एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३-शेवटचा]


भाग क्र. २ पासुन पुढे…

कॉफी शॉप मध्ये राधीकानेच ऑर्डर दिली, “टु लात्ते (caffè latte) प्लिज!!”
रोहन, “तुला काय माहीत मला लात्ते आवडते?”

राधीका, “अरे म्हणजे काय, कॉलेज मध्ये नाही का एकदा आपण नविन कॅफे सुरु झाले होते तेंव्हा गेलो होतो.. तेंव्हा तु हिच घेतली होतीस कॉफी आणि म्हणाला पण होतास तुझी फेव्हरेट आहे म्हणुन!”

“असेल.. पण झाली त्याला आता ६-७ वर्ष!”, रोहन मनोमन आपली आवड राधीकाच्या लक्षात आहे हे ऐकुन सुखावला होता.

“A Lot Can Happen Over Coffee”, बाहेर लिहिलेल्या वाक्याकडे बोट दाखवत राधीका म्हणाली, “खरंच कित्ती साधे पण तितकेच परीणामकारक वाक्य आहे हे नाही?”

“हम्म..” कॉफी पित-पित, रोहन म्हणाला..”बरं ते जाऊ देत, काय गं, कॉलेज मध्ये तुझ्या मागे तो सुजित होता.. काय झालं पुढे त्याचे? नंतर काहीच कॉन्टाक्ट नाही ना?”

“:-) नाही रे.. मला तर तो निटसा आठवत सुध्दा नाही. आणि तोच काय, कित्तीतरी जणं माझ्या मागे होते :-)), अगदी तु सुध्दा.. हो ना?”, राधीका रोहन च्या डोळ्यात खोलवर पाहात म्हणाली.

“ए चल.. काहीही.. तसं काही नव्हते. आणि आपण असं कित्तीसं भेटलो होतो कॉलेज मध्ये?”, रोहन तिची नजर टाळत म्हणाला.

“अरे सांग रे.. डोन्ट वरी, शरयुला नाही सांगणार मी, खरं सांग”, राधीका
“नाहीsss, तसं काही नव्हते..” रोहन प्रयत्नपुर्वक आपल्या म्हणण्यावर ठाम रहात म्हणाला.
“बरं बाबा.. ठिक आहे”, राधीका

रोहनने तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहीली होती, जी काही क्षणासाठी आली आणि परत निघुन गेली. नंतर दोघांनी खुप्प गप्पा मारल्या. विषय एक असा कुठलाही नव्हता. खरं कारण होतं ते म्हणजे दोघंही जण एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. मग त्यांनी एकत्र जेवण घेतले, (यावेळेसही राधीकानेच ऑर्डर दिली होती).

घरी परतत असताना राधीका वाकुन वाकुन गाडीचा स्पिडोमिटर बघत होती. शेवटी रोहनने न रहावुन विचारले, “काय झालं?”

“अरे स्पोर्ट्स कार ना तुझी? मग असा ४०-६० च्या वेगाने काय गाडी चालवत आहेस? जरा चालव ना वेगाने? का मी चालवु?” राधीका

मग रोहनने गाडीला तुफाने वेग दिला. बऱ्याच दिवसांनी त्याने त्याची लाडकी कार अशी पळवली होती. नाही तर शरयु असताना तिचे नेहमी तुणतुणं असायचं, “गाडी हळु चालव, गाडी हळु चालव.” ‘कित्ती फरक आहे दोघींच्यात!’ रोहनच्या मनात विचार चमकुन गेला.

रोहनने राधीकाला तिच्या घरी सोडले आणि तो त्याच्या घरी परतला. खुप मस्त संध्याकाळ गेली होती त्याची. घरी आला तेंव्हा शरयु नुकतीच आली होती. नेहमीप्रमाणेच तिची स्वयंपाक घरात काहीतरि खुडखुड चालु होती. रोहनला बघताच ती म्हणाली, “अरे, बरं झालं तु आलास. अरे ह्या गॅस-हब ला बघ ना काय झालेय? सुरुच होतं नाहीये. आत्ताच तर आणला ना आपण? उद्या सकाळीच आपण दुकानात जाउन दाखवुन आणु. वॉरंटी मध्ये आहे तर तो करुन तरी देईल ना!”

