नावं ठेवणं


अगद्दी मला ज्याची अपेक्षा होती तस्सेच झाले आहे. सि-लिंक चे उद्घाटन काय झाले लगेच त्याचे नावं काय ठेवायचे याची चर्चा जोमं धरु लागली आहे. एका पक्षाने ‘राजीव गांधींचे’ नाव सुचवले तर दुसऱ्या पक्षाने लगेच ‘जेंव्हा पुलाचे बांधकाम सुरु झाले तेंव्हा सावरकरांचे नावं ठरले होते, तेच दिले पाहीजे. तसे नं झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे’.

अरे काय चाललेय काय? ज्या लोकांच्या नावासाठी तुम्ही लोकं इतकी भांडत आहात, ती लोकं थोर होती / खरंच असतील तर त्यांची नाव लोकांच्या मनात कायमची घरं करुन रहातीलच ना.. त्यासाठी ही असली खटपट कश्यासाठी? वेळ काय? प्रसंग काय? पावसाने ओढ दिल्यामुळे नजीकच्या भविष्यात ओढवणाऱ्या प्रसंगाला आपण कसे तोंड देणार आहोत? मायावती ५२ कोटी खर्चुन हत्ती आणि स्वतःच्या मुर्त्या बनवते आहे.. काय बापाचा पैसा आहे काय? काय तर म्हणे लोकांना रोजगार मिळाला.

पुण्यात पाण्याची बोंब असतानाच काल रस्ता पुर्नदुरुस्तीमध्ये पाण्याची पाईप-लाईन फुठली आणि हजारो लिटर पाणी वाया गेले. संबंधीत यंत्रणेने संध्याकाळच्या वेळेस दुरुस्ती करण्यास नकार दिला. शेवटी त्या पाईप-लाईनच्या पाण्याचा पुरवठा बंद केला परंतु तोपर्यंत कित्तेक लिटर पाणी वाया गेले होते. यावर कोणी काही बोलणार नाही. मग अश्या महत्वाच्या गरजु वस्तुंनाच नावं का देउ नयेत? उदा. या पाईपलाईनलाच जर ‘क्ष’ व्यक्तीचे नाव दिले असते आणि ती फुटली असती तर त्या पक्षाचे लोकं लग्गेच जमा झाले असते, पाईपलाईनची विटंबना झाली म्हणुन!

तरी नशीब अजुन क्रिकेटर आणि बॉलीवुडवाले या ‘नावं ठेवण्याच्या’ स्पर्धेत उतरले नाहीत. नाही तर भविष्यात ‘महेंद्रसिंग धोनी सार्वजनीक मुतारी गृह‘ किंवा ‘बिपाशा बसु सुलभ शौचालय‘ अशी नावं असलेली ‘ठिकाणं’ दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.. काय?

Advertisements

8 thoughts on “नावं ठेवणं

 1. mala aayushyat ekda tari kahi divasansathi Mr. india wyaychay. Ekekala jaun fatkawen kharach. paristhitich taartamy asel tar te raajkaarani kasale?

 2. खरंच आहे…
  मला तर ह्या नावं ठेवण्याच्या आणि पुतळे उभारण्याच्या मागची मानसिकताच कळत नाही..
  अनिकेत, बिपाशा चे चाहते मात्र तुला सोडणार नाहीत हं..जरा जपुन..:)

  1. ए.. मी पण बिपाशाचा चाहता आहे बरं का.. फक्त कॅट (मिस. कैफ) चा जितका आहे तितका नाही एवढेच

 3. ती फुटली असती तर त्या पक्षाचे लोकं लग्गेच जमा झाले असते … sahi hota… chan hota.

  pan lokanni suddha jagaruk rahana tevadhach garajecha aahe..

  Chalta hai kimva jau det … hi vrutti ata thambavayala pahije ..!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s