डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

कॉमेडी सि.आय.डी.

25 Commentsसोनी टि.व्ही वर प्रदर्शीत होणारी सि.आय.डी. ही मालीका (बहुतेक करुन) अजुनही चालु आहे. कोणी बघतं का ही मालीका? मी आधी खुप बघायचो, पण एक पोलीस कथानक म्हणुन नव्हे तर एक कॉमेडी म्हणुन.. ह्या मालीकेतील काही मजेदार गोष्टी

 • कुठलाही गुन्हा घडला की ती केस सरळ सि.आय.डी. कडेच जाते. पोलीसांकडे नाही. माझ्या माहीतीप्रमाणे ज्या केसेस फारच सेंसीटीव्ह असतात, किंवा राजकीय दृष्ट्या महत्वाच्या किंवा ज्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे अश्याच केसेस सि.आय.डी. कडे दिल्या जातात. यात तर पोलीस कुठ्ठेच दिसत नाहीत.
 • सि.आय.डी. नेहमी रिकामेच असतात. कुठलीही केस आली की ते ती घेउ शकत्तात. मुख्य म्हणजे गुन्ह्याची बातमी द्यायला लोकं सि.आय.डी. ला फोन करुन कसे बोलावतात. लोकं नेहमी फोन (खाकी वर्दीतील) पोलीसांना करतात ना?
 • गुन्ह्याच्या ठिकाणी थोडीशी जरी शोधाशोध केली की धडाध्धड पुरावे मिळायला लागतात. अजुबाजुला एखादे तरी पात्र नक्की असते जे खुप घाबरलेले असते. घाम फुटलेला असतो. अश्या पात्राने १००% गुन्हा केलेला नाही हे समजुन चालावे.
 • संशयीताला प्रश्न विचारायाला लागल्यावर तो किंवा ती लग्गेच रडायलाच लागतात. या वेळेस कॅमेरा प्रचंड प्रमाणात हालत असतो. वर/खाली, जवळ/लांब विवीध कोनांतुन त्याचे रडणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते.
 • प्रत्येक संशयीतावर हे सि.आय.डी. काही पुरावे नसताना सरळ-सरळ आरोपच करतात.. “सच बताओ तुमने ये खुन क्यु किया?”
 • प्रत्येक भागात सि.आय.डी इमारतीमध्ये एखादी काचेची खोली असते आणि आतमध्ये अभिजीत किंवा दया कुठल्यातरी गुन्हेगाराला बुकलत असतात आणि तो गया-वया करत असतो असे दृष्य दिसते.
 • ह्या ग्रुप मधील ‘दया’ हाच बहुतेक वेळा ड्रायवर असतो, फ्रेड्रीक / फ्रेडी हा नेहमी पांचट विनोदी प्रकार करत असतो तर एक आयटम महीला पोलीस (बऱ्याचवेळेला वेगवेगळी असते) खांद्याला बंदुकीचा पट्टा लावुन चेहऱ्यावर न शोभणारे रागीट भाव आणुन बरोबर असते.
 • प्रत्येक भागात एखादा फोटो नाहीतर एखादे तरी पात्र असे असतेच ज्याला बघुन ए.सी.पी. ला वाटते ‘इसकी शकल कुछ जानी पहचानी सी लग रही है!’
 • डॉक्टर आणि ए.सी.पी. प्रद्युमन त्यांच्या संभाषणातुन उगाचच निरर्थक विनोद फुलवायचा प्रयत्न करतात.
 • गुन्हेगाराच्या मागावर असताना एखाद्या ठिकाणी त्यांची गाडी थांबते. उतरल्यावर जवळपासच त्यांना काहीतरी पडलेले दिसते.. “सर ये देखो यहा पे क्या गिरा है!” दर वेळेस कसा काय असा योगायोग असतो हे अजुन न सुटलेले कोडं आहे
 • न पटणारा संगणकाचा वापर. दाखवायचे म्हणुन काय वाट्टेलते दाखवतात. उदाहरणार्थ गुन्हेगाराचे नाव ‘रोहीत शर्मा’ असेल तर ते संगणकावर शोधल्यावर सर्च लिस्ट मध्ये बरोब्बर त्याच गावातल्या त्याच रोहीत शर्माचे डिटेल्स पहीले येतात.
 • संगणकावर ‘रोहीत शर्माचा’ ठावठिकाणा शोधला की एखाद्या ठिकाणी एखादा लाल बिंदु चमकताना दिसतो. संगणकाला कसं कळते की तो ‘रोहीत शर्मा’ आहे? ‘सर वो देखो रोहीत शर्मा भाग रहा है.. चलो उसे पकडते है’ म्हणुन ते लगेच त्याच्या मागावर निघतात. त्या ठिकाणी पोहोचल्यावर लग्गेच त्यांना दुर कुठेतरी रोहीत शर्मा ‘भागताना’ दिसतो. अमेझींग टेक्नॉलॉजी.
 • गुन्हेगाराच्या श्रिमुखात २-३ भडकवल्यानंतर तो लगेच रडायला लागतो आणि गुन्हा कबुल करतो
 • बहुतेक वेळेला ज्याच्यावर अज्जीबात संशय नसतो असेच एखादे पात्र गुन्हेगार असते. गुन्ह्याचे कारण काहीही ओढाताण करुन जुळवलेले असते.