रोहन चांगली संध्याकाळ घालवुन परतला होता. घरी आल्या आल्या शरयुची कटकट त्याला नकोशी झाली. “काय वैताग आहे हिचा.. काय अवतार आहे?”, स्वतःशीच तो बोलत होता, नकळत त्याचे मन शरयु आणि राधीकाला कंपेअर करत होते आणि अर्थात त्याचे झुकते माप राधीकाच्याच बाजुला होते. कपडे बदलले आणि बेड-वर बसणार एवढ्यात त्याचा मोबाईल एस.एम.एस आला म्हणुन किणकिणला. “Thanks a lot for a wonderful evening, evening that i will cherish in my life”, राधीकाचाच मेसेज होता. मेसेज वाचुन त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. मेसेज ठेवावा का काढुन टाकावा या विचाराने त्याची थोडी चलबिचल झाली आणि शेवटी त्याने तो मेसेज काढुन टाकला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी रोहन गाडीत बसला. कालचा राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध अजुनही गाडीत दरवळत होता. काहीतरी जादु होती त्या सुवासामध्ये. मन वेड करणारा तो सुगंध रोहनलाही वेड करत होता. त्याला असं वाटत होतं तडक राधीकाकडे जावं आणि तिला आपल्या बाहुपाशात घ्यावे. मग अचानक तो भानावर आला. राधीकासाठी असणारी मनाची ओढ त्याला जाणवत होती, पण त्याचवेळी शरयुची आठवण त्याला मागे खेचत होती. मनाची ही ओढाताण त्याला असह्य करत होती. दिवसभराचे काम कसे तरी संपवुन तो घरी निघणार होता एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर राधीकाचा नंबर बघुन त्याने तो पटकन उचलला.

“हाय रोहन, कसा आहेस?”, राधीका
“हाय!, मी मस्त मज्जेत. बोल कसा काय फोन केलास?”. रोहनला माहीती होतं की तो मज्जेत नाहीये. कसली तरी अनामीक ओढ, हुरहुर त्याला शांत बसु देत नाहीये.
“अरे, काल तु एवढा मला सोडायला आलास आणि मी तुला घरी सुध्दा बोलावले नाही कॉफी साठी. संध्याकाळी काही करणार नसशील तर ये ना घरी. मी फार वेळ नाही घेणार तुझा”, राधीका

“त्यात काय एवढं? ठिक आहे ना.. परत कधीतरी येईन. मी आणि शरयु दोघंही येउ, आज नको”, रोहन

“तुम्ही दोघं यालच रे, पण मला तुला थॅक्स म्हणायला नको का? काय पण माझा मुर्ख पणा, एवढी साधी गोष्ट पण मी तुला विचारली नाही काल यासाठीच मन खातेय माझं मला. प्लिज!!?”, राधीका विनवणीच्या स्वरात म्हणाली.

रोहनने एकदा नाही म्हणुन झाले होते.. परत नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्याने शरयुला फोन करुन “क्लायंट मिटींग आहे, घरी यायला थोडा उशीर होईल” असे कळवुन टाकले होते. सकाळ पासुन पडलेला चेहरा आणि मुड-ऑफ असणारा रोहन आता एकदम खुलला होता.

त्याच्या एका सहकाऱ्याने-मित्राने विचारले सुध्दा, “काय साहेब, एकदम खुशीत दिसताय? सकाळ पासुन तर सुतकी चेहरा करुन बसला होतात? काय भानगड काय आहे?”
तसा रोहन म्हणाला, “अरे फार द्विधा मनस्थीतीत आहे. काय करावं कळतं नाही. बायकोची एक मैत्रिण आहे रे..” आणि मग रोहनने कालचा प्रसंग सांगीतला..”मनातुन जातच नाहीये अरे ती. आणि मला असं वाटतेय की तिला सुध्दा मी आवडतो! आज संध्याकाळी कॉफीला बोलावले आहे तिने घरी.. एकट्याला.”

“अरे व्वा.. तेरी तो निकल पडी!.. जा जा.. ऐश कर”, मित्राने पाठीवर थाप मारत रोहनला म्हणले.

