तेंडुलकर दुधवाले


नेहमीच्या वेळेस सकाळी दुधवाल्याने बेल वाजवली, दार उघडले आणि तोंडातुन अचानक शब्द बाहेर पडला ‘आईला..!!’ दारात चक्क ‘सचिन तेंडुलकर’ उभा होता. “अरे सचिन तु? मी कुठल्या स्पर्धेत ‘लकी ड्रॉ’ वगैरे जिंकलो की काय?”

सचिन: “नाही नाही.. आजपासुन मीच रोज दुध टाकायला येणार आहे!”
मी: “तु?? दुध?? काही कळाले नाही बाबा!!”
सचिन: “अरे दुधाच्या धंद्यात उतरलो नाही का मी!! सध्या तसेही काही काम नाहीये मला. वर्ल्ड कप काही मी खेळत नाहीये, इतक्यात दुसऱ्या महत्वाच्या क्रिकेट मॅच पण नाहीत. मंदी मुळे ‘तेंडुलकर्स’ चा पण धंदा जरा बसलाच आहे, त्यामुळे ह्या धंद्यात उतरलो बघ!”
मी: “अरे पण तु रोज जा ये कसे करणार? फेरारी आहे तुझी, पण ती थोडी ना परवडणार तुला. एक तर कस्टम ड्युटी सुध्दा तु भरली नाहीस, पेट्रोलसाठी मात्र तुच टाकतोस ना रे बाबा? का ते पण स्पॉन्सर्ड?”
सचिन: “आता काय सांगु? लोकांचे एवढे प्रेम आहे माझ्यावर नाही म्हणवत नाही रे. मी दुधाच्या धंद्यात उतरत आहे म्हणल्यावर सगळ्या दुधवाल्या भैय्यांनी मिळुन मला एक बुलेट आणि दुधाच्या ४ मोठ्ठ्या बरण्या भेट दिल्या आहेत त्याच वापरणार भांडवल म्हणुन या धंद्यात.”
मी: “मज्जा आहे बाबा तुझी, अजुन काय उद्योग करणार आहेस?”
सचिन: “भारतीय संघाची स्पॉन्सरशिप मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघाने फक्त तेंडुलकर्स दुधच पिले पाहीजे”
मी: “सहीच.. आणि मध्ये ते २०० मुलांना जेवु-खाऊ घातलेस, त्यांना दत्तक घेतलेस, बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातातुन काही सुटल्याचे ऐकण्यात आले बघ!”
सचिन: “नाही रे, मी नेहमीच काही ना काही तरी सार्वजनीक कार्य करत असतो, फक्त त्याचा उल्लेख करत नाही बघ. आता हेच बघ ना, न्युझीलंड मध्ये मी पहीले शतक ठोकले आणि लगेच ते तेथील नष्ट होत चाललेल्या वाघांना अर्पण केले”
मी: “अरे तुझे शतक घेउन ते वाघ काय करणार? त्यापेक्षा ‘मॅन ऑफ द मॅच’ चे पैसे वगैरे दिले असतेस तर…”
सचिन: “.. बर चल जातो मी आता, आजुन बऱ्याच ठिकाणी दुध टाकायचे आहे, आणि जास्ती बोलवत नाही रे, ते आयडीया च्या स्किम मध्ये माझा नंबर देउन बसलो आणि इतके लोकांचे फोन येतात ना. दमछाक झाली आहे बघ. त्याचाच परीणाम मुंबई-इंडीयन्स मधील माझ्या कामगिरीवर झाला.. बरं जाउ देत जातो आता”

कित्ती मेहनती आहे बिच्चारा, पोटा-पाण्यासाठी काय काय करावे लागते आहे. सचिनच्या या नविन कामाला मनापासुन शुभेच्छा देउन मी दार लावुन घेतले.

Advertisements

7 thoughts on “तेंडुलकर दुधवाले

  1. chaan…. khup divasani bhettoy…. Olakhshil ki nahi mahiti nahi

    Vijay Deshmukh,
    Purvi Mumbai ata south korea

    1. माफ करं मित्रा, खरंच आठवत नाही, कुठे भेटलो होतो आपण?

  2. गोर्‍या सायबाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रिकेटवर गेली वीस वर्षे आपल्या असामान्य खेळाने, अनेक विक्रम करत अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी कुटुंबातून आलेल्या सचिनला क्रिकेटमध्ये करिअर करायची संधी मिळणे, घरातून तसे प्रोत्साहन मिळणे हे सचिनचे नव्हे तर आपणा सर्व भारतीय क्रिकेट रसिकांचे भाग्यच म्हणायला हवे. सचिन यांचा जन्म मुंबई येथे झाला. घरात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटविषयक अनेक गोष्टी लहानपणीच त्यांच्या कानावरून गेल्या होत्या. त्यांच्या भावाने – अजितने – त्यांच्यातील क्रिकेटचे कौशल्य ओळखून त्यांना योग्य वयात रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवण्यास पाठवले आणि त्यांच्यातील सुप्त खेळाला योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाल्यावर त्यांचा खेळ लहान वयातच अधिक परिपक्व बनत गेला. शारदाश्रम विद्यालयाचा, छोट्या चणीचा हा मुंबईकर खेळाडू लहानपणापासूनच मुंबई गाजवू लागला

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s