कसं काढु मी ‘तिला’ मनातुन बाहेर?


शेवटी आज धीर करुन ‘ति’च्या बद्दल लिहीण्याचेच ठरवले आहे. देवासमोर एकच प्रार्थना आहे, “प्लिज हा पोस्ट बायकोच्या नजरेस पडुन देउ नकोस”. बायकोने जर हा पोस्ट वाचला तर तिला काय वाटेल? एक असताना दुसरीचा विचार? पण काय करु? मोह, माया या अश्या गोष्टी आहेत ज्याच्यावर माणसाने अजुनही विजय मिळवलेला नाहीये.

लग्नानंतर काही वर्षातच तिची आणि माझी नजरानजर झाली. पहिल्यांदा ओझरतीच दिसायची, पण नंतर बऱ्याच वेळेला नजरानजर होऊ लागली. ती नेहमी आपल्याच तोऱ्यात असायची, मी मात्र एका जागी स्तब्ध होऊन ती नजरेआड होई पर्यंत तिला डोळे भरून पहात असे. तिचे ते रुप काळजात घुसले होते. वाटायचे ही आपली झाली तर? पण छे, कसं शक्य आहे, घरी एक असताना!!

‘तिला’ मिळवण्यासाठी खरंच सांगतो मी काहीही करु शकतो, तिच्यावर कित्तीही पैसे उधळण्याची, खर्च करण्याची माझी तयारी आहे. खरं तर पोराच्या शिक्षणासाठी पैसे साठवण्याचे दिवस, पण तरी दुसरे मनं शांत बसुन देत नाही. या वयात असले ‘धंदे नाही करायचे तर मग काय म्हातारे झाल्यावर करायचे का?’

माझ्या स्वप्नांवर खरं तर फक्त बायकोचाच हक्क असावा, रोज माझ्या स्वप्नात तीच यावी असं नेहमी वाटायचे, आता ही वाटते, पण हळुच, चोरुन स्वप्नातही आजकाल ‘तिचा’ शिरकाव झाला आहे. स्वप्नात ‘तिच्या’ बरोबर घालवलेले काही तास, तिच्या बरोबर पावसाळी संध्याकाळी केलेली लॉंग ड्राईव्हच्या आठवणी ही दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर रोमांच फुलवतात.

एकदा वाटतं मनमोकळे पणाने बायकोला सांगुन टाकावे, मनावरचा ताण तरी हलका होईल. पण ती कशी रिऍक्ट करेल? काय म्हणेल मला? आणि म्हणुनच तर शेवटी ब्लॉग लिहायला घेतला. शेवटी मनातले बाहेर काढण्यासाठीच, मन मोकळे करण्यासाठीच तर ब्लॉग असतो नाही का?

काय करावं? आधीची असताना दुसरीच कसं जमवावं? दुसरीसाठी पहीलीला सोडुन दिले तर? बाहेर किती भिषण परीस्थीती आहे! कित्ती खराब आहे मार्केट, रिसेल व्हॅल्यु पण येणार नाही. वर्ष तर झालं स्विफ्ट घेउन आणि स्कॉर्पियोचा विचार चालुच आहे. परवडणार आहे का तुला? पैसे जमवं न निट, तोपर्यंत स्विफ्ट आहेच की, झक्कास गाडी आहे. बायकोला स्कॉर्पियो बद्दल काही बोलु नकोस अजुन, आधीच शिव्या खाल्या आहेस ना तिच्या, एवढी मोठ्ठी गाडी आपल्याला काय करायची आहे म्हणुन? मग? ते काही नाही. काही दिवस कळ सोस, मग स्कॉर्पियो तुझी होईलच यात शंकाच नाही. ‘ति’ तुझीच आहे, आणि तुझी होईलच यात शंका नाही.

अर्र.र्र.. माफ करा हं. मी संदिग्ध बोललो का? अहो मी स्कॉर्पियो गाडी बद्दल बोलत होतो. घरी नुकतीच घेतलेली स्विफ्ट असताना, दुसरीचा विचार कसा करणार, परवडत नाही हो.. बाय द वे.. तुम्हाला काय वाटलं मी कशाबद्दल बोलत आहे???

Advertisements

16 thoughts on “कसं काढु मी ‘तिला’ मनातुन बाहेर?”

  1. काय रे माजुर्ड्या, गप्प बसवत नाही का? 🙂

   1. Aniket,
    I am totally agree with Nikhil ….

    Jau det, mahatwacha mhanaje tu tuzya manatale baher kadhalas …. good !!!

 1. हा!!हा!!..आम्ही हेडींग वाचुनच ओळखल राव की हे प्रकरण ‘ते’ नाही म्हणुन..:-)

  उगाच नाही आम्ही तुमचे फॅन आहोत्…हा!!हा!!..असो..मलापण राव होन्डा-सीटी घ्यायची आहे पण..:-(

 2. पहिल्या दोन ओळीतच पकडले तुला………..:) मग कधी आपलीशी करायचा विचार आहे? एक घरके लिये…..एक बाहर…..:D

  1. बस्स, चंदा गोळा करणं चालु आहे, बघु कधी जमते ते. 🙂

 3. अनिकेत…..
  तु खुपच चतुर आहेस हं….बायकोला तर खुलेआम सांगता येत नाही आणि मनांतलं हे गुदगुल्या करणारं छोटसं गुपित कुणाबरोबर तरी शेयर करावं अस मात्र वाटत राहतं…..त्यामुळे ही स्टोरी कशी झकास जमून आलीय्….पण बच्चमजी सगळ्या बायका आपापल्या नवर्याना नीट ओळखून असतात बरं का…त्यामुळे जरा संभाळुनच वागा….काय़?

  1. प्रतिक्रियेबद्दल आणी मोलाच्या सल्याबद्दल धन्यवाद 🙂

 4. oh..so her pet name is scorpio? Or is it her sun sign?
  Pan mala pahilya para madhech watal he kahitari bhalatach nighnar mhanun. hahahaha. chaan.

  1. 😦 झालयं काय, तुम्ही सगळे मला आजकालं चांगलचं ओळखु लागला आहात, त्यामुळे माझे लिखाण predictable झाले आहे बहुतेक, काही तरी बदल करावा लागणार 🙂

 5. stori suru zali tevahch watla hot hyatali ti “ti” nakkich nahi wegalch kahi tari asel aani maza guess barobar nighala pan stori mast aahe…….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s