“अरे नाही रे.. एकीकडे सतत असे वाटत रहाते, आपण बायकोला फसवत तर नाहीये ना?”, रोहन

“हे बघ, माझं वैयक्तीक मत तरी असं आहे की जो पर्यंत तु दुसऱ्या कुणाशी इमोशनली – मनाने ऍटॅच होत नाहीस तो पर्यंत तु जोडीदाराशी फसवणुक केली असं म्हणता येणार नाही. शरीर काय रे..नाशवंत आहे, मर्त्य आहे, आत्मा अमर आहे”, मित्राने आध्यात्माची जोड दिली.

“बरं बरं प्रभु.. जातो आता, नाही तर उशीर होईल”, असे म्हणुन रोहन निघुन गेला.

रोहनने बेल वाजवली तेंव्हा राधीकानेच दार उघडले. पांढरा टॉप आणि लेमन रंगाच्या स्कर्ट मध्ये राधीका नेहमीपेक्षाही अधीक सुंदर दिसत होती.

“काका, काकु नाहीत घरी?”, रोहनने आतमध्ये येत विचारले.
“अरे नाही.. ते लग्नाला गेले आहेत नगर ला.. उद्याच येतील”, राधीकाने उत्तर दिले.

रोहन तेथीलच एका सोफ्यावर बसला. हवेत सुखद गारवा होता. ‘केनी.जी’ ची रोमॅनटीक इंन्स्ट्रुमेंटल मंद आवाजात वाजत होती.

“तुला आवडतो केनी.जी?” राधीकाने आतुन कॉफी घेउन येताना विचारले. “कित्ती छान वाजवतो ना. काहीही धांगड्धिंगा नाही, हजारो वाद्यांचे ताफे नाहीत तरीही त्या ट्युन्स वेडं करतात, बेहोश करतात”

राधीकाचा तो परफ्युम्सचा सुगंधच खरं तर रोहनला वेड करत होता. राधीकाने कॉफीचा एक कप त्याला दिला आणि दुसरा स्वतःला घेउन त्याच्या शेजारीच बसली.

“रोहन, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणुनच खरं तर मी तुला घरी बोलावले. मला आजकाल फार असं वाटतंय की मी मोठ्ठी चुक केली आहे. कॉलेज मध्ये एक मुलगा होता. शांत, गरीब, लाजाळु. मला माहीती आहे, त्याला मी आवडायचे. आणि कदाचीत मला पण तो थोडाफार आवडायचा. पण आमच्या जास्ती गाठीभेटी झाल्या नाहीत. त्यामुळे मी ठरवु शकले नाही. त्याचबरोबर त्यावेळेस एक प्रकारचा माज, इगो मनात होता ना, मी म्हणजे कोण ग्रेट! आत्ता वाटत त्याचवेळेस त्याच्याशी बोलले असते तर बरं झालं असतं, आज पश्चात्ताप करण्याची वेळ माझ्यावर आली नसती. तुला माहीती आहे कोण होता तो मुलगा?”, राधीकाने रोहनला विचारले.

“नाही”, रोहन उत्तरला.

एक दीर्घ श्वास घेउन राधीका म्हणाली, “तु रोहन.. तु होतास तो मुलगा. इतक्या वर्षांनंतर तुला भेटले आणी वाटलं मी तुला गमावलं रोहनं. नंतर अनेक जण भेटले, पण नकळत सगळ्यांमध्ये मी तुझाच चेहरा शोधत राहीले जो मला कध्धीच सापडला नाही.”

“अगं पणं…”, रोहनचे वाक्य अर्धवटच राहीले. राधीकाने आपले बोट त्याच्या ओठांवर ठेवले.. “श्शुssss! काही बोलु नकोस”, राधीकाने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले. मला सगळे कळते रोहन, मला सगळे माहीती आहे, तु बोलायची आवश्यकता नाही. तिने आपले ओठ त्याच्या कानाजवळ न्हेले आणि त्याच्या कानात जाऊन हळुच म्हणाली, “माझ्यावर विश्वास आहे ना? मग मी सांगते तसं करं, प्रश्न विचारु नकोस. थोड्यावेळाने मला जोरात ढकल आणि फक्त म्हण ‘हे होऊ नाही शकत'”

रोहनला काहीच कळत नव्हते, तो प्रश्नार्थक नजरेने राधीकाकडे बघत होता. शेवटी त्याने होकारार्थी मान डोलावली. थोड्यावेळाने त्याने राधीकाला जोरात ढकलले. राधीका सोफ्यावरुन खाली कोसळली. पाठोपाठ रोहन तिच्यावर ओरडला, “नाही राधीका हे नाही होऊ शकत.. प्लिज!”

