आवाज….


बहुतांश लोकांची आयुष्याची सुरुवात “टॅहॅ.. टॅsssहॅ” च्या खणखणीत आवाजाने होते आणि त्यानंतर आयुष्यबर निरनिराळे आवाज मनुष्याच्या कानावर कळत नकळतपणे पडत असतात.

लहानपणी गालावर कळी खुलवणारा आई-बाबांचा आवाज थोडं मोठ्ठ झाल्यावर खेळ सोडुन आभ्यासासाठी बोलावणारा आवाज त्रासदायीक ठरतो. ‘धप्पा, भोज्जा, आऊट, सिक्स, लगोरीsss, डबडा-ऐस-पैस’, मित्र-मैत्रिणींच्या हाका, शाळांमधील गाणी, गोष्टी, जनगणमन, एक-साथ नमस्ते पासुन गुड-मॉर्निंग टिचर पर्यंत. टि.व्हि. शी नाते जमले की कार्टुन्स, विविध जाहीराती, गाणी, पुढे पुढे सिनेमे. हळुहळु गजराचा आवाज आयुष्याचा अनभिज्ञ भाग होऊन जातो. कधी अभ्यासासाठी तर कधि नोकरीसाठी आयुष्य गजराच्या आवाजाचे गुलाम होऊन जाते.

टेलिफोनचा आवाज, मोबाईल्सच्या रिंगटोन्स, निवडणुकीतील ‘आवाज कुणाचा’, तर गणपतीमधील ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि विसर्जन मिरवणुकीमधील ढोलताशे ते स्पिकर्स च्या मोठमोठ्या भिंतींमधील धडधड. बसगाड्यांचे आवाज, गाड्यांचे हॉर्न्स, रेल्वे-गाडीची धडक-धडक, प्लॅटफॉर्म्स वरील अनॉउन्समेंन्ट्स. टाईपराईटर्सचा तालब्ध्द आवाज ते पंख्याची संथ घरघर. कोकीळेची कुहु-कुहु पासुन सिमेलगतच्या गावात ऐकु येणारे बॉम्ब गोळ्यांचे आवाज.

कित्ती वैविध्य आहे प्रत्येक आवाजात. लता मंगेशकर आणि आशा भोसले, बहीणी-बहीणी असुनही दोन टोकांचे आवाज. खरंच कित्ती आवाज ऐकत असतो माणुस आयुष्यभर कळत-नकळत..प्रत्येक आवाजाला प्रत्येकाची निराळी प्रतिक्रिया..

एकच आवाज.. एकच आवाज माणुस ऐकु शकत असुनही कित्तेक वेळा त्याचा गुलाम होऊ शकत नाही. परिस्थीतीपुढे हतबल होऊन माणुस तो आवाज दुर्लक्षीत करतो.. मनाचा आवाज.. आपला आवाज, आपल्या सगळ्यात जवळचा आवाज.. जबाबदारीमुळे, परिस्थीतीमुळे कित्तेक वेळा माणुस मन मोडुन, मनाचा आवाज दुर्लक्षीत करुन वागत रहातो.

मनाचा आवाज..इतक्या जवळचा असुनही इतक्या लांबचा. भगवंता, शक्ती देशील का रे तु मनुष्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकण्याची, त्याप्रमाणे वागण्याची? बदलु शकशील का रे तु व्याख्या ‘स्वार्थी, मतलबी’ शब्दांची? का घंटाच्या घणघणातात, प्रार्थनेच्या आवाजात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आमच्या मनाचे आवाजच एवढे क्षिण पडले आहेत की ते पोहोचतच नाही आहेत तुझ्या पर्यंत??

Advertisements

4 thoughts on “आवाज….”

  1. ह्म्म, अंतर्मुख झाले बघ, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

  2. ज्याला आतला आवाज ऐकू आला तो सुखी …… 🙂
    आज मन जरा त्रासलेय तशात तुझी पोस्ट वाचली…. २ वाजलेत रात्रीचे… आता मनाचे ऐकून झोपून टाकते.:)

  3. तुला आणि ज्यांना कुणाला हा ‘मनाचा आवाज’ ऐकण्याची उर्मी मनांत दाटुन येत असेल त्यांनी निदान वर्षातून एकदा तरी ‘विपश्यना’ करुन पहावी अशी माझी नम्र विनंती आहे..औदुंबर कवितेत म्हटल्याप्रमाणे आपल्याच मनांत चाललेली सर्व खळबळ आपल्यालाच शांतपणे पहाता येते….आणि शांततेचा विलक्षण अनुभव घेता येतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s