आपसे जादा पैसे थोडे ना लुंगा? आप जो चाहे दे देना. एक बार देख तो लो..’ असे म्हणुन त्याने कुणाला तरी हाक मारली. बाहेरुन दोन मुली आमच्या इथे आल्या. आम्ही म्हणालो..’अरे नही चाहीये क्यु पिछे पडे हो?.. ले जाओ इन्हे!!’ मग त्यातील एका मुलीने भावाची घासाघीस चालु केली.. ‘चलो.. आधा पैसा दे देना.. बाबु (मॅनेजर) के खातीर!’ आम्ही ठामपणे नकार देत होतो. तेवढ्यात हॉटेलचा एक नोकर धावत धावत आला आणि बाबुच्या कानात काहीतरी पुटपुटला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. एकदा त्या मुलींकडे आणि एकदा आमच्याकडे तो आळीपाळीने पाहु लागला. त्याला पाहुन काय झाले तेच कळेना. मग तोच एकदम म्हणाला..’मर गये.. पोलीस की रेड पडी है!, अगर इनको यहा पे देख लिया तो हम सब अंदर जायेंगे’

‘अरे हम क्यु अंदर जायेंगे? हमने नही बुलाया इनको यहा पे!.. तुम ही लेके आये हो!.. तुम संभालो जो करना है!!’, आम्ही आमची बाजु संभाळण्याचा प्रयत्न केला.

‘बताके देखो पोलीस को.. वो थोडीना मानने वाले है!!. सबसे पहले तो यहा पे कुछ नही सुनेंगे, पहले हथकडी डालके पोलीस थाने.. फिर वहा समझाना उनको!!’ बाबु.

‘अब क्या करेंगे?’ आम्ही.
‘एक तरीका है, मै आप सब लोगोंको आपकी रुम मै बंद करके बाहर से ताला लगा देता हु. पुलीस सिर्फ उसी कमरोंको तलाशती है जिसमै कस्टमर ठहरे है! आपको सिर्फ अंदर चुप रहना है जबतक पुलीस नही जाती’, बाबु

आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, लगेच आम्ही खोलीत घुसलो. बाबुने बाहेरुन कडी आणि कुलुप लावुन टाकले. थोड्याच वेळात बाहेरुन पोलीसांचे, त्यांच्या बुटांचे आवाज यायला लागले. शेजारची खोली उघडली गेली होती. थोडावेळ चौकशी करुन ते पुढे गेले. आमचा थरकाप उडाला होता. खोलीमध्ये अंधार, पंखा, दिवा काही चालु नाही. उकाड्याने आणि भितीने घामाच्या धारा लागल्या होत्या. पाय थरथर कापत होते. त्या दोन मुलींना मात्र कसलेच भय नव्हते, त्यांची काही तरी खुस-पुस चालु होती. त्यांचा ‘धंद्याचा टाईम’ वाया चालला होता याची जास्त काळजी होती. आम्ही मात्र जाम टरकलो होतो. थोडा वेळ शांततेत गेल्यावर बाहेरुन परत आवाज यायला लागले. थोडा कानोसा घेतल्यावर लक्षात आले की काही पोलीस मंडळी आणि बाबु बाहेर व्हरांड्यात पेय-पान करायला बसले आहेत. नशीब इतके खराब ना की आम्ही व्हरांडा म्हणुन या बाजुची खोली घेतली होती आणि आता आम्ही पश्तावत होतो. त्यांच्या गप्पांचे आवाज स्पष्ट ऐकु येत होते. बाबु हर-तऱ्हेने त्यांची काळजी घेत होता. सोडा आण, चकाणा आण, वेगवेगळी पेय आण चालुच होते.

आत मध्ये आमची काय अवस्था झाली होती आम्हालाच माहीत. घड्याळ्यातील सेकंद काट्याची टक-टक आणि छातीच्या ठोक्यांची धडधड सुध्दा आम्हाला ऐकु येत होती. पोटामध्ये खड्डा पडला होता. घश्याला कोरड पडली होती. ओठांवरुन वारंवार जिभ फिरवुन आणि आवंढे गिळुनही काही फरक पडत नव्हता. कानशीलं गरम झाली होती. हातांची सारखी चुळबुळ चालु होती. प्रत्येक सेकंद कित्तीतरी मोठ्ठा वाटत होता. काहीतरी आवज होईल या भितीने पापणी हलवायलाही भिती वाटत होती.