त्याचबरोबर मागुन “येस.. मी जिंकले.. मी जिंकले” असा कुणाचा तरी आवाज आला. रोहनने मान वळवुन मागे बघीतले तर एका खोलीतुन शरयु नाचत बाहेर येत होती. शरयुला इथे बघुन रोहनला धक्काच बसला. तो आळी-पाळीने राधीकाकडे आणि मग शरयुकडे बघत राहीला.

शरयुने जवळ येउन रोहनला अलिंगन दिले आणि मग म्हणाली, “स्वॉरी आणि थॅक्स रोहन, सांगते सगळं सांगते. ही राधीका आहे ना.. हिला फार गर्व होता कि ती कुणालाही पटवु शकते, अगदी विवाहीत माणसालाही. मग मीच तिला इमेल मध्ये म्हणलं शक्यच नाही. माझ्या नवऱ्यासारखा, रोहनसारखा शोधुन सापडणार नाही. मला सोडुन तो परस्त्रीकडे बघणारच नाही. तेंव्हा हीनेच बेट लावली होती. पण आज तु तिला खोट्यात पाडलंस, तु दाखवुन दिलंस कि तु फक्त माझाच आहेस.. थॅक्स रोहन.. खरंच थॅक्स”

रोहनला काय बोलावं अजुनही कळत नव्हतं. तो राधीकाचा झाला होता. त्याने राधीकाचे प्रेमही मगाशीच स्विकारले असते. ऐनवेळेस राधीकाने त्याच्या तोंडावर बोट नसतं ठेवले तर रोहन काहीतरी बोलुन गेला असता. त्या विचारानेच त्याला कसंतरी होतं होतं “थोडक्यात वाचलो ह्या बायकांच्या मुर्खापायी मेलोच असतो”, रोहन स्वतःशीच विचार करत होता.

थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर रोहन आणि शरयु जायला निघाले. जाताना रोहनने एकदा वळुन राधीकाकडे बघीतले. राधीका त्याच्याकडेच बघत होती. चेहऱ्यावर मिलीयन डॉलर्स स्माईल. हसतानाच तिचा उजवा डोळा नाजुकपणे बंद होऊन परत उघडला होता. रोहनने तो बरोब्बर टिपला..”यालाच मराठीत ‘डोळा मारणं’ असं म्हणतात”, रोहनने मनाशी विचार केला.. “शरयु साठी हे सर्व एक नाटक असेल, पण राधीकासाठी हे नक्कीच नाटक नव्हते. नाहीतर जिंकण्यासाठी तिने माझ्याकडुन मगाशीच वदवुन घेतले असते की येस… आय लव्ह हर. पण तिने तसे केले नाही.. तिला तसे होऊ द्यायचे नव्हतेच. हे नक्कीच नाटक नव्हते.. आय नो.. राधीका लव्हज मी..शी इज माईन.. शी इज माय ‘एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर..‘”

[समाप्त]

75 thoughts on “एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३-शेवटचा]

 1. अहम्म.. अहम्म. मला का असं वाटत आहे की राधीका हे नाव किंवा तिचे वर्णन कुठेतरी कुणाशीतरी जुळते आहे?

  बाकी, मस्त जमली आहे कथा, आवडली.

  • प्रिती,
   या कथेतील सर्व पात्र आणि वर्णनं ही काल्पनीक आहेत. त्याचा कुठल्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी असलेले सार्धम्य हा केवळ योगायोग समजावा 🙂
   प्रतिक्रियेबद्दल आभार.

   अनिकेत

 2. Aniket,
  Nice story,
  Good …!!!

  Lage raho …!!!

  Baharaki biryani khao dost … lekin dost …ghar ki roti gharaki hoti hai !!!

  • धन्यवाद विजु. पुर्ण सहमत. तुला असं का वाटतयं की कथेतील पात्राचे विचाराशी मी सहमत असेन? ते काल्पनीक आहे रे! 🙂 I dont belive in extra marital affairs

 3. अरे वा! काय लिहिलय… काय लिहिलय …! मस्तच!
  एक दमात तीन्ही भाग वाचून काढले!