खुप्पच मज्जेदार आहे बाबा हि मालीका, सहज यु.ट्युब वर शोधले तर बरेच एपीसोड्स मिळाले, चला म्हणजे आजचा दिवस हसण्यात जाणार तर 🙂

Advertisements

25 thoughts on “कॉमेडी सि.आय.डी.

 1. ek number ahe he
  agadi khara ahe.
  Doka bajula thevunch baghaychi hi serial.

 2. जबरदस्त, मी पण बघायचो आधी आता वेळ मिळत नाही. ते टेक्नॉलोजी भन्नाट, कायच्या काय दाखवतात, हसु आले पोस्ट वाचुन

 3. to rohit sharma google latitude use karat asel 😀

  • अरे हो.. ठिक आहे.. पण रिअल टाईम?? गुगलचा डेडीकेटेड सर्व्हर घेतला आहे की काय 🙂

 4. वा अगदी छान वर्णन केले. तुम्हाला दूरदर्शन वर लागणारी ‘आंखे’ किंवा आणखीन 1 होती , डिटेकटिव, का इन्स्पेकतर भारत . अशीच काही तरी नावाची होती. ती पण मी . . . होती.

  • पोलीस कथांची मला आवडलेली एकच मालीका दुरदर्शनवर लागणारी ‘एक. शुन्य शुन्य’ (१००)

 5. एकच नंबर….! जबरी जबर शिवाजि नगर….! मला वाटतं सि. आय. डि. वाले हा लेख वाचल्यावर तरी त्यांचा हा वात्रट पणा बंद करतील….! 😀

 6. आणि तू त्यांची ती अफलातून लॅब कशी विसरु शकतोस? ते सतत उकळणारं पोटॅशिअम परमॅंगनेटचं जांभळं द्रावण, तो विगवाला चिडका डॉक्टर, ताचं ते पात्र सहायक आणि शीवाजी साटमशी त्याचे उगाच होणारे वाद…
  अरे आम्ही बघतो बाबा ती सिरिअल बरयाच वेळा आणि बरीच वर्षं!! आता तिसरी पिढी…माझे बाबा बघतात, मी बघायचो (बघतो कधी मधी) आणि आता माझा मुलगा 🙂

  त्यामानानं स्पेशल स्व्काड नावाची एक सिरिअल यायची. ती मस्त होती.

  • एक मजेशीर मालीका म्हणुन ही मालीका बघायला काहीच हरकत नाही, ए१ आहे मालीका

 7. Too good…Ajun ek add karaycha ahe..Nehmi kuthlyahi gharacha darwaja todayla Dayach asto Bichara 🙂

 8. masta..khup hasayala aale.
  tumache observation bhari ahe….

 9. Ho..agadi khara ahe! Hi serial amhihi doka bajula theun baghto….. Eka sitcom sarkhi

 10. rather baghaycho

 11. hi serial mhanje aamchya gharatalya tamam lahan mulancha fav. commedy prakar aahe. ajun ek observe kelas ka? he CID saglya goshti shabdat bolun dakhawtaat. mahanje tikade ‘mudada’ padlela asel tari ‘ are, ye to mar gaya hai…” wagaire. sagal explicitly bolun dakhawalyashiway kamach hot naahi. prekshak an swatah evadhech mand aahet as tyanna tham pane watat. 😀 sahi post.

  • हो. बरोबर.. किंवा छातीत चाकु खुपसलेला दिसतोय किंवा गोळी मारलेली दिसते आणि म्हणतात.. ‘लगता है किसीने इसका खुन कर दिया’.. हा हा हा.. ह.ह.लो.पो.

 12. माझे तर हसून – हसून गाल दुखायला लागले … मस्तच टेक ऑफ़ आहे …

  http://asachkahitari.wordpress.com/

 13. khup chan blog ahe

 14. lai bhari nirikshan aahe aniket dada tuz……jam aavdli C.I.D……hasun hasun vat lagli…….

 15. KHUP MAJAaaaaaaaaaaaaaa ALI!!!!!!!!!!!!!!!

  VACHTANA!

 16. Yes………………….. u r right.
  बरोबर.
  सोनी चैनल कधीही लावा CID च चालू असते
  Mindbloing.

 17. zakkas ahe malika

 18. खुपच छान ऑब्जर्वेशन, पण त्यात ए.सी.पी. ची स्टाईल मला आवडते, प्रत्येक एपिसोड मध्ये तो एक हात खिशात आणि दुसरा हात हलवत म्हणतो,”पता लगाव दया ये आखिर मामला क्या है” आणि मुख्य म्हणजे आरोपी फक्त एकाच थप्पडेने सरळ सी.आय.डी. ब्युरो मध्ये दिसतो. आणि रडत-कढत आपला गुन्हा कबुल करतो.

 19. your writing & story was dam good. Next story chya pratikshet ahot.
  next story hi ashich “houn jau dya”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s