मनामध्ये काळजीचे काहुर उठले होते. “या पोरींनी कंटाळुन काही गडबड केली म्हणजे? यांना तर असले प्रकार नेहमीचेच. पण आमचे काय? पकडलो गेलो तर? घरी कळले तर? छी-थु होईल, काय म्हणतील सगळे? परत पोलीस-केस झाली तर पुढे पासपोर्ट मिळवण्यात अडचण.” नाही नाही ते विचार डोक्यात येत होते. माहीत असतील नसतील तेवढ्या सगळ्या शिव्या मनातल्या मनात बाबुला घालुन झाल्या होत्या. एकदा.. जे केलेच नाही त्याची भिती कशाला बाळगा, पोलीसांवर विश्वास ठेवु, बाहेर जाउन जे घडले ते सांगुन टाकावे असाही विचार मनात डोकावुन गेला. पण एकतर आपण परराज्यात, इथे कुणाशी ओळख नाही. त्यात हे असले खेडेगाव, फोन लावायचा म्हणलं तरी लगेच लागेल याची खात्री नाही म्हणुन मग तो विचार काढुन टाकला.

घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. २.३०-३ तास होऊन गेले, तसे एक एक करत पोलीस लोक उठुन निघुन गेले. नंतर १५-२० मिनीटांनी बाबुने दरवाजा उघडला. घामाने आम्ही चिंब झालो होतो. हात-पाय अजुनही थरथरत होते. आमच्याकडे बघुन ‘त्या’ मुलींनाही हसु आवरले नही..’क्या रे.. इतना क्या डरनेका? थोडा पैसा दिया इन लोगोंको तो हो जाता है काम. और हमारा क्या है.. जादासे जादा एक बार फोकट मै जाना पडेगा इनके साथ.. आपने हमारे धंदे-के टाईम खोटी किया!’ असं म्हणुन फिदी-फिदी हसत निघुन गेल्या.

परत आल्यानंतर उगाच कुणाला हा किस्सा सांगुन उगाच कशाला आपलं हसं करुन घ्या म्हणुन ह्या बाबत कुणाकडेच वाच्यता केली नव्हती. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘मनातले’ ह्या ब्लॉग वाटे मनात दडलेले ‘ते’ तीन तास बाहेर पडले.

16 thoughts on “‘ते’ तीन तास

    • अबे झेंडु, नको तिथे काय? त्या गावात एकच हॉटेल होते. कुठे रहाणार? मी काय लॉर्ड फोकलंड नाहीये स्वतःची लि-मो घेउन फिरायला :)))))

 1. सज्जन हे खरेच सज्जन असतात, पण कुणाला सांगून ते थोडेच पटणार. तुमची बाजू खरी होती म्हाणून पकडले गेला नाही. तीन तास कोंडून घ्यावं लागलं हे वाईट झालं.

 2. हा!!..सही अनुभव आहे एकदम्..मी जेव्हा पहील्यांदा पुण्याला आलो होतो तेव्हा चुकुन बुधवार पेठेत गेलो होतो एक पत्ता शोधत…सॉलीड फटारली होती राव्..

  • कल्पना नाही, ऍरोगंट करीना आणी दिड-शहाणा, शहारुख चा कॉपी-कॅट शाहीद दोघंही मला आज्जीबात आवडत नाहीत, त्यामुळे हा चित्रपट मी अजुन तरी पाहीलेला नाही.

 3. 😀 हा..हा..हा…. तीन तासाच्या बदल्यात सुटका तर झाली. नाहीतर तीस तास अडकून पडला असतास.

  • खरं आहे अक्षय, पण यात विचार करण्यासाठी वेळच मिळाला नाही, सगळं कसं घडत गेलं

 4. …….jyanch man swachha & chagal ast thyanchyavar kitihi sankat aali tari te thyatun sahi salamat baher padtat….kalji ghya

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s