  • धन्यवाद भुंगा, आपली जात एका जागी स्वस्थ न बसणारी सतत एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी उडणारे, असे असताना आपण एकदम वाचुन काढलेले ऐकुन आनंद झाला. आपल्या प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा भुंग.. भुंग.. धन्यवाद

 4. मस्त… मजा आली वाचताना…. पण मला देखिल प्रीती प्रमाणे वाटते की सत्यकथेला काल्पनिक कथेचा साज चढवला आहे .. 😉 ….

  • preeti/Rohini

   what you say i agree with though the story is enjoyable, i find it very realistic, might be someone has experienced it and told kind….

   regards

   Prasad

 5. Wah! Laajawaab…..

  Kaay kathaavarNan aahe…..

  Apratim!!!

  नाही राव हे नाही होऊ शकत.. प्लिज!

  Ajoon ek kathechi vaaT pahavi laagNar atta……

 6. झक्कास 🙂 याला म्हणतात एकदम thrilling story…. मी पहिली ते तीसरी पोस्ट एका दमात वाचून काढली..
  Gr8 … keep the good work 🙂 …असचं लिहित रहा 🙂

 7. Mast ..!!

  SagaLe 3 bhaag ekaa damaat vaachun kaDhale, khup aavaDali …
  surekh jamali aahe, jast faafatapasaaraa nasalyaane ajun chaan vaTali …

  Baki blog suddha mast aahe.

  Asech ajun yeUdyaat …

  – Chhota Don

 8. hmm very very nice story,
  maja aali vachtana, pan tyach barobar ase hi vatat hote ki bicharya sharyu che kaay honar, aani radhika cha raag hi yet hota, bar zaal shevat chhaan kelas
  keep it up yaar very nice

 9. umm… really good, different kind of romantic story.. i thought it should continue.. many more pages to go on. bt this was really nice …keep it up Aniket.

  • Even i would have enjoyed expanding this story for many more parts. पण कसं आहे ना.. फार मोठ्ठ्या गोष्टी कधी कधी कंटाळवाण्या पण होतात, interest जातो त्यातला म्हणुन मग KISS (Kept it short and simple) 🙂

 10. hi
  chan chan chan. aajach sakali mi officela yetana wichar karat hote ki kay howoo shakat ya story madhe aani majha guess chakk khara tharala. 😀 But the way you have put it is very interesting and engaging.
  aani ‘sequel’ sathi jaaga thevli aahes shewat kartana!
  Ajun yewoo det asha punching stories.
  Sonal

 11. Aniket,
  pharach sunder zale ahet tinahi bhag. eka phatakyat aaj vel milalyawarati vachun kadhale.
  khupach sunder!!!

 12. chan ahe re katha, tinhi bhag masta jhale ahet, tisra toda motha asta tar chalal asta, fakta jara jasta jorat dur lotlya sarkha vatla radhikala………akdam khali kosalali, dur dhakalla asta halkech tari chalal asta

 13. आभार कुणा-कुणाचे मानु आणि किती मानु. तुम्हा सगळ्यांच्या प्रतीसादाने मी खरंच भारावुन गेलो आहे. खुप छान वाटलं. तुमच्या प्रतिक्रिया बघुन, वाचुन. अजुन लिहिण्याचा हुरुप आला.

  ब्लॉगवर असलेला आपला लोभ असाच कायम रहावा

  शतशः धन्यवाद.

 14. Aniket thod confusion aahe.
  ‘रोहनने एकदा नाही म्हणुन झाले होते.. परत नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्याने शरयुला फोन करुन “क्लायंट मिटींग आहे, घरी यायला थोडा उशीर होईल” असे कळवुन टाकले होते.’
  He aikun sharyu la kalal pahije hot ki Rohan khot boltoy…karan to tar radhika kade janar hota ha sharayu aani radhikachach plan hota…

 15. really fantastic,
  bt dnt u think tht in this story radhika was letting shryu nd rohan to ply wth her emotions nd feeling smway?????????

 16. wow….khup chan katha….mala khup avadali….tasi mala vachanachi khup avad….mi halli mi khup kami vachato….n net vat kahi vachatatch nahi epaper shivay….pan mi hi tuzhi katha vachali n net var apan khup changale changale vachu shakto he samazhu shakalo…

  thanks…

   • वाटल होत काहीतरी होईल हे ……….काहीच झाल नाही ……….

    समजा बाहेर छान पाऊस पडतोय आणि घरी भजे केले नाही तर कस वाटेल अनिकेत तुला ?

 17. स्टोरी वाचताना खूप मजा येते
  पण वाचल्यानंतर ज्या स्त्रीवाचक विवाहित आहेत त्यांनाच विचार कि यानंतर एखाद्या सुंदर न दिसणाऱ्या मैत्रिणीबरोबर तरी आपल्या यजमानांना पाठवतील का ?आणि पुरुषवाचकाना विचार कि आपल्या बायकोला हि स्टोरी वाचू देतील का ?
  ANY WAY STORY IS BEST…….मला वाटत कि कुठेतरी REALITY आहे ………..
  जेल मे सुरंग!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 18. khup mast watli tuzi story aniket.
  story chaya endla jo u turn dila to khup avadala.
  ya babat vichar suddha kela navta ki shevati Extra Marital afair cha shevat asa mast ani god hoil

  Great Mast Re aniket

  From Kiran sonawane

 19. Khup chhan mala, tuhami post kelelya saglya katha aawdtat….mast…..mala tumcha Aavni ani mastermind he post khup aawdali hoti….ani navin patlag pan chhan ahe aasacha write karat raha…..best Wishes….

 20. कथा छानच आहे..पण व्याकरणाच्या किती चुका….अनिकेतजी…? ’तू, शरयू, म्हणून’…हे सगळे दीर्घ ऊकार तुम्ही खुश्शाल र्‍हस्व लिहीता…? किंबहुना कधी दीर्घ आणि कधी र्‍हस्व लिहायचे हे तुम्हाला ठाऊकच नाही…..स्पेल चेक तरी करीत जा. याने फारच रसभंग होतो.

 21. saglyach story ekdam zakkas lihilya aahet….guntvun thevnarya…ekda vachayla survat keli ki ajibat thambavas vatat nh…great keep it up!!! pan pls lavkar pdate kar na pyar me kadhi kadhi..plzzzzzzzzzzzzz 🙂

 22. Ek samajal nahi shanivari rohan aani radhika picturela kele hote aani shanivar chi evening doghani ekatra spend keli hoti mag dusarya diwashi ravivary (sunday la) suttichya diwashi rohan office la kasa kay gela…..

 23. Ho katha chanach aahhe re amir pan kathechya survatila rohan la ravivari off asto as lihilay na…mag rohan ravivari kasa officela gela….

 24. कथेच्या दुसर्रा भागात लिहीलय की ……… दुसरा दिवस रविवार सुट्टीचा पूर्ण दिवस रोहनने शरयू सोबत घालवला……

 25. khup mast watli tuzi story aniket.
  story chaya endla jo u turn dila to khup avadala.
  ya babat vichar suddha kela navta ki shevati Extra Marital afair cha shevat asa hoil te. good story

 26. Tumcha ajun kahi horror stories asel tar pls pls sanga last time anvani
  part vachun kadla
  On 31 Dec 2016 14:18, “डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा” wrote:

  > अनिकेत posted: “भाग क्र. २ पासुन पुढे… कॉफी शॉप मध्ये राधीकानेच ऑर्डर
  > दिली, “टु लात्ते (caffè latte) प्लिज!!” रोहन, “तुला काय माहीत मला लात्ते
  > आवडते?” राधीका, “अरे म्हणजे काय, कॉलेज मध्ये नाही का एकदा आपण नविन कॅफे
  > सुरु झाले होते तेंव्हा गेलो होतो.. तेंव्हा तु हिच घे”
  >

 27. मी तुमची कथा वाचली फार छान लिखान केलत तुम्ही, मी ऐका तासाताच्या आत वाचुन काढली कारण माझी उस्तुकता इतकी तानली गेली होती कि पुढे काय होईल या आशेने मी एका दमात कथा वाचून काढली.
  अरे वा! काय लिहिलय… काय लिहिलय
  …! मस्तच!
  एक दमात तीन्ही भाग वाचून काढले!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s